agricultural news in marathi benefits of eating eggs | Agrowon

जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदे

डॉ.व्ही.डी.लोणकर, डॉ.व्ही.डी.आहेर
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021

शरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः बनवू न शकणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ले अंड्यामध्ये आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने उच्च दर्जाची असतात.
 

शरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः बनवू न शकणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ले अंड्यामध्ये आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने उच्च दर्जाची असतात.

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. प्राणीजन्य प्रथिनांमध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि ज्यामध्ये उत्तम प्रतीची मानवाच्या आहारात आवश्यक असलेली सर्व अमिनो आम्ले भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणारा स्रोत म्हणजे अंडी. एका अंड्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची ६.३ ग्रॅम प्रथिने असतात. आपल्या शरीरास अत्यावश्यक असणारी ९ प्रकारची अमिनो आम्ले समाविष्ट असतात. तसेच ५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ०.६ ग्रॅम पिष्टमय पदार्थ, १० प्रकारची जीवनसत्वे, ११ प्रकारची खनिजे समाविष्ट असतात. एका अंड्यामधून ७५ ते ८० कॅलरी ऊर्जा प्राप्त होते.

  • अंड्यामध्ये काहीसा पारदर्शक म्हणजे पांढरा भाग आणि पिवळा भाग ज्याला आपण बलक संबोधतो असे दोन भाग असतात. त्यापैकी अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रथिने समाविष्ट असतात. ही प्रथिने पचनास सुलभ असल्याने ती पूर्णपणे शरीरात शोषली जातात. आपले शरीर या प्रथिनांचा पूर्णपणे वापर करू शकते. अंड्यामध्ये असलेली प्रथिने वाया न जाता १०० टक्के वापरली जातात.
  • शरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः बनवू न शकणारी नऊ प्रकारची अमिनो आम्ल अंड्यामध्ये आढळून येतात. अंड्यामधील प्रथिने उच्च दर्जाची असतात. इतर कोणत्याही प्रथिनयुक्त अन्नपदार्थांचा दर्जा ठरविण्यासाठी अंड्यातील प्रथिने मानक म्हणून वापरली जातात. जागतिक आरोग्य संघटनेने मानवासाठी सर्वोत्तम प्रथिने म्हणून अंड्याला १०० गुणांचे मानांकन दिले आहे.
  • अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये मुबलक असणारी प्रथिने पेशींच्या निर्मितीसाठी आणि वाढीसाठी गरजेची आहेत. अंड्यातील प्रथिने पचनास हलकी असल्यामुळे आबालवृद्धांना अंडे पोषक असते. आपल्या स्नायूंचे बळ वाढवण्यासाठी अंड्यातील प्रथिने आवश्यक असतात.
  • अंड्याच्या पांढऱ्या भागात रिबॉफ्लाविन म्हणजेच जीवनसत्त्व ब-२ भरपूर प्रमाणात असते. आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये, पेशींच्या निर्मितीमध्ये आणि शरीरामध्ये घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये हे जीवनसत्त्व महत्त्वाचे असते.
  • अंड्याच्या पिवळ्या बलकामधून आपणास भरपूर प्रमाणात पोषण मिळते. अंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रथिनांचा साठा वगळल्यास अन्य सर्व पोषकद्रव्ये पिवळ्या बलकातच असतात. बलकामध्ये समाविष्ट असलेली जीवनसत्वे ही अँटिऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये कार्य करतात.
  • बलकामध्ये असलेले लोह शरीरात पूर्णतः वापरले जाते. तसेच बलकात सापडणारे कोलिन नावाचे द्रव्य मेंदूच्या वाढीमध्ये मदत करते. त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारण्यास अंड्याच्या पिवळ्या बलकाचा उपयोग होतो.
  • आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी बलकाची मदत होते. अंड्यामध्ये असणारे अ जीवनसत्त्व आणि कॅरोटेनोईड पिग्मेंट दृष्टीसाठी उपयुक्त ठरते. ड जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असते.
  • अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये आढळणारे लुटीन आणि जीयाझेनथीन नावाची कॅरोटेनोईड पिग्मेंट डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
  • लहान मुलांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी अंड्याचा वापर करता येतो. आजारातून बऱ्या झालेल्या व अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया तसेच वयात येणारी मुले, मुली यांच्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा नियमित वापर केल्यास फायदेशीर ठरते. १०)अंडे हे सहज पचते आणि सर्व वयोगटासाठी विविध पोषण तत्त्वांसाठी उपयुक्त आहे.
  • अंडे हे एक विविध उपयोगी अन्नपदार्थ आहे. आपल्या रोजच्याआहारामध्ये कमीत कमी एका उकडलेल्या अंड्याचा सेवनासाठी वापर करावा.

संपर्क : डॉ.व्ही.डी.लोणकर, ७८७५५७०३९२
(सहाय्यक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)


इतर कृषी प्रक्रिया
महामंडळाच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर...ऊसतोड कामगार महामंडळाच्या खर्चासाठी शेतकऱ्यांच्या...
कर्जबाजारी कारखान्यांची आर्थिक घडी...कर्जबाजारी कारखान्यांसाठी केंद्र सरकारने...
साखरेची एमएसपी वाढविण्याची मागणी योग्य...पुणे :  ऊस सोडून इतर पिकांसाठी एमएसपी म्हणजे...
नरेंद्र मोदींकडून झिरो बजेट शेतीचा...पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरो बजेट...
टोमॅटोपासून सूप, चटणी, लोणचे..टोमॅटो ही अत्यंत नाशीवंत फळभाजी असून, लगेच खराब...
दर्जेदार पनीरनिर्मितीचे तंत्रउत्तम दर्जाचे पनीर बनविण्याकरिता म्हशीचे दूध...
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे...नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक...
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...