agricultural news in marathi article regarding Intercropping in safflower | Agrowon

करडईमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...

डॉ. शहाजी शिंदे, डॉ. शशिशेखर खडतरे
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021

पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी फटीच्या कोळप्याने करावी म्हणजे पिकाच्या ओळीस मातीची भर लागते. टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध असेल, तर एक किंवा दोन संरक्षित पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
 

पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी फटीच्या कोळप्याने करावी म्हणजे पिकाच्या ओळीस मातीची भर लागते. टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध असेल, तर एक किंवा दोन संरक्षित पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

सध्या करडई पीक वेगवेगळ्या भागात रोपावस्था ते वाढीच्या अवस्थेत आहे. अशा वेळेस अधिक उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

खत मात्रा 
बागायती करडई पिकास एक महिन्याने पहिले पाणी देण्यापूर्वी नत्राची राहिलेली अर्धी मात्रा ३७.५० किलो नत्र (८२ किलो युरिया) प्रति हेक्टरी द्यावी.

आंतरमशागत 
विरळणी 

 • करडई पीक हे जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. त्यामुळे ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने पिकाची विरळणी करून प्रती हेक्टरी झाडांची योग्य संख्या ठेवणे महत्त्वाचे आहे.
 • झाडांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाली, तर जमिनीतील अन्न आणि पाण्यासाठी त्यामध्ये स्पर्धा होते. पिकाची वाढ नीट होत नाही. पर्यायाने उत्पादनात घट येते.
 • पेरणीनंतर १५ ते २० दिवसांच्या आत विरळणी करावी. विरळणी करताना २० सें.मी. अंतरावर एक जोमदार रोप ठेवून रोगट तसेच लहान झाडे उपटून घ्यावीत.

खुरपणी 
गरजेनुसार पिकाची एक किंवा दोन वेळा खुरपणी करून शेत एक महिन्यापर्यंत स्वच्छ ठेवावे.

कोळपणी 

 • कोरडवाहू भागात कोळपणीला अत्यंत महत्त्व आहे. कोळपणीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते म्हणून एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी होय.
 • पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी फटीच्या कोळप्याने करावी म्हणजे पिकाच्या ओळीस मातीची भर लागते. ओळीमधील तण निघते.
 • दुसरी कोळपणी अखंड पासाच्या कोळप्याने करावी म्हणजे जमिनीला पडलेल्या भेगा बुजल्या जातात. जमिनीवर मातीचे आच्छादन तयार होऊन भेगावाटे होणारे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन रोखले जाते. हा ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडतो.
 • पाचव्या आठवड्यात तिसरी कोळपणी दातेरी कोळपणी करावी, म्हणजे जमिनीचा वरचा टणक झालेला थर आणि ढेकळे फुटून त्या मातीने जमिनीस पडलेल्या भेगा बुजल्या जातात. ओलाव्याचे बाष्पीभवन रोखले जाते. हा ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडतो.

पिकास संरक्षित पाणी 

 • करडई हे पीक अवर्षणास प्रतिकारक्षम असल्यामुळे हे पीक कमी पाण्यात येते. करडईची मुळे जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने खालच्या स्थरातील ओलावा पिकाच्या वाढीसाठी वापरला जातो.
 • अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पाऊस असला तरी करडई पिकापासून काही प्रमाणात हमखास उत्पादन मिळते. जमिनीत पुरेशी ओल असेल तर पिकास पाण्याची गरज भासत नाही.
 • टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध असेल तर एक किंवा दोन संरक्षित पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. संरक्षित पाण्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ दिसून येते. एकच पाणी उपलब्ध असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी द्यायचे असतील, तर पहिले पाणी पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी द्यावे आणि दुसरे पाणी ५०-५५ दिवसांनी द्यावे. जमिनीस भेगा पडण्यापूर्वी पाणी द्यावे. पाण्याचा जास्त ताण पडल्यानंतर तसेच जमिनीस भेगा पडल्यावर पाणी दिले, तर भेगामुळे जास्त प्रमाणात पाणी जमिनीत मुरते.
 • जमिनीत जास्त काळ पाणी साठून राहिले आणि तापमान जास्त असेल (३० अंशांपेक्षा जास्त) तर मूळकूज रोग मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे पीक वाळते. तरी पाणी देताना जास्त ताण पडण्यापूर्वी द्यावे. तसेच हलके पाणी द्यावे. पिकात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

फुले येण्याचा काळ 

 • अवर्षण परिस्थितीत पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी म्हणजेच फुले येण्यास सुरुवात झाल्यावर सायकोसील या वाढरोधकाची ५०० पीपीएम (५०० मिलि प्रति ५०० लिटर पाणी) प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी म्हणजे झाडाची अनावश्यक वाढ थांबेल. उपलब्ध ओलावा आणि अन्नद्रव्यांचा करडईचे दाणे भरण्यास मदत होईल, पर्यायाने उत्पादनात वाढ होईल.
 • पिकास फुले येण्यास सुरुवात झाल्यावर प्रति हेक्टरी ५ मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात म्हणजे परागीभवनात वाढ होऊन उत्पादन वाढते.

संपर्क : डॉ. शहाजी शिंदे, ९६८९६१७०६६
डॉ. शशिशेखर खडतरे, ७५८८६१०७७६

(डॉ. शिंदे करडई पैदासकार (निवृत्त) आहेत. डॉ. शशिशेखर खडतरे हे अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे कृषी विद्यावेत्ता आहेत.)


इतर कृषी सल्ला
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील...अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला...
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगाशेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे....
बटाटा पिकातील मूल्यवर्धन...शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते...
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...