agricultural news in marathi article regarding pig rearing. | Page 3 ||| Agrowon

वराहपालन सुरू करताना...

डॉ. धीरज पाटील
रविवार, 23 मे 2021

वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून घेण्यासाठी  आर्थिक गुणवत्तेची छोटीशी चाचणी घ्यावी. त्यानंतरच या व्यवसायाला सुरवात करावी.
 

वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून घेण्यासाठी  आर्थिक गुणवत्तेची छोटीशी चाचणी घ्यावी. त्यानंतरच या व्यवसायाला सुरवात करावी.

पारंपरिक पशुपालनाच्या बरोबरीने  बाजारपेठेची मागणी लक्षात घेता आपल्याकडे काही प्रमाणात वराहपालन व्यवसायाला सुरुवात झाली आहे. वराहांचा गर्भधारणा कालावधी  ११४ दिवसांचा असतो. एकाच वेळी ७ ते १५ पिले मिळण्याची  शक्यता असते. सहा महिन्यात मांस उत्पादनासाठी वराह तयार होतात. वराहांना घरगुती टाकाऊ अन्न, हॉटेल, खाणावळी, समारंभातील उरलेल्या अन्नाचा वापर खाद्य म्हणून करता येतो. उत्तम मांस - हाडे यांचे गुणोत्तर (७०%) आहे.  बाजारात मांस, फॅट (लार्ड), चामड्याला मागणी आहे. या जरी व्यवसायाच्यादृष्टीने उपयुक्त बाजू असल्या तरी आपल्याकडील भांडवल, मनुष्यबळ, व्यवस्थापन तंत्र आणि विक्रीचे नियोजन या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

योग्य जागा 

 • सर्वसाधारणपणे शहरा जवळील पट्ट्यात  वराहपालनासाठी शेड उभारावी. जेणेकरून  जवळपासच्या बाजारात  वराह मांससाठी  अधिक मागणी असेल. हॉटेल, वसतिगृहे आणि खाणावळी, धाबे  इत्यादीमधील उर्वरित अन्न हे वराह पोसण्यासाठी उपलब्ध असेल. 
 • वराह फार्म थोड्या उंच सपाट ठिकाणी असावा.पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य यंत्रणा तसेच वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा असावी.  
 • वराह हे बहू-प्रजनक आहेत. मोठ्या संख्येने व वेगाने वाढणारे पशुधन आहे, म्हणून भविष्यात वाढ करता येईल अशी जागा असावी.  
 • फार्मवर  स्टोअर, कार्यालये, कर्मचाऱ्यांसाठी खोल्या आणि रस्ते इत्यादींसाठीही पुरेशी जागा असावी. वेगवेगळ्या वयोगटातील वराहांसाठी सर्वसमावेशक  एक प्रणाली असावी. तसेच १० टक्के अधिक जागा असणे आवश्यक आहे.

भांडवल आणि खर्चाचे मूल्यमापन  

 • वराह पालनविषयक तांत्रिक आणि आर्थिक क्षमता समजल्यानंतर इच्छुक पशुपालकाला अंदाजित रकमेची व्यवस्था करावी. 
 • शासनाच्या विविध विकास कार्यक्रमांतर्गत वराह संगोपनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. वराह पालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून घेण्यासाठी  आर्थिक गुणवत्तेची छोटीशी चाचणी घ्यावी. ही चाचणी प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित आहे, 
 • एकूण उत्पन्न : वराह फार्म  मधील सर्व उत्पादनांची विक्री करुन  मिळणारी एकूण रक्कम पुरेशी आहे का?
 • परतफेड करण्याची क्षमता : फार्मच्या एकूण उत्पन्नापैकी  काही आंशिक कर्ज परतफेड  घेण्यासाठी भाग राखून ठेवावा.
 • आपत्ती सहन करण्याची शक्ती : अचानक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती,रोग,मरतूक, मानवनिर्मित आपत्ती, चोरी इत्यादी  कमतरतेचा सामना करण्यासाठी लागणारे भांडवल याची तपासणी केल्यावर योग्य निर्णय घ्यावा.

  व्यवसाय नियोजन  

 • जवळच्या बाजारात मांसाची मागणी आणि व्यवसायासाठी योग्य ठिकाण आणि किमतीबद्दल संपूर्ण माहिती आवश्यक आहे. 
 • वराहाच्या जाती (लार्ज व्हाइट यॉर्कशायर, मिडल व्हाईट यॉर्कशायर, बर्कशायर, ड्युरॉक, लँड्रेस
  भारतीय जाती : घुंगरू, नियन-मेघा  इत्यादी) याची माहिती घ्यावी.
 • युनिट उभारण्यासाठी लागणारे सामान, वराहाच्या खुराकाची व्यवस्था, अंदाजित गुंतवणूक, शासकीय योजना, कर्ज व्यवस्था इत्यादीं विषयी सविस्तर माहिती. 
 • वराह पालन आणि त्यांचे प्रजनन सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.
 • व्यवसायाच्या ठिकाणी स्थानिक पशुधनाची स्थिती, या अहवालासाठी संबंधित सर्वेक्षण, पशुगणना अहवाल पहावा. 
 • आहार नियोजन, कुंपण व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धत. व्यवसायातील नफा आणि तोटा यांचे अंदाज. 
 • पशुवैद्यकीय विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, शासकीय पशुसंवर्धन विभाग, संशोधन संस्थांकडून प्रशिक्षण आवश्यक. 

- डॉ. धीरज पाटील,  ९५५२१४४३४९
(गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब)


इतर कृषिपूरक
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...