agricultural news in marathi article regarding feed for poultry | Agrowon

कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला पर्याय

डॉ. के. के. खोसे, डॉ. एम. जी. निकम, डॉ. ए. सी. आडकिने
शनिवार, 4 सप्टेंबर 2021

सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत आहे. कुक्कुटपालनातील  ७० ते ७५ टक्के खर्च खाद्यावर अवलंबून असतो. कोंबडी खाद्य तयार करण्याकरिता मका व सोयाबीन पेंड हे दोन घटक प्रामुख्याने ऊर्जा व प्रथिनांचे स्रोत म्हणून वापरले जातात.

सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत आहे. कुक्कुटपालनातील  ७० ते ७५ टक्के खर्च खाद्यावर अवलंबून असतो. कोंबडी खाद्य तयार करण्याकरिता मका व सोयाबीन पेंड हे दोन घटक प्रामुख्याने ऊर्जा व प्रथिनांचे स्रोत म्हणून वापरले जातात. काही दिवसांपूर्वी सोयाबीन पेंडीचा दर ९५ ते १०५ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. भारतात दर वर्षी कोंबडी खाद्य बनवण्यासाठी ५० लाख टन सोयाबीन पेंडीची गरज असते. हे बनवण्याकरिता साधारणपणे ९५ ते १०० लाख टन तेलबियांची गरज असते. मागील काही दिवसांत वाढत्या सोयाबीन पेंडीच्या किमतीमुळे खाद्याची किंमत वाढली आहे. हा खर्च कमी करण्यासाठी सोयाबीन पेंडीला पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. ब्रॉयलर कोंबड्यांना प्री-स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर तसेच लेयर कोंबड्यांना चीक फीड, ग्रोवर फीड व लेयर फीड हे खाद्य देण्यात येते. हे बनविण्यासाठी साधारण ३० ते ४० टक्के सोयाबीन पेंडीची गरज भासते. सोयाबीनमध्ये ४४ ते ४६ टक्के प्रथिने असतात, जे कोंबड्याचा खाद्य बनवण्यासाठी उत्तम आहेत, पण सध्या सोयाबीन पेंडीची किंमत आवाक्याबाहेर जात असल्याने पर्यायी प्रथिनयुक्त पदार्थाची निवड करणे गरजेचे आहे.

खाद्य घटकांची समावेश पातळी  

 • प्रथिनयुक्त खाद्यघटकातील पोषक घटक हे त्यामधील तेल काढण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. 
 •  सोयाबीन पेंडीला पर्यायी खाद्यघटकांची निवड करून त्या खाद्य घटकाची समावेश पातळी खाद्यामध्ये किती असावी हे खाद्य प्रकारावर (मांसल कोंबडी खाद्य व अंडी देणाऱ्या कोंबड्याचे खाद्य) अवलंबून असते.
 • प्रत्येक प्रथिनयुक्त खाद्यघटकाचा दर (बाजारभाव) हा त्यामध्ये असलेल्या प्रथिनांच्या प्रमाणावर ठरलेला असतो. खाद्य घटकाचे दर हे एकूण उत्पादन व बाजारपेठेत असलेली उपलब्धता यानुसार बदलत राहतात. 
 • सोयाबीन पेंडी शिवाय इतर पर्यायी प्रथिनयुक्त खाद्यघटकांची निवड करताना या पदार्थांमध्ये काही पोषण विरोधी घटक पाहावयास मिळतात. त्या पोषण विरोधी घटकांची समावेशन पातळी किती हे ओळखणे गरजेचे आहे. या पोषण विरोधी घटकांमुळे १०० टक्के सोयाबीनला काढू शकत नाही. 
 • त्या व्यतिरिक्त आपण काही प्रमाणात सोयाबीनचा उपयोग कमी करून त्याचा पर्यायी घटक वापरात आणून  खाद्याची किंमत कमी करू शकतो.

प्रथिनयुक्त घटक वापताना महत्त्वाचे मुद्दे 

 • प्रथिनयुक्त घटकाची पोषक विश्‍लेषण करावी. खाद्यघटकाची पचनक्षमता किती हे पाहावे. प्रथिनेयुक्त घटकांमध्ये कोणते व किती प्रमाणात पोषण विरोधी घटक आहेत ते तपासावेत.  
 • प्रथिनयुक्त घटकांची समावेशन पातळी,  
 • तंतुमय पदार्थ प्रमाण, काही हानिकारक घटक आहेत का ते तपासावे.
 • खाद्यघटकांमध्ये असलेल्या पोषण विरोधी घटकांचा विचार करून विविध प्रकारच्या विकराचा वापर करावा.
 • हानिकारक घटक आणि पोषण विरोधी घटक कमी करण्याकरिता कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेमुळे ते कमी करता येतील याची काळजी घ्यावी.
 • सोयाबीन पेंडीला पर्यायी प्रथिनयुक्त घटकांची निवड करून कोंबडी खाद्यात वापर करावा. त्यामुळे खाद्यावर होणारा जास्त खर्च कमी करता येईल.

- डॉ. के. के. खोसे,  ९४२२६४६५२९ 
(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...