agricultural news in marathi Atal Incubation Center: New horizons of knowledge, research | Page 2 ||| Agrowon

अटल इनक्युबेशन सेंटर : ज्ञान, संशोधनाचे नवं क्षितिज

कल्याण पाचांगणे
शनिवार, 30 ऑक्टोबर 2021

बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ‘अटल इनक्युबेशन सेंटर’चे काम सुरू झाले आहे. या सेंटरमुळे शिक्षकांबरोबर विद्यार्थींचा उद्योगपती आणि व्यावसायिकांशी सतत संवाद होणार आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांमधून संशोधनाला चालना आणि स्टार्ट-अप कंपन्यांसाठी हे सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे.
 

बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून ‘अटल इनक्युबेशन सेंटर’चे काम सुरू झाले आहे. या सेंटरमुळे शिक्षकांबरोबर विद्यार्थींचा उद्योगपती आणि व्यावसायिकांशी सतत संवाद होणार आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांमधून संशोधनाला चालना आणि स्टार्ट-अप कंपन्यांसाठी हे सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे.

देशाची वेगाने प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांची संशोधनात्मक बुद्धिमत्ता, दृष्टिकोन आणि कल्पकता वाढविणे गरजेचे आहे. औपचारिक शिक्षण व्यवस्थेसोबत संशोधन, उपयोजन, उद्योजकता आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे ‘अटल इनक्युबेशन सेंटर’कडून केले जात आहेत. या उपक्रमातून नवीन उद्योजकांना गुरुकिल्ली आणि औद्योगिक क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत देशभरात नव्याने शंभर ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ची स्थापन करण्यात आली. त्यातील १४ नवीन इनक्युबेशन सेंटर ही महाराष्ट्रामध्ये आहेत. 

नवोदित ‘स्टार्टअप’ना त्यांच्या अभिनव संकल्पना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी ही चांगली संधी आहे. नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी तसेच तरुणांमधील नवविचार, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘एआयसी एडीटी अटल इनक्युबेशन सेंटर’च्या माध्यमातून अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी पुढाकार घेतला. बारामतीमधील ‘एआयसी एडीटी अटल इनक्युबेशन सेंटर’ हे कृषी व संलग्न क्षेत्रातील सृजनात्मक व उद्यमशील स्टार्टअपसाठी काम करीत आहे. या सेंटरचे काम १ एप्रिल, २०१९ पासून अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बारामती कृषी महाविद्यालयाच्या आवारात सुरू झाले. ‘ट्रस्ट’ने इनक्युबेशन सेंटरसाठी स्वतंत्र पंचतारांकित इमारत उभारली आहे. स्टार्टअपसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा म्हणजेच फॅबलॅब व मेकरस्पेस लॅब, फूड इनोव्हेशन लॅब, मीडिया लॅब, अॅग्री इनोव्हेशन लॅब तसेच को-वर्किंग स्पेस, ट्रेनिंग रूम, लीगल व आयपी सेल या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आजी-माजी विद्यार्थी, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यापीठाशी विविध संशोधन व विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या संस्था व कंपन्या, ग्रासरूट इनोव्हेटर्स आणि नवा पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना या प्रकल्पाचा लाभ घेता येईल.

अशी आहे ‘स्टार्टअप’ संकल्पना  

  • एखादे नवे संशोधन किंवा नवी संकल्पना जी व्यावसायिकदृष्ट्या किंवा समाजासाठी उपयुक्त ठरू शकते, तसेच त्यात तंत्रज्ञानाचा वापर असेल तर त्या उत्पादनाला किंवा संकल्पनेला डीआयपीपी विभाग ‘स्टार्ट अप’ म्हणून मान्यता देते.
  • दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करणे, तसेच जग बदलणाऱ्या नवीन संकल्पनांना स्टार्टअप टेक्नॉलॉजीची मदत मिळत आहे.
  • पारंपरिक बिझनेस मॉडेलपेक्षा वेगळ्या पद्धतीने ‘स्टार्ट अप’ची समीकरणे जुळत असल्याने या कंपन्या अतिशय कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर स्वत:चा विस्तार करतात. अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या विविध संधीदेखील उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या दैनंदिन  आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या स्टार्ट अपकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही.

आर्थिक, पायाभूत सुविधांसाठी मदत 
येत्या काळात विद्यार्थी, प्राध्यापक, आणि संशोधकांमध्ये उद्योजकता संस्कृती वाढविणे, विशिष्ट क्षेत्रे आणि डिझाइन उत्पादनांमधील विकास प्रक्रियांचा आरंभ करणे, आर्थिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर इनक्युबेशन सेंटरचा भर आहे. निती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेक्शन-८ कंपनी नियमाच्या अनुषंगाने ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ आणि सहयोगींमध्ये क्रॉस-नेटवर्किंगद्वारे औद्योगिक संकल्पना वाढीसाठी मार्गदर्शन मिळत आहे. 

औपचारिक शिक्षण व्यवस्थेसोबत संशोधन, उपयोजन, उद्योजकता आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न या सेंटरकडून केले जातात. या केंद्रात इनक्युबेशन प्रोग्रॅमसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी जागा, प्रयोगशाळा, इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था, मार्गदर्शन व उद्योग सुरू करण्यासाठी बीज भांडवल सुविधा अटल इनक्युबेशन सेंटरकडून पुरवण्यात येतात.

