agricultural news in marathi Avoid animal poisoning ... | Agrowon

टाळा जनावरांची विषबाधा...​

डॉ.बी.एन.आंबोरे, डॉ.व्ही. व्ही. कारंडे
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021

ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.

ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा
जनावरांनी ज्वारीचे कोवळे धाटे (पोंगे) खाल्ल्यास होणाऱ्या विषबाधेला किराळ लागणे असे म्हणतात.

कारणे 

 • ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.

लक्षणे 

 • जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
 • कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होते. -श्वासोश्वास व हृदयाचे ठोके वाढतात.
 • श्वसनाला त्रास होतो, जनावरे थरथर कापते. बेशुद्ध पडते

उपचार 

 • जनावराचे पोट फुगलेली असते. पशुवैद्यकाच्या सल्याने तातडीने उपचार करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय 

 •  जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
 • जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेत वाया गेले असेल तर असे पोंगे उन्हात वाळल्यानंतरच जनावरांना खाण्यास द्यावेत. कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.
 • ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेतात पाणी सोडतात त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.

झाडाझुडपांमुळे होणारी विषबाधा 
आपल्या परिसरात कोणत्या प्रकारची विषारी झाडे झुडपे आहेत, त्याची विषबाधा कशाप्रकारे करता येईल, हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. पशूतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विषबाधेवर उपचार करावेत.

जनावरे चरताना गवतासोबत विषारी झाडांचा पाला देखील खातात. विषबाधा होऊन जनावरे मृत्यू पावल्यामुळे आर्थिक नुकसान होते. विषारी झाडपाला खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही. परंतु विषारी घटकांचा अंश दूध, अंडी किंवा मांसामध्ये उतरतो. त्यामुळे मानवामध्ये विषबाधा होते.

गाजर गवत 
विषारी घटक :
पारथेनिन

लक्षणे

 • त्वचा रोग होतात. जनावरांच्या अंगाला खाज सुटते.
 • अंगावर फोड येऊन फुटतात. त्यामुळे जनावरांना जखमा होतात. अंगावरची कातडी तडकते. बाधित जनावरांच्या दुधाला कडवट चव येते.

उपचार

 • पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचे इंजेक्शन तसेच लिव्हर टॉनिक द्यावे.
 • बाधित जनावरांना गोठ्यात सावलीत बांधून ठेवावे.

रुचकी 
विषारी घटक:
जिजाटिन, कॅलोट्राक्झीन.

लक्षणे 
जनावरांचा श्वास वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. हृदय बंद पडून जनावरांचा मृत्यू होतो.

उपचार 
पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

घाणेरी 
विषारी घटक :
 लॅन्टेडेन, एबीसी.
लक्षणे 

 • जनावरांच्या यकृतामध्ये बिघाड झाल्यामुळे जनावरांना त्रास होतो. अंगावर खाज सुटते व जखमा होतात.
 • अंगावरील कातडी तडकते. पोटामध्ये बिघाड होऊन अपचन होते.

उपचार 

 • जनावरांना प्रत्यक्ष सूर्यप्रकाशापासून लांब ठेवावे.
 • जनावरांच्या अंगाला खाज असेल तर ॲलर्जी प्रतिबंध व प्रतिजैविक इंजेक्शन द्यावे. यकृताचे कार्य सुरळीत होण्यासाठी यकृत संरक्षण औषधे द्यावीत.

कण्हेर :
लाल कण्हेर 
विषारी घटक
: नेरिओसाइड, ओजेड्रिन

पिवळी कण्हेर 
विषारी घटक :
 धिवेटन

लक्षणे 

 • जनावरांची भूक मंदावते. संडास लागते. पोटामध्ये वेदना होतात.
 • हृदयाचे ठोके कमी होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. जनावर मृत्यू पावते.

उपचार
पोटातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उपयुक्त औषधी द्यावीत.

बेशरम 
विषारी घटक : अल्कलाईड व संपोलिन
लक्षणे :

 • बेशरम खाल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा मोठया प्रमाणात होते. शेळ्या कोणत्याही प्रकारचे लक्षण न दाखवता मृत्यू पावतात.
 • मोठ्या जनावरांमध्ये लाळ गळते, संडास लागते. जनावरांना चालता येत नाही. रक्तदाब कमी झाल्यामुळे जनावरांचा मृत्यू होतो.

उपचार 

 • यासाठी विशिष्ट उपचार पद्धती उपलब्ध नाही. परंतु लक्षणावरुन उपाययोजना करावी. उपाययोजना करताना जनावरांना विषारी वनस्पतीपासून दूर ठेवावे.
 • पोट साफ करणारी औषधे द्यावीत. पोटातील विषारी द्रव्यांचे शरीरात होणारे शोषण टाळण्यासाठी कोळशाची भुकटी किंवा त्याचे द्रावण पाजावे.

धोत्रा :
विषारी घटक : ॲट्रोपीन
लक्षणे :

 • जनावरे सुस्त होतात. तोंड कोरडे पडते. जनावरांची भूक मंदावते डोळ्यांची बुब्बळे मोठी होतात. आंधळेपणा येतो.
 • श्वास घेण्यास त्रास होतो. शरीर थंड पडते. जनावर थरथर कापतात. जनावरांना चक्कर येऊन त्यांचा मृत्यू होतो.

उपचार :

 • लक्षणांवरुन उपचार करावेत. पोटातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उलटी व संडास होणारी औषधे द्यावीत.
 • सुरवातीला जनावर फिरते ठेवावे. जनावरांचे झटके कमी करण्यासाठी त्यांना शांत करणारी औषधे द्यावीत.

संपर्क : डॉ.बी.एन.आंबोरे,९४२१३८५४२९
डॉ.व्ही.व्ही.कारंडे, ९४२००८०३२३
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,
शिरवळ, जि.सातारा)


इतर कृषिपूरक
कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे...आहाराच्या दृष्टीने विचार केला तर कोंबड्याच्या...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्वपशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या...
शेळ्यांमधील सांसर्गिक प्लुरोन्युमोनियाज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, कोंदट व दमट...
हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापनकोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजीवजन्य...
शेळ्या-मेंढ्यांमधील थायलेरिओसिसरोगग्रस्त जनावरांना गोचीड रक्त शोषण्यासाठी चावतात...
शेळ्या, मेंढ्यांमधील अगॅलेक्शियाअगॅलेक्शिया आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचे दूध देणे...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
टाळा जनावरांची विषबाधा...​ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी...
संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य...
मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्रपावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते...
कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः...
जाणून घ्या शोभिवंत माशांना बाजारपेठेत...भारतामध्ये शोभिवंत मासे संवर्धन आणि पालनासाठी...
बैलामधील खांदेसूजीवर उपाययोजनाशेतीकामामध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून...
लाळ्या खुरकूत आजाराचा वाढतोय प्रसारज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत,...
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...