agricultural news in marathi article regarding laser land leveler | Agrowon

जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलर

डॉ.अमोल गोरे
रविवार, 18 एप्रिल 2021

ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये सपाटीकरणाचे काम स्वयंचलित पद्धतीने केले जाते. या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते. 

ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये सपाटीकरणाचे काम स्वयंचलित पद्धतीने केले जाते. या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते. सपाटीकरणामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत ५० टक्के वाढ होते.एकसमान पेरणीची खोली तसेच पिकांची एकसमान वाढ होते.

जमिनीचे सपाटीकरण हा शेती मशागतीतील आवश्यक भाग आहे. जमिनीच्या सपाटीकरणामध्ये एकसमान पातळीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. शेत जमिनीवरील असमानतेमुळे पिकाला समप्रमाणात पाणी दिले जात नाही. त्यामुळे दिलेले पाणी शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचण्यास जास्त वेळ तर लागतो. पाणी देखील जास्त द्यावे लागते. त्यामुळे पिकांची असमान वाढ होते, तणांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी उत्पन्न आणि उत्पादन गुणवत्ता कमी होते.

ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरचे फायदे 

 • प्रभावी सपाटीकरणामुळे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे श्रम कमी होतात. धान्य गुणवत्ता, उत्पादन दोन्ही वाढते.
 • ट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये सपाटीकरणाचे काम स्वयंचलित पद्धतीने केले जाते. या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते.
 • या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण उत्सर्जित करण्यासाठी एक ट्रान्समीटर युनिट वापरतात, त्याला लेझर ट्रान्समीटर म्हणतात. जे शेतात १००० मीटर व्यासापर्यंत वर्तुळाकार प्रकाशकिरण सोडते. लेझर ट्रान्समीटर हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. हे किरण लेव्हलर वर बसवलेल्या लेझर रिसीव्हरद्वारे प्राप्त केले जातात. प्राप्त झालेले सिग्नल हे लेव्हलर ब्लेड (फळी किंवा बकेट) खाली वर करून जादा माती समपातळीत पसरली जाते.
 • लेव्हलरमधील हे कार्य स्वयंचलित पद्धतीने हायड्रॉलिक नियंत्रण व्हॉल्व्हद्वारे केले जाते. अशाप्रकारे लेझर लेव्हलिंग, माती समपातळीत आणली जाते.
 • लेझर लॅंड लेव्हलर वापरण्याआधी शेताची मशागत करून साधी फळी मारली मारली जाते. जेणे करून यंत्रणेने माती काढणे सोपे होईल.

कार्यरत घटक

 • लेझर ट्रान्समीटर (प्रकाशकिरण उत्सर्जन), लेझर रिसीव्हर (प्रकाशकिरण प्राप्तकर्ता), विद्युत नियंत्रित बोर्ड, हाइड्रोलिक सिलेंडर, कंट्रोल व्हॉल्व्ह, लेव्हलर फळी (बकेट), ग्राउंड व्हील.
 • लेझर लेव्हलरसाठी ४० ते ४५अश्वशक्ती ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. लेव्हलर ब्लेड (फळी) च्या रुंदी वरून किती अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची गरज आहे हे ठरवले जाते.

लेझर लॅंड लेव्हलरचे फायदे 

 • सिंचनासाठी वेळ आणि पाणी बचत होते (३५ टक्यांपेक्षा जास्त पाण्याची बचत होते)
 • पाण्याचे एकसारखे वितरण होते.
 • सपाटीकराणामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत ५० टक्के वाढ होते.
 • एकसमान पेरणीची खोली तसेच पिकांची एकसमान वाढ होते.
 • तणांची समस्या कमी होते.
 • एकसमान खतमात्रेमुळे पीक उत्पन्नामध्ये १० ते १५ टक्के सुधारणा होते.
 • पिकांसाठी अधिक एकसमान मातीचा ओलसरपणा टिकून राहतो.
 • एकसमान अंकुरण आणि पिकांची जलद वाढ होते.
 • पिकाच्या परिपक्व्तेमध्ये एकसारखेपणा येतो.
 • जमिनीच्या सपाटीकरणामुळे पीक व्यवस्थापनाचे काम कमी होते.
 • हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ऑपरेटरवर कमी भार येतो.

संपर्क - डॉ.अमोल गोरे,९४०४७६७९१७
(कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)


इतर टेक्नोवन
अन्न प्रक्रियेसाठी ‘थ्री डी प्रिंटिंग’...सर्वसामान्यपणे आपल्याला विविध आकारातील कुकीज,...
अधिक शाश्वत उत्पादकतेसाठी वनस्पतीतील...प्रत्येक सजीवामध्ये, अगदी वनस्पतीमध्येही दडलेले...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
टोमॅटो प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणेटोमॅटोचा ही नाशवंत फळभाजी असल्यामुळे काढणीनंतर...
गूळ पावडर सुकवण्याचे तंत्रज्ञानगूळनिर्मिती उद्योगामध्ये पावडरनिर्मिती हा आणखी एक...
नव्या रंगामुळे एअर कंडिशनिंगची गरज होईल...जागतिक तापमान वाढीसाठी एअर कंडिशनिंग यंत्रणा आणि...
सौरऊर्जा पार्क निर्मितीमध्ये व्हावा...भविष्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढत जाणार आहे....
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...