अटल इनक्युबेशन सेंटरची उद्दिष्टे  

  • नवीन उद्योजकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, स्टार्टअप कंपनी स्थापनेसाठी मदत.
  • को-वर्किंग स्पेस आणि तज्ज्ञ व्यक्तींची मेंटरशिप.
  • नवसंकल्पना मांडणारे विद्यार्थी व संशोधक, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये समन्वय. 
  • नवसंकल्पना मांडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोटोटाइप तयार करण्यासाठी फॅबलॅब आणि मेकरस्पेस इनोव्हेशन्ससाठी प्रयोगशाळा. 
  • बाजारपेठेचा अभ्यास, मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन. महिला उद्योजकांना प्रोत्साहन.

नव-उद्योजकांसाठी ‘अटल इनक्युबेशन सेंटर’

  • देशाच्या कृषिविषयक शैक्षणिक उपक्रमांमध्ये बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने लौकिक मिळवला आहे. खासगी कृषी महाविद्यालयासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून दिली जाणारी अधिस्वीकृती मिळवण्याचा मान ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयास मिळाला. निष्णात मनुष्यबळ, सुसज्ज प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम आदी वैशिष्ट्ये असलेल्या ट्रस्टच्या शैक्षणिक प्रांगणात आता नव-उद्योजकांसाठी अटल इनक्युबेशन सेंटर फायदेशीर ठरणार आहे, असे मत इनक्युबेशन सेंटरच्या प्रकल्पाधिकारी जया तिवारी यांनी व्यक्त केले.
  • महाराष्ट्राच्या मातीत आम्हाला आता नोकरी शोधणारा नव्हे, तर नोकरी देणारा युवा वर्ग तयार करायचा आहे. ते आव्हान अटल इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आम्ही स्वीकारले आहे, अशी माहिती इनक्युबेशन सेंटरच्या व्यवस्थापिका सोनाली सस्ते यांनी दिली.

‘को-वर्किंग स्पेस’ची सुविधा
परदेशी कंपनीचा प्रतिनिधी, पार्ट टाइम नोकरदार, फ्री-लान्सर, घरातूनच काम करणारे किंवा ‘स्टार्ट अप’मधला तरुणवर्ग  या सगळ्यांना व्यवसाय किंवा नोकरीतील कामासाठी स्वतंत्र जागा घेणे परवडत नाही. एकट्याच्या कामासाठी जागेमध्ये पैसा गुंतवणे अनेकांना रास्त वाटत नाही, म्हणूनच अटल इनक्युबेशन सेंटर मार्फत ‘को-वर्किंग स्पेस’ या नव्या संकल्पनेअंतर्गत नव-उद्योजकांना सोयीचा आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये टेबल-खुर्ची, चोवीस तास इंटरनेट सुविधा, चहा-पाणी-स्नॅकची व्यवस्था, स्कॅनर-प्रिंटरची सोय, मीटिंग रूम अशा सोयीसुविधा आहेत.

नवोदित ‘स्टार्टअप’साठी भरीव मदत 
कृषी, अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान आणि औषध निर्माणशास्त्र या क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करू शकणाऱ्या आणि उद्योगात रूपांतर होऊ शकणाऱ्या कल्पना घेऊन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकही या केंद्रातील इनक्युबेशन प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊ शकतील. संशोधकांनी बनवलेले उपकरण, यंत्राची तपासणी करून त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी उद्योजकाला मदतीबरोबरीने पेटंट, परवाना, कायदेशीर मान्यता याची पूर्तता करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे संशोधक किंवा विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन हे फक्त प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता ते शेतकरी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अटल इनक्युबेशन सेंटर मार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. आतापर्यंत सुमारे ३२ विद्यार्थी आणि २५ शेतकरी उत्पादक कंपन्यांसह नव-उद्योजकांनी आपल्या ‘स्टार्टअप’साठी प्रोटोटाइप निर्मिती, कंपनी नोंदणी, नवीन उत्पादन, विक्री नियोजन, व्यवसाय आराखडा, प्राथमिक बीज भांडवल आणि गुंतवणूक या सुविधांचा लाभ घेतला आहे. भविष्यात देखील नावीन्यपूर्ण उद्योजक आणि नवोदित स्टार्टअप यांच्यासाठी भरीव योगदान देण्यासाठी अटल इनक्युबेशन सेंटर कटिबद्ध आहे, अशी माहिती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ नीलेश नलावडे यांनी दिली.


इतर कृषी सल्ला
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके...
जाणून घ्या उसाला तुरा येण्याची कारणे रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता,...
बटाटा घाऊक संकलन अन्‌ विक्री शेतकरी उत्पादक कंपनीने बटाटा ...
हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक...हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी...
शेतकरी नियोजनः पीक हरभराआमचे दरवर्षी सुमारे ४० ते ४५ एकरांवर हरभरा...
बटाटा मूल्यसाखळीतील विविध टप्पे..बटाटा बेणे ते बाजारपेठ असा प्रवास गृहीत धरला तर...
मिरची पिकावर नव्या फुलकिडीचा प्रादुर्भावमिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड...
अंजीर पिकातील तांबेरा नियंत्रणअंजीर फळ पिकावर अन्य फळझाडांच्या तुलनेत कमी...
उन्हाळी मूग लागवडीचे तंत्रमुगाच्या वैभव आणि बी.पी.एम.आर.१४५ या जाती...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
द्राक्ष बागेतील भुरी रोगाची लक्षणे अन्...या वर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच...