agricultural news in marathi article regarding new variety of soyabean | Agrowon

पर्वतीय, पठारी प्रदेशातील शेतीसाठी सोयाबीनची नवी जात : स्वर्ण वसुंधरा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशातील शेतीसाठी संशोधन केंद्र येथे स्वर्ण वसुंधरा ही सोयाबीनची सुधारित जात विकसित केली आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशातील शेतीसाठी संशोधन केंद्र येथे स्वर्ण वसुंधरा ही सोयाबीनची सुधारित जात विकसित केली आहे. ती भाजीसाठी म्हणजेच हिरव्या दाण्यासाठी तयार केली असून, झारखंडसह विविध राज्यांसाठी शिफारशीत आहे.

उत्तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या हिरव्या दाण्याची भाजी आवडीने खाल्ली जाते. सोयाबीनची हिरव्या अवस्थेत म्हणजेच एकूण शेंगेच्या लांबीच्या सुमारे ८० ते ९० टक्के असताना काढणी करून भाजीसाठी वापरली जाते. हे दाणे नेहमीच्या सोयाबीनपेक्षा गुणधर्माने वेगळे असतात. त्यात त्याच्या रंगानुसार शर्करेचे प्रमाण अधिक म्हणजेच ७५ टक्क्यांपर्यंत असते. या हिरव्या दाण्यांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशातील शेतीसाठी संशोधन केंद्र येथे स्वर्ण वसुंधरा ही सुधारित जात विकसित केली आहे. या जातीची शिफारस भारतातील व्यावसायिक लागवडीसाठी करण्यात आली आहे. लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांमध्ये हिरव्या शेंगाची पहिली काढणी शक्य होते. हिरव्या चमकदार शेंगातून ५० ते ५५ टक्के इतके बियांचे प्रमाण मिळू शकते. ८० ते ८५ दिवसांच्या कालावधीमध्ये साधारण तीन काढण्या शक्य होतात.

या शेंगा म्हणजे पोषकतेचा अर्क आहेत. त्यातून पाचक प्रथिने, कर्बोदके, लिपीड्स, आवश्यक मेदाम्ले, फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, जस्त, थायामिन, रिबोफ्लॅविन, ई जीवनसत्त्व या बरोबरच तंतुमय पदार्थ आणि शर्करा उपलब्ध होतात. हिरव्या शेंगाची भाजी बनवली जाते. तर पक्व झालेल्या बिया मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येतात. ही जात झारखंड आणि अन्य राज्यांमध्ये प्रसारित केली असून, त्यातून शेतकऱ्यांचीही पोषकतेची गरज भागणार आहे.

प्रक्रियेतून यशाकडे
पुणे येथील चंद्रकांत देशमुख यांनी २०१९ मध्ये संस्थेतून स्वर्ण वसुंधरा सोयाबीन जातीचे ५० किलो बियाणे मिळवले. त्यातून बियाण्यांची निर्मिती करून त्यांनी २०२० मध्ये वरपूड, जि. परभणी येथील कराराने घेतलेल्या एका शेतामध्ये दहा एकर क्षेत्रात लागवड केली. काळ्या मातीमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा वापर करताना त्यांनी ६० बाय १५ सेंमी असे अंतर ठेवले. प्रति एकर १५ क्विंटल हिरव्या शेंगाचे उत्पादन मिळाले.

त्याचे प्रति एकर अर्थशास्त्र पुढील प्रकारे ः

  • उत्पादन खर्च (जमिनीचे भाडे, मशागत, सेंद्रिय व रासायनिक खते, सिंचन, आंतरमशागत, फवारणी आणि काढणी यांचा एकत्रित ) ः ३० हजार रुपये
  • हिरव्या शेंगांचे उत्पादन ः १५ क्विंटल
  • बाजारात मिळालेला सरासरी दर ः २०० रुपये प्रति किलो
  • एकूण उत्पन्न ः ३ लाख रुपये
  • निव्वळ उत्पन्न ः २ लाख ७० हजार रुपये.

प्रक्रिया केल्याने वाढतो फायदा
शेंगांची हिरवा रंग आणि पोत तसाच राहण्यासाठी ब्लांचिंग प्रक्रिया केला. त्यामध्ये ९० अंश सेल्सिअस तापमानामध्ये शेंगा पाच मिनिटे ठेवून त्या बाहेर काढल्या. त्वरित ४ अंश सेल्सिअस इतक्या थंड पाण्यामध्ये त्या पाच मिनिटांसाठी बुडवल्या. त्यानंतर या शेंगा सामान्य तापमानाच्या पाण्यामध्ये पाच मिनिटे ठेवून त्यांची साठवण डीप फ्रिजरमध्ये केली.

डीप फ्रिजरमध्ये शेंगांची साठवण वजा १८ अंश सेल्सिअस तापमानामध्ये केली. पुढील १८ महिन्यांपर्यंत विभागून शेंगाची विक्री केली. अशा प्रकारे ब्लांचिंग व गोठवण प्रक्रिया केलेल्या शेंगा पुणे, मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद या बाजारांमध्ये मागणीनुसार पाठवल्या. या शेंगांना सरासरी ३०० रुपये प्रति किलो दर मिळाला.
ब्लांचिंग केल्यानंतर एकल बिया असलेल्या शेंगा सोलून मिठासोबत खाल्ल्या जातात. अशा बियांना सुमारे ४०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो.

काही शेंगा पूर्ण पक्व झाल्यानंतर काढणी केली. त्याचे एकरी ७ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला बाजारामध्ये १०० ते १५० रुपये प्रति किलो असा दर मिळाला.

सोयाबीन पनीर (टोफू) उत्पादन
पक्व सोयाबीन बियांपासून पनीर म्हणजेच टोफूनिर्मिती केली. साधारणपणे एक किलो बियांपासून २.२५ किलो टोफू तयार होतो. स्वर्ण वसुंधरा वाणांच्या बियांपासून बनवलेला हा टोफू पांढऱ्या रंगाचा, मऊ, जाळीदार होतो. त्याला शेंगाचा वास किंवा स्वाद अजिबात येत नाही. अशा टोफूला चांगली मागणी असून, ३०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. एक क्विंटल स्वर्ण वसुंधरा सोयाबीन बियांपासून २२५ किलो टोफू उत्पादन होतो. उत्पादनाचा खर्च १३ हजार रुपये इतका होतो. २२५ किलो टोफूच्या विक्रीतून निव्वळ नफा ५४,५०० रुपये इतका झाला.

अन्य उत्पादने 
सोयाबीन दाणे चांगले भाजून त्यापासून पीठ किंवा सत्त्व तयार केले जाते. हे सत्त्व अत्यंत पोषक असून, त्यालाही उत्तम बाजारपेठ मिळू शकते.
नुसते दाणे ८ तास पाण्यामध्ये भिजवून सोयाबीन दूध, दही, छन्ना, गुलाब जामून, आइस्क्रीम असे विविध पदार्थांचे उत्पादन शक्य आहे.


इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...