agricultural news in marathi article regarding Rabbi Sorghum Cultivation | Agrowon

तंत्र रब्बी ज्वारी लागवडीचे...

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्‍यक आहे. हस्ताच्या पावसानंतर केलेली पेरणी फायदेशीर ठरते.
 

कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्‍यक आहे. हस्ताच्या पावसानंतर केलेली पेरणी फायदेशीर ठरते.

रब्बी ज्वारीच्या दर्जेदार उत्पादनासाठी संकरित व सुधारित जातींची निवड करावी. जमिनीच्या खोलीनुसार जातींची निवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. पाऊस आणि जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेल्या सुधारित/संकरित जातींची जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करावी.

जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड 
 

हलकी जमीन (खोली ३० सेंमी) फुले अनुराधा, फुले माऊली
मध्यम जमीन (खोली ६० सेंमी) फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१,
भारी जमीन( ६० सेंमी पेक्षा जास्त) सुधारित वाण : फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती.
संकरित वाण : सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९.
बागायती फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९.
 हुरड्यासाठी  फुले उत्तरा, फुले मधुर
लाह्यांसाठी फुले पंचमी
पापडासाठी फुले रोहिणी

 
जातींची वैशिष्ट्ये 
फुले अनुराधा 

 • कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीत लागवडीस योग्य.
 • पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस.
 • अवर्षणास प्रतिकारक्षम.
 • भाकरी उत्कृष्ट, चवदार
 • कडबा अधिक पौष्टिक व पाचक.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
 • कोरडवाहू जमिनीत धान्य उत्पादन हेक्टरी ८ ते १० क्विंटल व कडबा ३० ते ३५ क्विंटल.

फुले माऊली 

 • हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीस योग्य.
 • पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस.
 • भाकरीची चव उत्तम
 • कडबा पौष्टिक व चवदार
 • धान्याचे उत्पादन : हलक्या जमिनीत हेक्टरी ७ ते ८ क्विंटल व कडबा २० ते ३० क्विंटल
 • धान्याचे उत्पादन : मध्यम जमिनीत हेक्टरी १५ ते २० क्विंटल व कडबा ४० ते ५० क्विंटल

फुले सुचित्रा 

 • मध्यम जमिनीसाठी शिफारस
 • पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस
 • उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत
 • धान्य उत्पादन २४ ते २८ क्विंटल व कडबा ६० ते ६५ क्विंटल

फुले वसुधा 

 • भारी, कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस
 • पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस
 • मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार दाणे.
 • भाकरीची चव उत्तम
 • ताटे भरीव, रसदार व गोड
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
 • कोरडवाहू धान्य उत्पादन हेक्टरी २४ ते २८ क्विंटल व कडबा ६५ ते ७० क्विंटल
 • बागायती धान्य उत्पादन ३० ते ३५ क्विंटल व कडबा ७०ते ७५ क्विंटल

फुले यशोदा 

 • भारी जमिनीत लागवडीस योग्य.
 • पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२५ दिवस
 • दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार
 • भाकरीची चव चांगली
 • कोरडवाहू : धान्य उत्पादन हेक्टरी २५ ते २८ क्विंटल व कडबा ६० ते ६५ क्विंटल
 • बागायती : धान्य उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व कडबा ७० ते ८० क्विंटल

सी.एस.व्ही.२२ 

 • भारी, कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.
 • पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस
 • दाणे मोत्यासारखे चमकदार.
 • भाकरीची चव चांगली
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
 • कोरडवाहू : धान्य उत्पादन हेक्टरी २४ ते २८ क्विंटल व कडबा ६५ ते ७० क्विंटल
 • बागायती : धान्य उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व कडबा ७० ते ८० क्विंटल

परभणी मोती 

 • भारी, कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस
 • पक्व होण्याचा कालावधी १२५ ते १३० दिवस
 • मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार दाणे.
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
 • कोरडवाहू : धान्य उत्पादन हेक्टरी १७ क्विंटल व कडबा ५० ते ६० क्विंटल
 • बागायती : धान्य उत्पादन हेक्टरी ३२ क्विंटल व कडबा ६० ते ७० क्विंटल

फुले रेवती 

 • भारी, बागायती जमिनीसाठी शिफारस
 • पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस
 • मोत्यासारखे, पांढरे चमकदार दाणे
 • भाकरीची चव उत्कृष्ट
 • कडबा पौष्टिक व अधिक पाचक
 • धान्य उत्पादन ४० ते ४५ क्विंटल व कडबा ९० ते १०० क्विंटल

मालदांडी ३५-१ 

 • मध्यम, खोल जमिनीत कोरडवाहूसाठी शिफारस
 • पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस
 • चमकदार, पांढरे दाणे
 • भाकरीची चव चांगली
 • खोडमाशी प्रतिकारक्षम
 • धान्य उत्पादन हेक्टरी १५ ते १८ क्विंटल व कडबा ६० क्विंटल

फुले उत्तरा 

 • हुरड्यासाठी शिफारस
 • हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस
 • भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात. सरासरी ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
 • हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.

फुले पंचमी 

 • लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) ८७.४ टक्के
 • लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात
 • खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
 • महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये लाह्यांसाठी प्रसारित

पेरणीचे नियोजन 

 • कोरडवाहू पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्‍यक आहे.
 • योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
 • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बीज प्रकिया केल्यामुळे काणी रोग येत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
 • पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
 • पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ सेंमी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे.
 • अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ बाय १२ सेंमी अंतरावर करावी. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपांतील अंतर २० सेंमी ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृद शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. नगर)


इतर कृषी सल्ला
ड्रॅगनच्या विळख्यातला ‘टोनले साप’एखादं भक्ष्य खाऊन फुगलेल्या सापाप्रमाणं दिसणारं ‘...
वनशेतीमध्ये चिंच लागवडकोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड...
असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे...सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्येएक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०....
द्राक्ष बागेत पावसाळी स्थितीमुळे...गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही...
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजनमृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग...
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा...रोपवाटिकेमध्ये उत्तम दर्जाच्या कलम काडीइतकेच...
भाजीपाला पिकांचे सुधारित व्यवस्थापनकोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत...
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवाभारतात अल्पभूधारकांचे प्रमाणे ११७ दशलक्ष असून, ते...
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यताकोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व...
द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास...
शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी...गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या...
जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म...माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म...
सुधारित तंत्राने करा करडई लागवडकरडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे...
भेटीचे सोने करता आले पाहिजे...भात शेतीमध्ये पाणथळ जागा. या जागाच जल आणि...
मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र,...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....