agricultural news in marathi Automated poultry business producing two lakh birds per month | Agrowon

महिना दोन लाख पक्षी उत्पादनाचा स्वयंचलित पोल्ट्री व्यवसाय

विनोद इंगोले
मंगळवार, 27 एप्रिल 2021

तरोडा (जि. यवतमाळ) येथील देवेंद्र भोयर यांनी शास्त्रीय व स्वयंचलित पद्धतीचा ब्रॉयलर पोल्ट्री फार्म वृद्धिंगत केला आहे. चार लाख चौरस फूट क्षेत्रात उभारलेल्या विविध शेडमध्ये महिन्याला दोन लाख पक्ष्यांचे उत्पादन ते घेतात.
 

तरोडा (जि. यवतमाळ) येथील देवेंद्र भोयर यांनी ३० वर्षांच्या अनुभवातून शास्त्रीय व स्वयंचलित पद्धतीचा ब्रॉयलर पोल्ट्री फार्म वृद्धिंगत केला आहे. चार लाख चौरस फूट क्षेत्रात उभारलेल्या विविध शेडमध्ये महिन्याला दोन लाख पक्ष्यांचे उत्पादन ते घेतात. ब्रीडर फार्मही अलीकडेच विकसित केला आहे.

यवतमाळ येथे वास्तव्यास असलेल्या देवेंद्र भोयर यांनी चिकाटीने व सातत्यपूर्ण कामांतून ब्रॉयलर पक्षांच्या पोल्ट्री उद्योगात स्वतःची ठळक ओळख तयार केली आहे. त्यांचे वडील एकनाथराव जिल्हा परिषदेत अधीक्षक पदावर नोकरीवर होते. त्यांचे निधन झाल्यानंतर प्रापंचिक गरजा भागविताना घरच्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागला. दरम्यान, देवेंद्र यांनी कुटुंब चालवण्यासाठी धडपड सुरू केली. क्रिकेट क्‍लबच्या वतीने खेळविण्यात आलेल्या सामन्यांमधून त्यांना बक्षिसे मिळत गेली.

रोजगाराच्या शोधात असलेल्या देवेंद्र यांनी त्याचा आधार घेत यवतमाळ येथील घरामागेच छोटी पोल्ट्री सुरू केली. त्या वेळी जबलपूर येथून आणलेले अवघे १०० पक्षी होते.

व्यवसाय विस्तार

 • देवेंद्र यांच्याकडे पोल्ट्री व्यवसाय वाढीसाठी जागा नव्हती. घरी दुधाचा रतीब घालण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडे त्यांनी जागेची मागणी केली. त्यास होकार मिळताच व्यवसायाचे स्थलांतर केले.
 • बॅंकेकडूनही कर्ज घेतले. अभ्यास, शिक्षण, शास्त्रीय व्यवस्थापन, जोखीम घेण्याची संधी, बाजारपेठांची माहिती आदी गुणांच्या जोरावर त्यांनी टप्प्याटप्याने नफा व त्यावर आधारित व्यवसाय वाढविण्यास सुरुवात केली. त्यातूनच तरोडा (ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) येथे चार एकर क्षेत्र खरेदी केले.
 • तेथे २००० मध्ये व्यवसाय स्थलांतरित केला. व्यवसायातून पैसा जुळत गेल्याने उत्साह वाढलेल्या देवेंद्र यांनी माधनी (जि. यवतमाळ) तसेच सुलतानपूर (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथे शेती खरेदी केली. आज जमीनधारणा ५० एकरांवर पोहोचली आहे.

