agricultural news in marathi article regarding health benefits of guava fruit | Agrowon

पेरूचे आरोग्यदायी गुणधर्म

व्ही. आर., चव्हाण, डॉ. काळे आर.व्ही.
सोमवार, 12 जुलै 2021

पेरू हे नाशवंत फळ असून योग्य वेळेवर पेरू फळांची विक्री न झाल्यास ती खराब होतात. यासाठी विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्री करणे अधिक फायदेशीर ठरते. पेरूचे फळाप्रमाणेच पेरू झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत.
 

पेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही. योग्य वेळेवर पेरू फळांची विक्री न झाल्यास ती खराब होतात. यासाठी पेरू फळापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्री करणे अधिक फायदेशीर ठरते. पेरूपासून बनविलेल्या विविध प्रक्रियायुक्त फळांना बाजारात चांगली मागणी आहे. पेरूचे फळाप्रमाणेच पेरू झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत.

पेरू हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील फळ असून आज बहुतेक सर्वच देशांमध्ये आढळते. पेरूची झाडे  उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. सामान्यपणे पेरूच्या दोन जाती आहेत. एका जातीमध्ये पांढरा तर दुसऱ्या जातीमध्ये गुलाबी गर असतो. दोन्हीही जातींचे पेरू चवीने गोड व थोडेसे तुरट असतात. अनेक पक्षी पेरू आवडीने खातात. आवळ्याच्या खालोखाल भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व देणारे फळ म्हणून पेरू ओळखला जातो. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. पेरू फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पेरूची चव वर्षभर घ्यायची असेल, तर त्याला काही प्रक्रिया करून वेगवेगळ्या पदार्थांच्या स्वरूपात टिकवून ठेवता येते.

फायदे 

 • बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खाणे फायद्याचे ठरते. त्यासाठी सकाळच्या वेळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खावा.
 • काही लोकांच्या तोंडामध्ये दुर्गंध येतो. त्यासाठी पेरूची पाने तोंडामध्ये ठेवून चावल्यास दुर्गंध वास कमी होण्यास मदत होते. तसेच दात दुखण्याचा त्रास असेल तर तोही कमी होतो.
 • पोटॅशिअम आणि तंतूच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
 • पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक आहे. त्यामुळे बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला, तर मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.
 • दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामधील जीवनसत्त्व ‘क’ तसेच ग्लुकोज, टॅनिन आम्ल या घटकांमुळे खालेले अन्न सहजरित्या पचण्यास मदत होते.
 • पोटाच्या विकारांसाठी पेरू गुणकारी मानला जातो.
 • पेरूमध्ये जीवनसत्त्व ‘क’, तंतुमय पदार्थ तसेच इतर पौष्टिक पदार्थ मुबलक प्रमाणात आहेत. हे सर्व घटक एकत्र मिळून शरीरात अँटीऑक्सिडण्ट सारखे म्हणून काम करतात.
 • जीवनसत्त्व ‘अ’मुळे डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते.
 • पेरूच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट सोबत इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे शरीरास फायदेशीर असतात.
 • लहान बालके, गर्भवती आणि अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन केले पाहिजे. यामधील जीवनसत्त्व ‘क’ आणि इतर पौष्टिक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीर सुदृढ व मजबूत होते.
 • गर्भवती महिलांसाठी पेरू खाणे चांगले असते. गर्भवती स्त्रियांना उलटी, मळमळ असा त्रास होतो. त्यासाठी पेरूचा सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावा. आराम मिळतो. तसेच तोंडास रुची निर्माण होऊन उलटी, मळमळीची भावना कमी होऊन भूक चांगली लागते.
 • त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळे यावर पेरू उपयुक्त आहे.
 • पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तेजस्वी दिसायला लागते.
 • पेरूमध्ये ८० टक्के पाणी असते. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासही मदत करते. 
 • पेरू रसामध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करते.

- प्रा. चव्हाण व्ही. आर. ९५१८३४७३०४
डॉ. काळे आर. व्ही., ९४०३२६१४५०
(एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, जि. औरंगाबाद)


इतर कृषी प्रक्रिया
महामंडळाच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर...ऊसतोड कामगार महामंडळाच्या खर्चासाठी शेतकऱ्यांच्या...
कर्जबाजारी कारखान्यांची आर्थिक घडी...कर्जबाजारी कारखान्यांसाठी केंद्र सरकारने...
साखरेची एमएसपी वाढविण्याची मागणी योग्य...पुणे :  ऊस सोडून इतर पिकांसाठी एमएसपी म्हणजे...
नरेंद्र मोदींकडून झिरो बजेट शेतीचा...पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरो बजेट...
टोमॅटोपासून सूप, चटणी, लोणचे..टोमॅटो ही अत्यंत नाशीवंत फळभाजी असून, लगेच खराब...
दर्जेदार पनीरनिर्मितीचे तंत्रउत्तम दर्जाचे पनीर बनविण्याकरिता म्हशीचे दूध...
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे...नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक...
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...