शेतकरी उत्पादक कंपन्यांकरिता केळी मूल्यसाखळीचे कामकाज

शासन मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहते, परंतु खासगी कंपन्या आणि व्यापारी हे प्रत्यक्ष बदल घडविण्याच्या भूमिकेतून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. केळीमध्ये शेतकरी कंपन्यांना मूल्यसाखळी विकासाच्या माध्यमातून मोठ्या संधी आहेत.
Farmer companies have good opportunities in the banana export industry
Farmer companies have good opportunities in the banana export industry

शासन मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहते, परंतु खासगी कंपन्या आणि व्यापारी हे प्रत्यक्ष बदल घडविण्याच्या भूमिकेतून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. केळीमध्ये शेतकरी कंपन्यांना मूल्यसाखळी विकासाच्या माध्यमातून मोठ्या संधी आहेत.  केळी मूल्य साखळी हा विषय अनेक खासगी कंपन्या, व्यापारी यांच्यामार्फत यशस्वीरीत्या हाताळला जात आहे. २००७-२००८ या आर्थिक वर्षापासून केळीच्या मूल्यसाखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले. या बदलामध्ये शासनासोबतच खासगी कंपन्यांचाही मोलाचा वाटा आहे. शासन मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहते, परंतु खासगी कंपन्या आणि व्यापारी हे प्रत्यक्ष बदल घडविण्याच्या भूमिकेतून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. केळीमध्ये शेतकरी कंपन्यांना मूल्यसाखळी विकासाच्या माध्यमातून मोठ्या संधी आहेत. 

  •  सद्यःस्थितीत काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, दर व परिमाणाबाबत विचार केला तर शेतामध्ये लोंगर थेट कापून क्रेटमध्ये केळीच्या फण्या ठेवल्या जातात. पुढे क्रेट थेट वाहनामध्ये भरले जातात. केळी व्यापारी, खासगी कंपनीच्या पिकवणी यंत्रणा, शीतगृहामध्ये ठेवली जातात. या ठिकाणाहून केळी किरकोळ विक्रेत्यांकडे विक्रीसाठी जातात. या प्रक्रियेत कुठेही घासली न गेल्याने केळीला इजा होत नाही. यामुळे केळीचे बाह्य रुप चांगले व आकर्षक राहिल्याने ग्राहक पसंती देतो. या पद्धतीत काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामुळे केळीचा दर्जा चांगला राहिल्याने उठाव लवकर होतो. 
  •  दराच्या परिमाणाबाबत पाहिले तर शेतकऱ्यांकडून केळी किलोने घेतली जाते, तेथून किरकोळ विक्रेत्यांकडेसुद्धा किलोने विक्री होते. पुढे ग्राहक डझनाने केळी खरेदी करतो. परंतु हाच व्यवहार मॉलमध्ये किलोमध्ये होतो.  
  •  पुरवठा साखळीचा अभ्यास केला तर असे निदर्शनास येईल की पूर्वी शेतातून केळीचे लोंगर वाहनात भरताना कोणतेही वेष्टण / पॅकिंग केले जात नव्हते. केळीवर कोणतीही प्राथमिक प्रक्रिया केली जात नव्हती. सद्यःस्थितीत केळीची काढणी ते बाजारपेठ प्रवास पाहिला तर केळीवरील शिरा भरण्याच्या अवस्थेतील केळीचा लोंगर कापला जातो. पाण्याच्या टँकमध्ये ‍निर्जंतुक करण्यासाठी केळीचा घड / फण्या टाकल्या जातात. नंतर त्या पुसून वजन केले जाते. देशांतर्गत विक्री करावयाची असेल, तर १८ किलो बॉक्स पॅकिंग केले जाते. देशाबाहेर विक्री करावयाची असेल तर १३ किलो पॅकिंग करून थेट वाहनामध्ये भरले जाते. काही बाजारपेठांच्या मागणीनुसार एकवेळा वापराच्या क्रेटमध्येसुद्धा केळी घडांची वाहतूक केली जाते. 
  • शेतकरी उत्पादक कंपनीला संधी

