agricultural news in marathi article regarding Okra Cultivation | Agrowon

तंत्र भेंडी लागवडीचे...

डॉ. बालाजी थोरात
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

उन्हाळी भेंडीची पेरणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. पेरणी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी.

उन्हाळी भेंडीची पेरणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. पेरणी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी. गरजेनुसार विरळणी करून २ रोपांतील अंतर ३० ते ४५ सेंमी ठेवावे. लागवडीसाठी हेक्टरी १०-१२ किलो बियाणे पुरेसे आहे.

उन्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भेंडी पिकास बाजारात वर्षभर मागणी  असते. त्यामुळे भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. भेंडीमध्ये कॅल्शिअम, आयोडीन आणि जीवनसत्वे क भरपूर प्रमाणात असते. 

 • भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान या पिकास उपयुक्त असते.
 • तापमान २० ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास बियांची उगवण व झाडाची वाढ चांगली होते. आणि फूलगळ होत नाही. 
 • भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरच्या थरातून होत असते. 
 • लागवडीसाठी मध्यम भारी ते काळी कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 
 • जमिनीचा सामू ६ ते ६.८ पर्यंत  आणि क्षारता ०.२० पेक्षा कमी असावा. 
 • चोपण, क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करणे टाळावे. 
 • एकाच जमिनीत भेंडीची वारंवार लागवड करू नये. 
 • हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा.

जाती 
परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली.

बीजप्रक्रिया 

 • पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा किंवा थायरम 
 • ४ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी.

आंतरमशागत

 • दोन ते तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. 
 • गरजेनुसार २ ते ३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी. 

खत व्यवस्थापन

 • हेक्टरी १५ टन शेणखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे.
 • लागवडीवेळी  नत्राची अर्धी आणि स्फुरद, पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. 
 • पेरणीच्या एक महिन्यानंतर नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा.   

पीक व्यवस्थापन 

 • सतत एकाच जमिनीत भेंडीचे पीक घेऊ नये. भेंडीचे पीक घेण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
 • पीक वाढीच्या अवस्थेत नत्र खताचा वापर कमी करून पोषण संतुलन करावे.
 • शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी गंध सापळे व प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
 • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झेंडूचे आंतरपीक घ्यावे. 
 • किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणे करावा.

लागवड

 • पेरणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी.
 • सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. 
 •  पेरणी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी. गरजेनुसार विरळणी करून २ रोपांतील अंतर ३० ते ४५ सेंमी ठेवावे.
 •  लागवडीसाठी हेक्टरी १०-१२ किलो बियाणे पुरेसे आहे.
 • पेरणीनंतर पिकांस हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ ते ७ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  
 • प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्‍यास भेंडी पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 
 • उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी २ ओळींत सुक्या गवताचे आच्छादन करावे.

- डॉ. बालाजी थोरात,  ९१४५७ ७२२९३
(डॉ.. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने...नगरः जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने...
ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा...नाशिक : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण...
माळढोक पक्षी अभयारण्यात आग, २५...सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक...
अकोल्यात ४९७ गावांमध्ये पाणीटंचाईची...अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी...
खंडित केलेल्या कृषिपंपाच्या जोडणीचे काय?नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात...
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याला...मुंबई : अर्थसंकल्प मांडणे आम्हाला नवे नाही. मात्र...
उन्हाळी मूग, उडीद लागवडरब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर सिंचनाखाली...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या...बुलडाणा ः पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
शेतकरी, ग्रामीण भागाचे राज्याच्या...पुणे : राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व...
पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार मानधन द्यानाशिक : पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव...
...त्या तिघींनी पापड उद्योगातून जपली...कोल्हापूर : ‘त्या‘ तिघी एकमेकाला सावरणाऱ्या....
हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते...सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला...
‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन...अकोला : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई...
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने...
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने...नागपूर : यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात...
म्हैसाळ योजनेचे पाणी तिसऱ्या टप्प्यात... सांगली : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू...
कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे ः डॉ....अंबाजोगाई, जि. बीड : नोकरीच्या मागे न लागता...