मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी व्हेनम

अंगदुखी, संधिवात, मणक्याचे आजार, स्नायूंचे आजार, मेंदू आजारांवर उपचार करण्यासाठी बी व्हेनमचा वापर केला जातो.
Beekeeping helps in pollination also provides other by-products.
Beekeeping helps in pollination also provides other by-products.

मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या किमतीचा विचार केला तर त्याचा  बी व्हेनम, रॉयल जेली, प्रॉपोलिस, पोलन, मेण आणि मध असा क्रम आहे. अंगदुखी, संधिवात, मणक्याचे आजार, स्नायूंचे आजार, मेंदू आजारांवर उपचार करण्यासाठी बी व्हेनमचा वापर केला जातो. याच्या उत्पादनामध्ये आपल्याला संधी आहे. अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी तसेच सौंदर्य प्रसाधने निर्मितीसाठी बी व्हेनमचा वापर करतात. बी थेरपी म्हणजेच मधमाश्यांच्या विषाचा वापर करून अनेक आजार बरे करण्यासाठीची उपचार पद्धती. भारतामध्ये बी थेरपी ही संकल्पना अद्याप मोठ्या प्रमाणात रूढ झालेली नाही. परंतु बी व्हेनमचे उत्पादन घेऊन त्याचा वापर मात्र केला जातो, अर्थात याचे प्रमाण कमी आहे. भारतातील ९० टक्के मधमाशीपालन हे फक्त मध उत्पादनासाठीच केले जाते.  मधमाशीपालनातील संधी 

  • मधमाशीपालनातून मधाबरोबर पोलन, मेण, प्रॉपोलिस, रॉयल जेली आणि बी व्हेनम यांसारख्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये मात्र मधापासून मिळणाऱ्या पदार्थांचा विचार केला तर मधाव्यतिरिक्त इतर पदार्थांची निर्मिती फारच कमी प्रमाणात केली जाते. 
  • मधमाशीपालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या किमतीचा विचार केला तर त्याचा  बी व्हेनम, रॉयल 
  • जेली, प्रॉपोलिस, पोलन, मेण आणि मध असा क्रम आहे. परंतु आपल्याकडे मात्र याच्या पूर्णपणे 
  • उलट काम चालते. म्हणजेच आपले सर्वांत महत्त्वाचे उत्पादन म्हणजे मध. 
  • मधमाशीपालनातून मात्र फक्त मध उत्पादनच घेतले तर मधमाशीपालन जास्त किफायतशीर होत नाही. यामुळे भारतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात मधमाशी पालन व्यवसाय विकसित झाला नाही.
  • ‘बी व्हेनम’चे महत्त्व

  •  बी व्हेनमचा विचार केला तर मधमाशीपासून मिळणारा हा सर्वांत महागडा पदार्थ. याचा वापर आजारावर उपचार तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये करण्यात येतो. सर्वसाधारणपणे  बाजारपेठेत बी व्हेनमची सरासरी ४,००० ते ८,००० रुपये प्रति ग्रॅम याप्रमाणे विक्री होते. अर्थात बी व्हेनमचे उत्पादनही अत्यंत कमी मिळते.
  •  ज्या मधपाळाकडे १०० वसाहती असतील त्याला एका वेळेस फक्त २ ते ३ ग्रॅम बी व्हेनम मिळते. एकदा मधमाशीकडून विष गोळा केले, तर परत तिच्यामध्ये विष तयार करायला १० ते १५ दिवसांचा कालावधी  लागतो. म्हणजेच दर १५ दिवसांनी त्याच मधमाशीच्या वसाहतीकडून आपल्याला बी व्हेनमचे उत्पादन घेता येते. जी मधमाशी वयस्कर झालेली असते, म्हणजेच ४० ते ४५ दिवसांची झालेली असते, तिच्यामध्ये विष तयार होते.
  • मधमाशीला ज्या वेळी वाटते की तिला किंवा तिच्या वसाहतीला धोका आहे, त्या वेळी ती डंख मारून समोरच्याच्या अंगात काटा रुतवते व विष सोडते. अर्थात, त्या वेळी काटा दुसऱ्याच्या शरीरात अडकून राहतो. त्यामुळेच मधमाशी मरते.
  • ‘बी व्हेनम’चे उत्पादन

