agricultural news in marathi article regarding pest management in Cabbage crop | Agrowon

असे करा कोबीवर्गीय पिकांतील किडींचे नियंत्रण

डॉ. संजोग बोकन, डॉ. बसवराज भेदे
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा, चोकोनी ठिपक्यांच्या पतंगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत दिसून येतो. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
 

कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा, चोकोनी ठिपक्यांच्या पतंगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत दिसून येतो. सध्याचे थंड व मध्येच येणारे ढगाळ वातावरण या किडींच्या वाढीसाठी पोषक आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.

मावा : (Aphid)

 • फिक्कट हिरवा रंग, आकाराने लहान व शरीराने मृदू.
 • मादी अंडी देण्याऐवजी सरळ १२ ते २४ पिलांना जन्म देते. त्यांचे ७ ते ९ दिवसांत प्रौढांमध्ये रूपांतर होते. प्रौढ मादी लगेच पिलांना जन्म देण्यास सुरुवात करते.
 • प्रादुर्भावाची वेळ : पिकाच्या सुरुवातीपासून पीक काढणीपर्यंत.
 • नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. पाने पिवळी होऊन वाळून गळतात.
 • या किडीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या गोड चिकट पदार्थांवर काळ्या बुरशीची वाढ होते. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत बाधा येते. झाडाची वाढ खुंटते. उत्पादनात घट होते.

चौकोनी ठिपक्यांचा पतंग : (Diamond back moth)

 • भुरकट रंगाच्या पाकोळी पतंगाच्या पाठीवर चौकोनी पांढरा ठिपका असतो.
 • मादी पतंग कोबीवर्गीय पिकांच्या पानाखालील भागात एक-एक अशी ५० ते ६० अंडी घालते.
 • ५ ते ६ दिवसांत त्यातून फिक्कट हिरव्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. अळी पिवळसर हिरव्या रंगाची असून, शरीरावर बारीक काळे केस असतात. अळी अवस्था १४ ते १५ दिवसांची असते.
 • पानावर ५ ते ७ दिवसांसाठी सुप्तावस्थेत जाते.
 • ही कीड मार्चपर्यंत कार्यक्षम असते.
 • नुकसानीचा प्रकार : अळी पानांना छिद्रे पाडून त्यातील हरितद्रव्य खाते. अधिक प्रादुर्भावामध्ये पानांची चाळण होऊन पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.

एकात्मिक व्यवस्थापन 

 • प्रादुर्भावग्रस्त पाने दिसल्यास तोडून टाकावीत.
 • कोबीच्या २० ते २२ ओळीनंतर मोहरीच्या दोन ओळी लावाव्यात. या झाडांकडे चौकोनी ठिपक्यांचे पतंग ८० ते ९० टक्के आकर्षित होतात.
 • एकरी ३ ते ४ कामगंध सापळे लावावेत. त्यात झायलोल्युरचा वापर करावा.
 • शेतात एकरी ८ ते १० पक्षिथांबे लावल्यास ते अळ्यांवर नियंत्रण ठेवतात.
 • पतंगवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिसची २० हजार अंडी किंवा १ कार्ड ७ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा प्रति एकरी शेतामध्ये लावावे.
 • सुरुवातीला निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. निसर्गतः ढालकिडा, सिरफीड माशी यांसारख्या मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.

आर्थिक नुकसान पातळी 
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या २ अळ्या प्रति झाड
 

पीक कीड कीटकनाशक (ग्रॅम/ मिलि प्रति लि.पाणी) प्रतीक्षा कालावधी* (दिवस)
पानकोबी चौकोनी ठिपक्यांचा पतंग इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.३ किंवा
स्पिनोसॅड (२.५ टक्के एससी) १.२ किंवा
    क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.१ किंवा
    सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.२ किंवा
    इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.५ किंवा
    फ्ल्युबेंडाअमाईड (३९.३५ एससी) ०.१
फुलकोबी चौकोनी ठिपक्याचा पतंग स्पिनोसॅड (२.५ एससी) १.२ किंवा
पानकोबी मावा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.२ किंवा

टीप : कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.

(*प्रतीक्षा कालावधी म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर काढणी करण्यास सुरक्षित असल्याचा काळ. यानंतर पिकाची काढणी करावी. फवारणीनंतर प्रतीक्षा कालावधीआधी काढणी केल्यास भाज्यांमध्ये कीटकनाशकाचा अंश राहू शकतो. ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते.)

संपर्क- डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००
डॉ. बसवराज भेदे, ७५८८०८२०२८
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर ताज्या घडामोडी
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजनामहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डद्वारे...
कृषी सल्ला (परभणी विभाग)पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान...
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...