agricultural news in marathi Barshi market becoming famous for tamarind and chinchoka | Agrowon

चिंच, चिंचोक्यासाठी बार्शी बाजारपेठ राज्यात अव्वल !

सुदर्शन सुतार
शनिवार, 27 मार्च 2021

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची बाजारपेठ चिंच व चिंचोक्यांसाठी राज्यात अव्वल आहे. येथे हंगामात वर्षाला दीड ते दोन लाख क्विंटलपर्यंत चिंचेची आवक होते. वार्षिक सुमारे सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक उलाढाल एकट्या चिंचेतून होते. यंदाही हंगाम सुरू झाला असून, आतापर्यंत एक लाख क्विंटल खरेदी-विक्री झाली आहे. 
 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची बाजारपेठ चिंच व चिंचोक्यांसाठी राज्यात अव्वल आहे. येथे हंगामात वर्षाला दीड ते दोन लाख क्विंटलपर्यंत चिंचेची आवक होते. वार्षिक सुमारे सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक उलाढाल एकट्या चिंचेतून होते. यंदाही हंगाम सुरू झाला असून, आतापर्यंत एक लाख क्विंटल खरेदी-विक्री झाली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची बाजारपेठ डाळींसाठी प्रसिद्ध होती. आता महाराष्ट्रातील मोजक्या आणि मोठ्या उलाढाल होणाऱ्या चिंचेच्या बाजारपेठांत त्याचा समावेश झाला आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असे दोन्ही प्रदेशांचे बार्शी हे प्रवेशद्वार आहे. येथील बाजार समितीत एका बाजूने सोलापूरसह पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर तर दुसऱ्या बाजूने उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांतून शेतीमालाची आवक होते.   

चिंचेचा हंगाम

  • चिंचेचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होतो. तो मेपर्यंत असा चार महिने अविरत सुरू असतो. शेतकरी वा विक्रेत्यांकडून काढणी, फोडणी आणि प्रतवारी करून चिंच आणली जाते. प्रतवारीनुसार लिलावात योग्य दर मिळतो.   येथे १५ ते २० आडत व्यापारी तर २० ते २५ खरेदीदार आहेत. दिवसाकाठी पाच हजार क्विंटल चिंच बाजारात येते. सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल एका दिवसात होते.   वर्षाला दीड ते दोन लाख क्विंटलपर्यंत आवक तर वार्षिक सुमारे सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते. 
  • लिलाव सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे सातत्याने आवक-जावक सुरू असते. लिलावानंतर खरेदीदार-विक्रेते यांच्या समोरच वजन होते आणि त्वरित रोखपट्टी दिली जाते.  

शीतगृहाची सोय
खरेदी झाल्यानंतर लगेच चिंच विक्रीस नेणे काही खरेदीदारांना शक्य नसते किंवा व्यापाऱ्यांनाही खुल्या जागेत ठेवणे शक्य नसते. त्यासाठी बाजार समितीने दोन हजार मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारले आहे. नव्याने प्रत्येकी एक हजार टनांची दोन शीतगृहे उभारली जात आहेत.  

प्रतवारी 

  • साधारण तीन प्रकारे प्रतवारी केली जाते. 
  • आकाराने मोठी पत्ती, केशरी उठावदार रंग असणारा ‘स्पेशल’ प्रकार    
  • त्यानंतर बारीक पत्ती आणि कमी रंग असणारी दुसरी प्रतवारी 
  • कमी स्वच्छ वा साधारण चिंचेची तिसरी प्रतवारी   

चिंचोक्याची बाजारपेठही लक्षवेधी
चिंचेसोबत चिंचोक्याचीही मोठी बाजारपेठ बार्शीत आहे. यंदाही हंगाम सुरू झाल्यापासून फेब्रुवारीपासून मार्चपर्यंत ७७ हजार १८१ क्विंटल चिंचोक्याची आवक झाली आहे. त्यास प्रति क्विंटलला किमान १६०० रुपये, सरासरी १८५० रु., तर सर्वाधिक २००० रुपये दर मिळाला आहे.

चिंचेची आवक व दर (रु. प्रति क्विंटल)  

वर्ष     किमान     सरासरी     सर्वाधिक     आवक
२०२०-२१ ६०००     १२,०००     ३०,०००     एक लाख क्विं.  (१५ मार्चपर्यंत)
२०१०-१९  ३५००     १४,५०० २७,४००० ७८ हजार क्विं.
२०१९-१८ ४८००     ८१००     १३, ५००  एक लाख  ७५ हजार क्विं.

 

चिंचोका किमान     कमाल     सरासरी     आवक (प्रति क्विंटल)
२०२०-२१ १८५० १६००       २०००     ७७, १८१ क्विं. (१५ मार्चपर्यंत)
२०२०-१९ १३००     १५००     १८२५      ११, ६८७ क्विं. 
२०१९-१८  १५००  १७००   २३००   ५५, ५५२ क्विं.

चिंचोका पावडरनिर्मिती व निर्यातही
चिंचोका पावडरनिर्मितीचा स्वतंत्र उद्योगही बार्शीत आहे. असे चार ते पाच युनिट्स कार्यरत आहेत. पावडरीचा उपयोग प्रामुख्याने कुंकूनिर्मिती आणि स्टार्च प्रकारातील वस्त्रनिर्मितीत होतो. एकट्या बार्शीतून प्रतिदिन ७५ टन पावडरनिर्मिती होते. स्थानिक भागात प्रति किलोस ३८ रुपये दर मिळतो. शिवाय चीन, बांगलादेश, टर्की, मलेशिया आदी देशांत निर्यातही होते. तेथे हाच दर ६० रुपये आहे.

स्थानिकसह परदेशातही चिंचोका पावडरीला मोठी मागणी आहे. आम्ही त्यात काळानुरूप बदल केले. आज बार्शीत पाच युनिट पूर्ण क्षमतेने चालतात. वर्षाकाठी ६० कोटींहून अधिक उलाढाल त्यातून होते. 
- अतुल सोनिग्रा, 
अतुल फीड्‌स, बार्शी

आमच्याकडे दररोज २५० ते ३०० पोती चिंच येते. दिवसभर व्यवहार होतात. अन्य बाजारातील मागणीचा कल पाहून दर ठरतात. यंदा बऱ्यापैकी दर आहेत.
- नारायण जाधव, आडत व्यापारी

मी चिंचेचा खरेदीदार म्हणून वीस वर्षांपासून कार्यरत आहे. चांगली आणि स्वच्छ चिंच इथे मिळते.
- रणजित बोराडे, बार्शी 

माझ्याकडे स्वतःकडे झाडे नाहीत. मी झाडे खरेदी करून काढणी, फोडणी, प्रतवारी करून विक्री करतो. उत्पन्नाचा आधार होतो. वर्षानुवर्षे व्यवसायात सातत्य ठेवले आहे. बार्शीची बाजारपेठ जवळची आणि खात्रीची आहे. 
- काशिनाथ चव्हाण, 
शेतकरी, उक्कडगाव, ता. बार्शी

आमच्याकडे चोख व्यवहार होतो. रोख पट्टी मिळते. खुल्या लिलावामुळे तक्रारीला जागाच नाही. बाजार समितीचे पूर्ण नियंत्रण या व्यवहारांवर असते. 
- तुकाराम जगदाळे, सचिव,  ८८८८५२६९३३
(बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती )


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...