agricultural news in marathi article regarding Medicinal plants for cattle diseases | Page 2 ||| Agrowon

आसडीवर वनस्पतिजन्य तेल फायदेशीर...

डॉ. सुधीर राजूरकर
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले तर त्यास संसर्ग होतो. जखम झाल्यानंतर त्यावर माश्‍या बसतात, या माशांच्या पायांवर चिटकून परोपजीवीची अंडी या जखमेवर येतात. ही अंडी उबतात. ही आसडी जगण्यासाठी जखमेतील खराब झालेले, कुजलेले मांस खाते. या आसडीमुळे ही जखम खोल होत जाते. 
 

जनावरांना होणाऱ्या जखमेवर तत्काळ उपचार नाही केले तर त्यास संसर्ग होतो. जखम झाल्यानंतर त्यावर माश्‍या बसतात, या माशांच्या पायांवर चिटकून परोपजीवीची अंडी या जखमेवर येतात. ही अंडी उबतात. ही आसडी जगण्यासाठी जखमेतील खराब झालेले, कुजलेले मांस खाते. या आसडीमुळे ही जखम खोल होत जाते. 

आसडी पडलेली जखम ही वरून खूप लहान दिसते. परंतु ती खोलवर गेलेली असते. हीच आसडी जखमेमध्ये अंडी देते. पर्यायाने त्यांची संख्या खूप वाढते, जखमेतून दुर्गंधी यायला लागते. अशा आसडीवर उपचार तत्काळ करणे अत्यंत आवश्यक असते. ही जखम वाढत जाऊन नंतर त्यावर उपचार करणे खर्चिक ठरते.

आज बाजारपेठेत मलम आणि स्प्रे स्वरूपात औषधी उपलब्ध आहेत. आसडी असलेल्या जखमेवर मलमाचा वापर केला जातो. परंतु आसडी जखमेत खोलवर गेलेली असते. स्प्रे प्रकारातील औषधे तयार करत असताना त्यात औषधी घटकांच्या व्यतिरिक्त काही उडणशील घटक असतात. हे घटक लगेच उडून गेल्यामुळे अशा औषधांचा परिणाम जास्त काळ होत नाही. मग अशा वेळेस तेल स्वरूपातील औषधींचा वापर जास्त गुणकारी ठरतो.

औषधी वनस्पतींच्या तेलाचा वापर
कडुलिंब तेल 

लिंबोळीतून तेल काढले जाते. हे तेल जिवाणू विरोधी व परोपजीवी विरोधी आहे. या तेलाच्या अत्यंत कडू चवीमुळे ज्या वेळेस हे तेल आसडीच्या संपर्कात येते त्यातून आसडीची खाद्य खाण्याची इच्छा नष्ट होते. अशा विविध गुणांमुळे आसडीयुक्त जखमेवर कडुलिंब तेल उपयुक्त ठरते.

करंज तेल 
कडुलिंबाच्या प्रमाणेच जिवाणू व परोपजीवी यांच्या विरोधात गुणधर्म असणारे हे वनस्पती तेल. या तेलामधील आसडी मारण्याची शक्ती यासाठी आसडीयुक्त जखमेवर याचा वापर गुणकारी ठरतो.

टर्पेंटाईन तेल 
खरेतर हे एक वनस्पतिजन्य तेल आहे. आसडीयुक्त जखमेवर उपचार करत असताना केवळ औषधांच्या दुकानातून आणलेले टर्पेंटाईन तेल उपचारासाठी वापरावे. हेच तेल रंगाच्या दुकानात देखील मिळते, परंतु यात रॉकेलची भेसळ असते. म्हणून केवळ औषधी म्हणून प्रमाणित केलेले टर्पेंटाईन तेल या आजारात वापरावे.

कापूर
कापराचा वापर माश्‍यांना दूर करण्यासाठी केला जातो. कापरास असणाऱ्या विशिष्ट वासामुळे माश्‍या दूर जातात. याशिवाय कापूर हा जखम जोडण्याच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजेच इतर जखमांसोबतच आसडीयुक्त जखमेमध्ये कापूर अत्यंत गुणकारी ठरतो.

  - डॉ. सुधीर राजूरकर,  ९४२२१७५७९३, 
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)


इतर कृषिपूरक
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...