रब्बीतील फायदेशीर आंतरपीक पद्धती

कोरडवाहू शेतीत ओलाव्याच्या पीक वाढीसाठी परिणामकारक उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. आंतरपीक पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये स्थिरता, अधिक उत्पादकता आणि नफा मिळतो. तसेच बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणाऱ्या विपरीत परिणामाची तीव्रता कमी होते.
Gram and safflower intercropping methods
Gram and safflower intercropping methods

कोरडवाहू शेतीत ओलाव्याच्या पीक वाढीसाठी परिणामकारक उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. आंतरपीक पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये स्थिरता, अधिक उत्पादकता आणि नफा मिळतो. तसेच बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणाऱ्या विपरीत परिणामाची तीव्रता कमी होते.

  • ज्या पिकांची सुरवातीच्या वाढीची प्रक्रिया ही सावकाश असते, जी पिके ४५ सें.मी पेक्षा जास्त अंतरावर घेतली जातात, अशा पिकांमध्ये आंतरपिकांचा समावेश करता येतो. 
  • शेंगवर्गीय पिकांच्या मुळांवरील गाठीमध्ये नत्रस्थिरीकरण होते. या नत्रस्थिरीकरणामध्ये हवेतील नत्र सूक्ष्म जीवाणूद्वारे पिकांना उपलब्ध होतो. 
  • दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटक आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हे जमीन सुपिकतेचा महत्त्वाचा घटक आहे. पिकांचे अवशेष, पालापाचोळा जमिनीत कुजल्यामुळे सेंद्रिय कर्ब संवर्धन होते. कुजण्याच्या प्रक्रिये दरम्यान सूक्ष्म जिवाणूंची  वाढ होते. 
  • लागवडीचे नियोजन 

  • लागवडीसाठी शुध्द व प्रमाणित बियाणे वापरावे. बियाणे उगवण तपासणी आणि बीजप्रक्रिया करावी. पेरणी यंत्रामध्ये थोडासा फेरबदल करून इतर सामान्य पेरणीप्रमाणे आंतरपीक पद्धतीची पेरणी करू शकतो. पेरणी दुफण किंवा तिफणीने करताना ओळीच्या प्रमाणास अनुसरून संबंधित पिकाचे बियाणे तिफणीतून सोडावे.
  • यांत्रिकीकरणाद्वारे पेरणी करताना दोन फणांमधील अंतर आणि त्या फणांना बियाणांच्या बॉक्सला जोडणारी नळी तपासून घ्यावी. पेरणी करताना ओळीच्या प्रमाणामध्ये आणि ठराविक ओळीमध्ये ठराविक पिकाचे बियाणे योग्य त्या खोलीवर, पडत असल्याची खात्री करावी. मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्हीची एकाच वेळेस पेरणी करावी किंवा वेगवेगळी करता येते. 
  • योग्य वेळेवर पेरणी, रोपांची योग्य संख्या, संतुलीत खत मात्रेसाठी सेंद्रिय खतांचा वापर, एकात्मिक कीड, रोग नियंत्रण महत्त्वपूर्ण आहे.
  • आंतरपीक पद्धतीसाठी लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी.  प्रति हेक्टरी बियाणांचे योग्य प्रमाण वापरावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवणे, जेणेकरून हवा, पाणी व सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा कमी होईल. तसेच प्रती हेक्टरी झाडांची संख्या योग्य ठेवावी. एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. 
  • बागायती रब्बी हंगामासाठी पीक निवडीसाठी जमिनीतील ओलावा किंवा पाण्याची मर्यादा नसते. म्हणून मुख्यपिकावर अवलंबून त्यास पूरक ठरणारी आंतरपीक पद्धती निवडता येते. 
  • उसामध्ये कांदा, बटाटा, कोबी, लसूण, चवळी, भुईमूग आंतरपीक घेता येते. रब्बी हंगामात कोरडवाहू जमिनीसाठी हरभरा, करडई व रब्बी ज्वारी इत्यादी पिके घेता येतात. 
  • कोरडवाहू रब्बी हंगामाची पेरणी ही पूर्णतः परतीच्या पावसापासून प्राप्त झालेल्या जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून असते. यामध्ये हरभरा, करडई, हरभरा + जवस, करडई + जवस ही ४:२ किंवा ३:३ याप्रमाणे आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते. तसेच करडई + रब्बी ज्वारी ही आंतरपीक पद्धती चांगली आहे. 
  • जेव्हा पिकांच्या (मुख्य) दोन ओळीमध्ये आंतरपिकांचा  समावेश केला जाते त्यावेळी तणांची वाढ होत नाही. तेव्हा आंतरमशागतीची आवश्यकता नसते.
  • लागवडीसाठी पिकनिहाय जाती  संकरित ज्वारी   संकरित जाती - सीएसएच-१६, पीव्हीके-८०९ सुधारित जाती -  मालदांडी (एम ३५-१), स्वाती (एसपीव्ही-५०४)ए परभणी मोती (एसपीव्ही-१४११), परभणी ज्योती (एसपीव्ही-१५९५), परभणी सुपर मोती (एसपीव्ही-२४०७),  गहू -  एचडी-२१८९, कैलास, परभणी-५१, त्र्यंबक (एनआयडब्ल्यु-३०१), गोदावरी (एनआयडब्ल्यु-२९५), तपोवन (एनआयडब्ल्यु-९१७), शरद(एकेडीडब्ल्यु-२९९६-१६) हरभरा -  बीडीएन-९-३, बीडीएनजी-७९७ (आकाश), फुले जी-१२, फुले जी-१५ (विश्वास), विजय, विशाल, दिग्विजय, जाकी-९२१८, साकी, फुले विक्रम  वाटाणा -   टी-१६९, आर्केल, केपीएमआर-१० भुईमूग-  एसबी-११, जेएल-२४ एलजीएन-२ (मांजरा), टीअेजी-२४, टीजी-२६, टीएलजी-४५, एलजीएन-१, एल.जी.एन-१२३ सूर्यफूल -  एस.एस-२०३८ (भानु), एलएस-८, एलएस-११ करडई -  परभणी कुसुम-१३५ (पीबीएनएस-१२), फुले कुसुम १३५ (जेएलएसएफ-४१४), परभणी-४० (पीबनीएनएस-४०), परभणी-८६ (पूर्णा) जवस -  एस-३६, आरएलसी-४ (जगदंबा), एनएल-९७, लातुर जवस नं.-९३  मोहरी -  पुसा बोल्ड, सीता  - डॉ. मेघा जगताप, ९८३४९८९५८१ (कृषीविद्या विभाग,कृषी महाविद्यालय,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com