भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगर

भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने या लेखात भरडधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर दैनंदिन आहारामध्ये करण्याची आवश्यकता आहे.
लहान आकाराची भरड धान्ये ही पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहेत.
लहान आकाराची भरड धान्ये ही पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहेत.

भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने या लेखात भरडधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर दैनंदिन आहारामध्ये करण्याची आवश्यकता आहे. लहान दाण्याची भरड धान्ये ही कमी पावसाच्या (२०० ते ६०० मिमी) परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. बागायती नसलेल्या क्षेत्रामध्ये ही धान्ये उपयुक्त ठरू शकतात. बहुतांश वेळा या पिकांमध्ये रासायनिक निविष्ठांचा (उदा. खते आणि कीटकनाशके) वापर अल्प प्रमाणात होतो. भरडधान्य अंतर्गत ज्वारी, नाचणी, बाजरी, रागी/मांडुआ आणि लहान बाजरी उदा. कुटकी, कोडो, सावा/झांगोरा, कांगनी/काकून, चीना अशी पिके येतात. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून, त्यांना ‘पौष्टिक तृणधान्य’ (न्यूट्री-सिरियल्स) म्हणून ओळखली जातात. त्यांचा मानवी पोषण खाद्य, पशूखाद्य आणि औद्योगिक उत्पादनात वापरले जाऊ शकतात. बाजरी  प्रथिने : ११.६ टक्के कर्बोदके : ६७.५ टक्के स्निग्ध पदार्थ : ५ टक्के खनिजे : २.३ टक्के

  • पाऊस उशिरा-अनिश्चित व कमी प्रमाणात झाला तरी अन्य तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे.
  • बाजरीमध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असून, ते पेशींमधील ऊर्जा आणि अन्य खनिज पदार्थ साठविण्यास मदत करतात. बहुधा हिवाळ्यात शरीरात उबदारपणा आणण्यासाठी आणि ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत म्हणून बाजरी वापरली जाते. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण गहू, मका, भात, ज्वारी इ. पिकापेक्षा जास्त असते. आहारात बाजरीचा समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. बाजरी हे ग्लुटेन मुक्त धान्य असल्याने ग्लुटेनची ॲलर्जी असलेल्या लोकांना बाजरी एक उत्तम पर्याय ठरतो.
  • ज्वारी प्रथिने : १०.४ टक्के कर्बोदके : ७२.६ टक्के स्निग्ध पदार्थ : १.९ टक्के खनिजे : १.६ टक्के भारतासह महाराष्ट्रामध्ये ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचे सेवनही केले जाते. ज्वारीची भाकरी पचायला खूप हलकी असते. त्यात पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह आणि जस्त आढळते. ग्लुटेन नसलेल्या पदार्थाची निर्मिती ज्वारीच्या पिठापासून करता येते. ज्वारीयुक्त आहारामुळे पोटाचे आजार, त्वचेचे आजार कमी होण्यास मदत होते. आजारी व्यक्ती किंवा लहान बालकांसाठी ज्वारीची भाकरी दूध रबडीचा आहार पचनास सुलभ होते. नाचणी  प्रथिने : ७.३ टक्के कर्बोदके : ७२ टक्के स्निग्ध पदार्थ : १.३ टक्के खनिजे : २.७ टक्के नाचणीमध्ये कोणत्याही अन्य भरडधान्यांपेक्षा या प्रकारात सर्वाधिक कॅल्शिअम असते. मधुमेह आजारासाठी पथ्यकारक धान्य म्हणूनही नाचणी उपयुक्त ठरू शकते. यातील तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठता, कोलेस्टेरॉल आणि आतड्यांसंबंधी कर्करोग याला आळा बसतो. दररोजच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. नागलीमधील अमिनो आम्ले हे अँटिऑक्सिडेंटचे काम करतात. त्यातील फायटो रसायनामुळे पचनक्रिया सावकाश होते. डायबेटिक रुग्णांच्या बाबतीत नागली ही रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. नागली धान्यातील लोह अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र, बाजरी आणि नाचणी एकाच दिवसात अनेक वेळा (अति प्रमाणात) सेवन केल्यास या दोन्हीमध्ये असलेले गोईट्रोजेन्स हे थायरॉईड ग्रंथींना हानी पोचवू शकते. राळे प्रथिने : १२.३ टक्के कर्बोदके : ६०.९ टक्के स्निग्ध पदार्थ: ४.३ टक्के खनिजे: ३.३ टक्के राळे पिकाची मुळस्थान हे उत्तर चीन असून, चिनी भाषेत याला शाओमी म्हणजेच छोटा भात म्हणून ओळखले जाते. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये अगदी पूर्वापार पिकवल्या जाणाऱ्या धान्यांमध्ये राळे या पिकाचा समावेश आहे. या धान्यांचा वापर प्रसवोत्तर काळात शारीरिक ऊर्जा भरून येण्यासाठी केला जातो. राळे हे पाचक असून, त्यात लोह आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. भारतातील काही भागांत उपवासासाठी वापरले जाते. वरई  प्रथिने : ८.७ टक्के कर्बोदके : ७५.७ टक्के स्निग्ध पदार्थ : ५.३ टक्के खनिजे : १.७ टक्के भरड धान्य प्रकारातील सर्वात लहान व एक विश्वासार्ह पीक असून, संपूर्ण भारतभर लागवडीखाली आहे. हे लवकर शिजते. यात उच्च लोह धातू असल्याने विशेषत: अशक्तपणा असलेल्यांनी तांदळाऐवजी याचा वापर करावा. कोडो/ कोद्रा  प्रथिने : ८.३ टक्के कर्बोदके : ६५.९ टक्के स्निग्ध पदार्थ : १.४ टक्के खनिजे : २.६ टक्के कोद्रा हे पीकही हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यात लेसिथिनचे प्रमाण जास्त असून, मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी ते उत्कृष्ट मानले जाते. यात बी जीवनसत्त्वे, विशेषत: नियासिन, बी ६ आणि फॉलिक ऍसिड तसेच कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि जस्त सारख्या खनिजांनी देखील समृद्ध आहे. कांग प्रथिने : १२.५ टक्के कर्बोदके :  ७०.४ टक्के स्निग्ध पदार्थ :  १.१ टक्के खनिजे :  १.९ टक्के यात प्रथिनांचे प्रमाण गव्हाच्या बरोबरीने असून, प्रथिने उच्च प्रतिचे आहेत. त्यात आवश्यक ती अमिनो आम्ले (ल्युसीन, आयसोल्यूसीन आणि मेथिओनिन) असून, ते ग्लुटेन मुक्तही आहे. राळ्याप्रमाणेच चेना हेही पुरातन धान्य असून, ते अत्यंत स्वादिष्ट आणि समशीतोष्ण भरडधान्यांपैकी एक आहे. - डॉ. रश्मी बंगाळे, ९६५७८८१७६६ गणेश चवरे, ८१०८१३८०८० (वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी प्रौद्योगिकी अनुप्रयोग संशोधन संस्था, जोन VIII, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com