agricultural news in marathi Article regarding Healthy Zucchini | Agrowon

काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनी

डॉ. अविनाश काकडे, डॉ. हेमंत रोकडे, रहीम खान निजाम खान
गुरुवार, 18 मार्च 2021

झुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज, स्पॅगेटी स्क्वॅश आणि काकडी यांच्याप्रमाणे उन्हाळी फळ आहे. ते कच्चे किंवा शिजवून खाता येत असल्याने फळभाजी म्हणून लोकप्रिय आहे. 
 

झुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज, स्पॅगेटी स्क्वॅश आणि काकडी यांच्याप्रमाणे उन्हाळी फळ आहे. ते कच्चे किंवा शिजवून खाता येत असल्याने फळभाजी म्हणून लोकप्रिय आहे. 

झुकिनी (शा. नाव : कुकुरबीटा पेपो) हे काकडीवर्गीय पीक असून, इंग्रजीमध्ये ‘समरस्क्वॅश’ या नावाने ओळखले जाते. काकडी व दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच याचे फळ दिसते. या पिकाची फळे गर्द हिरव्या, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येतात. 

याच्या झुडूपसदृश वेली असून, कमाल ३ फुटांपर्यंत उंची असते. सरासरी उंची दीड ते दोन फुटांपर्यंत राहते. झुकिनीची पाने भली मोठी दीड ते दोन फूट लांब व तांबड्या भोपळ्यासारखी दिसतात. त्याला लांबलचक दांडा असतो व पानावर तसेच पानाच्या दांड्यावर बारीक पांढरी काटेरी लव असते. पानाच्या देठाच्या बेचक्यात याला फुले लागतात. काकडीवर्गीय पीक असल्यामुळे याला नर व मादी अशी वेगवेगळी फुले एकाच झुडपावर लागतात.

संपूर्ण न पिकलेली फळे झुडूपसदृश वेलीवरून तोडली जातात. फळांची लांबी २.२ फुटांपेक्षा जास्त वाढू शकते. मात्र सरासरी सामान्यपणे २० सें.मी.पर्यंत फळ घेतले जाते. वनस्पतीशास्त्रानुसार हे फळ असले तरी फळभाजी म्हणून वापरली जाते. याची फळे कच्ची किंवा शिजवून सॅलडच्या स्वरूपात खाल्ली 
जातात.

झुकिनीचे प्रकार

 •  झुकिनीचे रंगानुसार गडद हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार आहेत. या पिकाचे झुकिनी, गोल्डन झुकिनी, गोल्ड रश आणि ॲरीस्टोक्रॅट अशा परदेशी वाणाचा आपल्याकडेही लागवडीसाठी वापर होतो. 
 •  गर्द हिरव्या फळांचे उत्पादन अधिक येते. ती सॅलड आणि भाजीसाठी वापरली जाते. 
 •  गोल्डन झुकिनी आणि गोल्ड रश या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फळांचा गर दुधाळ व स्वादयुक्त आहे. तसेच गोल्ड रश वाण लवकर येत असल्याने त्याचीही लोकप्रियता वाढत आहे. 
 •  हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही ॲरिस्टोक्रॅट या संकरित वाणाची वैशिष्ट्ये आहेत. 

झुकिनीचे आरोग्यवर्धक फायदे 
एक कप शिजवलेल्या झुकिनी (२२३ ग्रॅम) मधून मिळणारी पोषकतत्त्वे :

ऊर्जा १७ कॅलरी, प्रथिने १ ग्रॅम, चरबी १ ग्रॅमपेक्षा कमी, कार्ब ३ ग्रॅम, साखर १ ग्रॅम, फायबर १ ग्रॅम, जीवनसत्त्व-अ ४०%, मॅंगेनीज १६%, जीवनसत्त्व-क १४%, पोटॅशिअम १३%, मॅग्नेशिअम १०%, फोलेट ८%, तांबे ८%, फॉस्फरस ७%, जीवनसत्त्व-ब-६ -७%, थायमिन ५% (टक्केवारीतील प्रमाण हे शिफारस केलेल्या आहारातील दैनिक सेवनाच्या (आरडीआय) तुलनेत दिले आहे.)

 • झुकिनीत लोह, कॅल्शिअम, जस्त आणि इतर अनेक बी-जीवनसत्त्वे कमी प्रमाणात असतात. कच्च्या झुकिनीच्या तुलनेत शिजवलेल्या झुकिनीमध्ये अ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात उपलब्ध होते.
 • यात अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असून, कॅरोटीनोइड्सही (उदा. लुटेन, झेक्सॅन्थिन आणि बीटा कॅरोटीन) मुबलक आहेत. ते  डोळे, त्वचा आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते. काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण देते. 
 • पचन संस्थेसाठी फायदेशीर : यात पाण्याचे प्रमाण अधिक असून, बद्धकोष्ठतेची शक्यता कमी करते. विद्राव्य स्वरूपातील तंतुमय पदार्थ आतड्यातील जिवाणूंसाठी, तर अविद्राव्य तंतुमय पदार्थ हे सारक म्हणून काम करतात. 
 • रक्तातील शर्करा कमी करण्यासाठी कमी कार्ब झुकिनी उपयुक्त ठरते.
 • हृदयाचे आरोग्य - झुकिनीतील विद्राव्य फायबर शरीराला हानिकारक ठरणाऱ्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. त्यात पोटॅशिअमचे उच्च प्रमाण रक्तवाहिन्यांसाठी उत्तम असून, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. 
 • झुकिनी जीवनसत्त्व-क आणि बीटा कॅरोटीन समृद्ध असून, दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यातील ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन हे  अँटिऑक्सिडेंट्स घटक वयाशी संबंधित डोळ्यांचे आजार, उदा. मोतीबिंदूची शक्यता कमी करू शकतात. 
 • नियमित आहारामध्ये झुकिनीचा वापर केल्यास, वजन मर्यादित ठेवण्यास मदत होते. 

- डॉ. अविनाश  काकडे,  ८०८७५२०७२०
डॉ. हेमंत रोकडे,  ९८८१७७५०९५
रहीम खान निजाम खान,  ९३७१३७३३९९
(राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर महिला
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...