agricultural news in marathi article regarding Jaani buffalo | Page 4 ||| Agrowon

संगोपन जानी म्हशीचे...

सजल कुलकर्णी
शनिवार, 8 मे 2021

चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी म्हैस ही संकल्पना अवलंबली जाते. ही पद्धत फक्त नंदगवळी समाजातच नाही, तर इतर भटक्या पशुपालक समाजामध्ये पाहावयास मिळते.
 

चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी म्हैस ही संकल्पना अवलंबली जाते. ही पद्धत फक्त नंदगवळी समाजातच नाही, तर इतर भटक्या पशुपालक समाजामध्ये पाहावयास मिळते.

वर्धा जिल्ह्यातील गवळाऊ गाय ही दुधासाठी प्रसिद्ध आहे. या गाईला सांभाळणारे नंद गवळी समाजातील लोक आजही सांगतात, की पूर्वीसारखी गवळाऊ गाय आजकाल दिसत नाही. गवळाऊ गाय ही दूध कमी देते, गायीला फार काही खायला लागत नाही, रोगाचा फारसा प्रादुर्भावही होत नाही.असे नंद गवळी समाजातील लोक सांगतात. गायीला सहसा कालवड झाली, की पशुपालक खूष होतो, पण नंद गवळी समाजात गायीला गोऱ्हा झाला तरी ते खूष असतात कारण त्या गोऱ्हाची किंमत भविष्यात गाईपेक्षा जास्त मिळते.

नागपुरी म्हशीचे संगोपन 

  • नंद गवळी समुदाय गवळाऊ गाईचे दूध विकूनच आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करतो. याचबरोबरीने हा समुदाय नागपुरी म्हशींचे देखील दुग्धोत्पादनासाठी संगोपन करतो. या म्हशीला गवळी लोक गवळाऊ म्हैस असे देखील म्हणतात. नागपुरी म्हशी या मुऱ्हा किंवा जाफराबादी म्हशी इतके दूध देत नाहीत. पण या म्हशींना त्यांच्याएवढे खाद्य लागत नाही. देखभालीचा खर्च फारच कमी असतो.
  • नंदगवळी समाज भटका असल्याने त्यांच्या अनेक चालीरीती सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या आहेत. समाजात अनेक वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यातले काही फक्त आणि फक्त नंदगवळी समाजामध्ये बघायला मिळतात. समाजात अनेक म्हशींना त्यांच्या शरीरावरील खुणांनुसार नावाने ओळखले जाते जसे भोंडी (डोक्यापासून नाकापर्यंत पांढरा रंग) शिंगरी (इतरांपेक्षा लांब शिंग) चांदी(कपाळावर पांढरा ठप्पा) इत्यादी. पण या सगळ्यांत एक विशिष्टपूर्ण म्हैस म्हणजे जानी म्हैस.

जानी म्हशीचे संगोपन 
जानी म्हणजेच देवाच्या नावाने सोडलेली म्हैस. आपण देवाच्या नावाने सोडलेली गाय किंवा सोडलेला बैल नेहमी ऐकतो; पण देवाच्या नावाने सोडलेली म्हैस ऐकण्यात येत नाही. पण नंदगवळी समाजात ही प्रथा पूर्वीपासून आहे. नंद गवळी समाजात पूर्वी प्रत्येकाच्या घरी कमीत कमी २ खंडी (१ खंडी = २० म्हशी) म्हशी असायच्या. त्या बाराही महिने उघड्यावर राहायच्या. त्यातल्या अनेक म्हशी या पावसाळ्याच्या शेवटी व्यायच्या. पावसाळ्यात जन्माला आलेले अनेक बछडे लवकर आजारी पडत आणि दगावण्याचे प्रमाण पण अधिक असायचे. यात रेडे दगावले तर त्याचा फारसा फरक पडत नसे, पण जर वगारी दगावल्या, तर पशुपालकाचे फार मोठे नुकसान होत असे. या वगारीवर वेळीच सगळे उपाय केले जायचे. पण तरीही ती बऱ्या झाली नाहीत, तर त्यांना जानी सोडले जायचे.

ही म्हैस घरातील सगळ्यांच्या लाडाची असायची. जर एका वेळेला ५ वगारी आजारी पडल्या, तर त्यापैकी कुठलीही एक वगार जानी म्हणून सोडली जायची. एकदा जानी सोडली, की त्यावर कुठलेही उपाय केले जात नसत, पण घरातील एक व्यक्ती ती बरी होईपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवून असतो. जानी सोडताना देवाला नवस केला जायचा, की जर ही वगार वाचली तर या तिला आणि तिच्या दुधाला आम्ही कधीच विकणार नाही. जानी म्हैस निवडण्याचे काही नियम आहेत. जसे की तिची शरीरयष्टी चांगली हवी, अंगावर चमक हवी, तिच्या आईचे दूध जास्त असावे. जानीचे दूध विकता येत नसल्याने तिचे दूध तिच्या वासराला हवे तेवढे पिऊ देत असत आणि मग उरलेले घरच्यासाठी वापरले जायचे किंवा कोणी मागितल्यास त्यांना ते फुकटात दिले जायचे, पण ते कधीही विकत नसत. म्हशीच्या बच्च्याला जास्त दूध प्यायला मिळत असल्याने तो बच्चा बाकीपेक्षा चपळ व शरीराने चांगला होत असे. जानी म्हशीला होणारे बच्चे विकू शकत नाही, पण तिच्या वागरीचे दूध हे विकू शकतो किंवा रेड्याला कुणाला फुकटात देऊ शकतो. पूर्वी एक समज होता की जानी म्हशीला होणाऱ्या वगारीला दूध जास्त असते. त्यामुळे ती वगार मुलीला लग्नात दिली जायची.

चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून कदाचित ही पद्धती अवलंबली असावी. ही पद्धत फक्त नंदगवळी समाजातच नाही तर इतर भटक्या पशुपालक समाजात पण बघायला मिळते. मेळघाटमधील नंदगवळी याला ‘जाना’, उमरखेड मधील मथुरा लमाण याला ‘जानी’ आणि गुजरात मधील ‘भरवाड’ (गीर गोपालक) याला ‘जानडी’ म्हणतात.

- सजल कुलकर्णी, ९८८१४७९२३९
(लेखक पशू अभ्यासक आहेत.)


इतर कृषिपूरक
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...