  • बी व्हेनम गोळा करण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा वापर केला जातो. यासाठी बी व्हेनम कलेक्टर  नावाचे उपकरण वापरले जाते. बी व्हेनम कलेक्टर याची साधारण किंमत १० ते १५ हजार रुपये असते. हे उपकरण वीजेवर चालते. त्यासाठी बॅटरीचाही वापर करता येतो. 
  •    कलेक्टर उपकरणामध्ये काच, लाइटचा करंट देण्यासाठी तारा असतात. या तारांमधून ९ वॉटचा विद्युत प्रवाह सोडला जातो. हे उपकरण मधमाश्यांच्या पेटीच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवतात. मधमाश्या ज्या वेळी बी व्हेनम कलेक्टरवर बसतात, त्यावेळी त्यांना करंट लागतो. त्यांना याची जाणीव होते, की तिला तसेच तिच्या वसाहतीला काहीतरी धोका आहे. त्यामुळे ती डंख मारते. हा डंख उपकरणाच्या काचेवर मारल्यामुळे त्या काचेवर मधमाशीच्या डंखातून विष बाहेर येते आणि ते काचेवर पडते. परंतु यामुळे मधमाशीचा डंख मारण्याचा काटा तुटत नाही, त्यामुळे ती मरतही नाही. काचेवर मारलेल्या डंखामुळे मात्र आपल्याला बी व्हेनम मिळते. 
  • बी व्हेनम कलेक्टर हे उपकरण मधमाशीच्या पेटीच्या गेटसमोर ३० मिनिटे ठेवून नंतर ते काढून घेतले जाते. या काचेवर पडलेले सर्व विष हे बारीक रेझरसारख्या यंत्राने खरडून काढले जाते. 
  • एका स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये बी व्हेनम साठवत असताना त्याला आपल्या हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारे बी व्हेनमचे उत्पादन घेऊन त्याला डीफ्रीझरमध्ये साठवून ठेवतात. बी व्हेनमच्या प्रतीनुसार त्याचा दर ४,००० ते ८,००० रुपये प्रतिग्रॅम आहे. मागणीनुसार दर बदलतात.  
  • बी व्हेनमचे उत्पादन वर्षभर घेता येते. परंतु ज्या वेळी मधमाशी मध आणि पोलन उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते, म्हणजेच ज्या वेळी शेतात मोठ्या प्रमाणात फुलोरा असतो, त्या वेळी मधमाशीला तिचे मुख्य काम करू द्यावे. हे काम सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते मे- जूनपर्यंत चालते. परंतु ज्या वेळी मधमाश्यांना फुलोरा उपलब्ध नसतो किंवा त्यांना वसाहतीच्या बाहेर काम करता येत नाही, ज्याला आपण दुष्काळाचा काळ म्हणू शकतो. अशा वेळी आपण बी व्हेनम निर्मितीचे काम करू शकतो. सर्वसाधारणपणे जून- जुलै ते सप्टेंबर या तीन-चार महिन्यांत बी व्हेनमचे उत्पादन घ्यावे. 
  • या काळात आपल्याला मधमाश्यांच्या वसाहती सुरक्षित आणि सशक्‍त ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. या काळात त्यांना कृत्रिम खाद्य देऊन त्यांची संख्या व्यवस्थित ठेवली तर येणाऱ्या पुढील हंगामामध्ये मधाचे जास्त उत्पादन मिळते. या मधमाशीच्या दुष्काळाच्या (पावसाळ्याचा हंगाम) काळामध्ये बी व्हेनमचे उत्पादन घेतले तर चांगला फायदा होतो. 
  • मधमाशी वर्षभर बी व्हेनमचे उत्पादन देऊ शकते. कारण एकदा विष काढल्यानंतर १० ते १५ दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात विषाची निर्मिती होते. १०० वसाहतींपासून वर्षाला ६० ग्रॅम बी व्हेनमचे उत्पादन घेता येऊ शकते. बी व्हेनमचे उत्पादन घेत असताना काचेवर काही घाण, धूळ पडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण बी व्हेनमचा दर त्याच्या गुणप्रतीवर ठरते.
  • चीन, कोरिया, रशिया, इजिप्त, ग्रीक यांसारख्या देशांमध्ये बी 
  • व्हेनमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मागील ५० वर्षांमध्ये अनेक देशांमध्ये बी व्हेनमचा वापर  मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आपल्याला मोठी संधी आहे. 
  • - डॉ. भास्कर गायकवाड,  ९८२२५१९२६०. (लेखक शेती तज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com