agricultural news in marathi Automatic spray machine based on digital technology | Agrowon

डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र

शिवानंद शिवपुजे, डॉ. गोपाळ शिंदे, रहीम खान
बुधवार, 17 नोव्हेंबर 2021

काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. फवारणी करतेवेळी या द्रावणांचा संपर्क येऊन आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.

काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. फवारणी करतेवेळी या द्रावणांचा संपर्क येऊन आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.

अलीकडच्या काळात शेतीकामांसाठी कुशल मजुरांची कमतरता भासत आहे. याचा परिणाम अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. त्यासाठी शेती कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे विकसित करणे काळाची गरज आहे.

कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी पिकांवर योग्य वेळी एकसमान प्रमाणात फवारणी करणे गरजेचे असते. काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. त्याचा मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.

यंत्राची वैशिष्ट्ये 

 • यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सौरऊर्जेवर चालते.
 • यंत्र १२ व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीवर चालते. बॅटरी चार्ज होण्यासाठी साधारण ३ तास लागतात. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ६ तासांपर्यंत काम करणे शक्य होते.
 • मोबाईल फोनद्वारे यंत्र नियंत्रित करता येते.
 • दीड किमी प्रति तास या वेगाने यंत्र काम करते.
 • यंत्राची रुंदी १.७ मीटर असून एकावेळेस त्याच्या आकाराएवढ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते.
 • यंत्राद्वारे एका तासामध्ये साधारण २० ते २२ गुंठे क्षेत्रावर फवारणी करता येते.
 • यंत्रावर ४० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे.
 • यंत्राचे वजन साधारण ११० किलो इतके आहे.
 • फवारणीसाठी यंत्रामध्ये ६ बूम नोझल बसविण्यात आले आहेत.
 • यंत्र एकावेळी ७५ ते ८० किलो इतके वजन उचलू शकते.
 • यंत्रामध्ये ३६० अंशांमध्ये गोल फिरणारे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे फवारणीसोबतच पिकाचे निरीक्षण करणे शक्य होते.
 • यासोबतच यंत्रावर विविध प्रकारचे आवाज येणारे स्पीकर बसविले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते.
 • यंत्राचा उपयोग मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इत्यादी पिकांमध्ये करता येतो.

- शिवानंद शिवपुजे, ९४२१०८५२०२, ९५२७०८७६९४.
(राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर टेक्नोवन
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...
पूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...
छोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...
हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...