असा आहे पोल्ट्री व्यवसाय

 • सुमारे तीन वर्षांचा तयार झाला आहे अनुभव
 • साधारण एकूण क्षेत्र चार लाख चौरस फूट
 • विविध आकाराची त्यात शेड्‍स. पैकी ४०० फूट लांब आणि २८ फूट रुंद आकाराचे सर्वांत मोठे शेड
 • एक लाख पक्ष्यांसाठी संपूर्ण स्वयंचलित पद्धतीचे म्हणजे पर्यावरण नियंत्रित पद्धतीचे शेड
 • शेडच्या दोन्ही बाजूंस पडदे. आतील बाजूस तापमान, आर्द्रता मोजणी. त्यासाठीचे सेन्सर्स.
 • तापमानात घट किंवा वाढ झाल्यास सेन्सर स्वयंचलित यंत्रणेला संदेश देतो आणि तापमान नियंत्रित केले जाते.
 • खाद्यासाठी (फीडिंग) स्वयंचलित तसेच पाण्यासाठी निपल सिस्टीम.
 • भारनियमनाच्या काळात जनरेटरची व्यवस्था.
 • उर्वरित तीन लाख पक्ष्यांसाठी खाद्य व पाणी आधुनिक सुविधा, मात्र संपूर्ण स्वयंचलित करण्याची प्रक्रिया सुरू.
 • ब्रीडिंग फार्ममध्येही वातानुकूलित यंत्रणा
 • सुमारे १०० ते १५० संख्येने मनुष्यबळ

उत्पादन

 • पक्षी ब्रॉयलर आहेत. साधारण ४५ दिवसांनी पक्षी विक्रीसाठी तयार होतो. त्याचे वजन त्या वेळेस अडीच किलोपर्यंत असते. या कालावधीत प्रति पक्षी चार ते साडेचार किलो खाद्याची गरज भासते.
 • अर्थात, साफसफाई व अन्य तांत्रिक कामे पाहिल्यास प्रति बॅचचा अवधी सुमारे ७० दिवसांचा असतो.
 • दर महिन्याला सुमारे पावणेदोन लाख ते दोन लाख संख्येपर्यंत उत्पादन देवेंद्र यांच्या फार्ममध्ये होते.

बाजारपेठ

 • आंध्र प्रदेश, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पोल्ट्री बाजारपेठेचा आढावा घेऊन त्याआधारे विक्री दर निश्‍चित केले जातात. यवतमाळ शहरात हॉटेल व्यवसायिकांना कोंबडी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे. त्याच बाजारात सुरुवातीला देवेंद्र यांनी आपले ग्राहक शोधले. व्यवसायातील बारकावे व बाजारपेठांचा अभ्यास करून राज्याबरोबरच आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली हरियाना विभागातील व्यापाऱ्यांसोबत नेटवर्क तयार केले आहे.
 • पक्ष्यांचे दर वर्षभर बदलत राहतात. कधी ते किलोला ८०, ९० रुपये, तर कधी ६०, ५० रुपयांपर्यंत खाली येतात.
 • वर्षभराचा सरासरी दर ७० ते ८० रुपयांपर्यंत राहतो. वर्षभराची उलाढाल पाहता प्रति पक्षी सहा ते सात रुपयांपर्यंत नफा राहू शकतो. अर्थात, त्यातही अस्थिरता भरपूर असते.
 • काही वेळा नुकसानीतही व्यवसाय पुढे चालवत ठेवावा लागतो. कोरोना, बर्ड फ्लू आदी संकटांचाही सामना करावा लागतो. हॅचरी त्यामुळे कमी क्षमतेने चालविली जात आहे.

ब्रीडर फार्म उभारला
पूर्वी हैदराबाद येथून एक दिवसाच्या पक्ष्यांची किंवा अंड्यांची खरेदी व्हायची. आता स्वतःचा
ब्रीडर फार्म सुरू केला आहे. त्याची एक बॅच सुमारे दीड वर्षाची असते.
त्यातून प्रति अंड्याची किंमत २० ते २५ रुपयांपर्यंत येईल असे देवेंद्र यांना वाटते.
सध्या अशा तीन बॅचेस प्रक्रियावस्थेत आहेत.

आर्थिक पत तयार केली
व्यवसायासाठी सुमारे पाच कोटींचे भांडवल गुंतवले आहे. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून कर्ज मिळाले आहे. बॅंकेत आता पतही तयार केली आहे. एकेवेळी देवेंद्र यांना बॅंकेत नोकरीची ऑफर आली होती. मात्र त्याऐवजी व्यवसाय वाढीसाठी एक लाख रुपयांचे कर्ज दया असा आग्रह त्यांनी बॅंक व्यवस्थापनाकडे धरला. त्यांचा आत्मविश्‍वास पाहून तेवढी उपलब्धता बॅंकेने करूनही दिली.

संपर्क ः देवेंद्र भोयर, ९४२२१६५१९८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...