agricultural news in marathi Article regarding Geranium cultivation | Agrowon

तयारी जिरॅनियम लागवडीची...

डॉ. संदीप मोरे, डॉ.बी.सी.वाळुंजकर
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे. या पिकाच्या लागवडीला चांगली संधी आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे.
 

जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे. या पिकाच्या लागवडीला चांगली संधी आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे.

जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाची वर्षातून तीन वेळेस कापणीला येते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. जिरॅनियम पाल्यापासून तेल काढतात. सुगंधी तेल साठविण्यासाठी गडद अंबर रंगाच्या बाटल्या वापराव्यात.

लागवड तंत्र 

 • लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा चांगल्या प्रकारचा निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही लागवड शक्य आहे.
 • सुरवातीला नांगरणी केल्यानंतर दोनदा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर गादी वाफे बनवून लागवड करावी.
 • लागवडीसाठी अलजीरियन, ट्युनिशिया, रीयूनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, आय. आय. एच. आर. - ८, उटी, नर्मदा, इजिप्शियन आणि सिम-पवन या जाती उपलब्ध आहेत.
 • रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरचा कालावधी योग्य आहे साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या लागवडीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळते.
 • लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात. रोपांची तंतुमय मुळे चांगल्याप्रकारे वाढलेली असावीत. त्यामुळे रोपांची मातीतून अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता अधिक असते.
 • रोपे तयार करण्यासाठी सपाट, मध्यम खोलीची, कसदार, निचरा होणारी जमीन असावी. रोपवाटिकेला पाणी देण्याची सोय असावी, पाणी क्षारयुक्त नसावे.
 • लागवड ६० X ६० सें. मी. किंवा ७५ X ६० सें. मी. अंतरावर करावी.
 • या पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड करू शकतो. शेवग्याच्या उत्पादनामध्ये जिरॅनियम लागवडीचा खर्च निघू शकतो.

खत व्यवस्थापन 

 • चांगल्याप्रकारे कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
 • प्रति हेक्टरी २०० किलो नत्र,३५ किलो स्फुरद आणि ३५ किलो पालाश द्यावे. २० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्यावेळी आणि उर्वरित ८० टक्के नत्र लागवडीनंतर ३०, ४५, ६० आणि ७५ दिवसांनी समान हप्त्यात विभागून द्यावे. यामुळे पिकाची जोमदार वाढ होते.

आंतरमशागत 
१५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यानंतर रोपांना भर द्यावी.

पाणी व्यवस्थापन 

 • सुरवातीचे म्हणजे पहिले पाणी लागवडीनंतर लगेच द्यावे. यामुळे रोपांची योग्य वाढ होते. रब्बी हंगामात साधारणपणे ७ ते ८ दिवसांनी आणि उन्हाळी हंगामात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामात पावसाच्या अंदाजानुसार पाणी द्यावे. पीक वाढीच्या काळात पाण्याचा योग्य वापर करावा. दोन पाण्याच्या पाळ्यांमध्ये मोठा खंड पडू देऊ नये. तसेच गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर केल्यास मूळ कूज रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

पिकांची काढणी 

 • लागवड केल्यानंतर दर चार महिन्यांनी विळ्याच्या साह्याने कापणी करावी लागते. कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता नसते.हेच पीक तीन वर्षापर्यंत चालते.
 • पानांचा थोडासा रंग हा फिक्कट पिवळसर होण्यास सुरवात झाल्यावर तसेच सुगंध हा गुलाबासारखा येण्यास सुरवात झाल्यावर कापणी करावी.

उपयोग 

 • तेलात जिरॅनियम आणि सिट्रोनेलॉल आहे.याचा वापर उपचार पद्धतीमध्ये होतो.
 • तेलास सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर निर्मितीसाठी मागणी.
 • कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती.

संपर्क - डॉ. संदीप मोरे, ९२८४१९२१८८
(सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड)


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...