  • केळी विक्रीच्या मूल्यसाखळीमध्ये सुरुवातीला सेवा पुरवठादाराची भूमिका निभावणे आवश्यक आहे. हळूहळू या व्यवसायात स्थान निर्माण झाल्यावर थेट ग्राहकांपर्यंत विक्री व्यवस्था निर्माण करू शकतात. या क्षेत्रात काही सहकारी संस्थांनी भाग घेतल्यास त्यांना यामध्ये नक्कीच यश येऊ शकते. 
  • कृषी प्रक्रिया उद्योग तसेच पणन विषयात कामकाज करणाऱ्या सहकारी संस्थांकडे पूर्वानुभव, बाजारातील पत, आर्थिक पत, सभासदांशी असलेले नाते या गुणांमुळे अशा संस्था लवकर यशस्वी होऊ शकतात. 
  • राज्यात केळीचे क्षेत्र जळगाव, बुलडाणा (संग्रामपूर, जळगाव- जामोद), नांदेड, पुणे ( जुन्नर, इंदापूर), कोल्हापूर तसेच प्रत्येक जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात केळीचे क्षेत्र तयार झाले आहे. अशा ठिकाणी अस्तित्वात असलेल्या शेतकरी कंपन्या व सहकारी संस्था त्याचप्रमाणे नव्याने तयार होत असलेल्या अशा प्रकारच्या समुदाय आधारित संस्थांनी केळीच्या मूल्यसाखळीत उतरणे आवश्यक आहे. या करिता स्थानिक स्तरापासून थेट मार्केटपर्यंत पिकाच्या मूल्यसाखळीस संचालक मंडळाने प्रत्यक्ष भेट देऊन तसेच मूल्यसाखळीचा खोलवर भौतिक व आर्थिक अभ्यास करून व्यवसायाचा निर्णय घ्यावा.
  • केळी मूल्यसाखळीतील साधनांचा वापर  क्रेट, बॉक्स /१८किलो / १३ किलो, कोयता किंवा तत्सम केळी कापायचे साधन,पॅकहाउस  शीतगृह / सोलर शीतगृह,  निर्जतुकीकरणासाठी विविध रसायने,  केळीचे निर्जंतुकीकरणासाठी व स्वच्छ करण्यासाठी प्लॅस्टिक टाक्या, केळी व कामगार वाहतुकीसाठी वाहन,  पॅकिंग करताना आवश्यक सेलोटेप, कात्री, कटर, स्टॅम्प, स्टेशनरी सारखे साहित्य  शेतातून बांधापर्यंत केळी वाहतुकीसाठी ट्रॉली व्यवस्था  केळी पॅकहाउसमध्ये नेण्यापूर्वी सिमेंट / प्लॅस्टिक पाण्याचे टाके व त्यात निर्जतुकीकरणासाठी व्यवस्था,  संगणक, प्रिंटर, सॉफ्टवेअर इत्यादी साहित्य  शेतकरी व पिकांची नोंदणीसाठी सॉफ्टवेअर / ॲप, आर्थिक नोंदीसाठी व हिशेबासाठी सॉफ्टवेअर, मनुष्यबळासाठी प्रशिक्षण  केळी पिकाचे घड/ लोंगर/ झाडांची उंची / जमिनीतील ओलावा, वातावरणातील आर्द्रता व तापमान मोजण्यासाठी आवश्यक साधने, याव्यतिरिक्त आवश्यक इतर साधने नियोजन महत्त्वाचे

  • राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या विक्री व्यवस्थापन करावयास निघाल्या आहेत, परंतु त्यांच्याकडे पीकनिहाय मूल्यसाखळीनुसार कोणतीही साधने नाहीत. याकरिता प्रशिक्षण संस्थांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंगी कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध मोड्यूल्स तयार करणे अपेक्षित आहे. 
  • केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळाला अशा व्यवस्थेचा फायदा घ्यायचा आहे अशा शेतकरी उत्पादक कंपन्या स्वत:ची प्रगती उत्तमरीतीने करीत आहेत. 
  • केळी मूल्यसाखळी मध्ये सोलापूर, नांदेड, नाशिक या भागांतील काही शेतकरी उत्पादक कंपन्या उत्कृष्टरीत्या कामकाज करीत आहेत. 
  • - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय व पणन व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com