agricultural news in marathi Beware of contaminated food ... | Agrowon

दूषित अन्नापासून सावध राहा...

श्रुतिका देव 
गुरुवार, 20 मे 2021

म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. एखाद्या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या किंवा मधुमेह किंवा काही इम्यूनोसप्रेसंट औषध घेणाऱ्या व्यक्तीमध्ये हे संक्रमण बहुतेक वेळा उद्‌भवते, म्हणून कोरोनातून बरे होत आलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग प्रकर्षाने आढळत आहे.

म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला पूर्वी झिगॉमायकोसिस असे म्हटले जायचे. हा संसर्ग म्यूकरमायसाइट्स नावाच्या मोल्डच्या एका ग्रुपमुळे होतो. ही बुरशी तुलनेने दुर्मीळ असली तरी अत्यंत गंभीर आहे. या कुटुंबातील बुरशी माती, दुग्धजन्य पदार्थ, ड्रायफ्रूट, सोयाबीन, फळ आणि भाज्या यांच्याशी संबंधित आहे. जर एखाद्या आजारामुळे किंवा आरोग्याच्या स्थितीमुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या किंवा मधुमेह किंवा काही इम्यूनोसप्रेसंट औषध घेणाऱ्या व्यक्तीमध्ये हे संक्रमण बहुतेक वेळा उद्‌भवते, म्हणून कोरोनातून बरे होत आलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग प्रकर्षाने आढळत आहे.

म्यूकरमायकोसिस कारणे आणि लक्षणे

 • आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात म्यूकरमायकोसिस विकसित होऊ शकतो. या संसर्गात ताप, डोकेदुखी, बंद नाक, सायनस वेदना,अचानक दृष्टी कमी होणे, दातदुखी, चेहऱ्यावरील सूज, नाकाच्या आतील भागावर व टाळूवर काळे डाग /चट्टा येणे ही लक्षणे आढळतात.  
 • म्यूकरमायकोसिसचे जंतू शरीरात श्वासामार्फत, अन्नाच्या माध्यमातून किंवा जखमांमधून  शिरकाव करतात. 
 • प्रादुर्भाव हा व्यक्तीच्या रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक कोरोना बाधित व्यक्ती ही म्युकरमायकोसिसने बाधित होईल असे नाही.

म्यूकरमायकोसिसची घातकता 

 • यामुळे शरीरातील सॉफ्ट टिश्‍यू आणि मुख्य अवयव उदा.  फुफ्फुस, मेंदू, टाळू, आतडे, नाक/सायनस, डोळे, जबडा इ. बाधित होतात.
 • लवकर उपचार मिळाले नाही तर हा संसर्ग शरीरात पसरतो. त्यामुळे  बाधित भाग काढून टाकणे  (डोळा, टाळू, जबडा) किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो.

अन्नातून प्रादुर्भाव

 • ही बुरशी प्रामुख्याने डेअरी पदार्थ (चीज, योगर्ट इ.), बेकरी पदार्थ, सोयाबीन तसेच फळ व भाजीपाल्यामध्ये आढळते. 
 • ज्याप्रमाणे मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे, लसीकरण या बाबी कोरोना आजाराला प्रतिबंध करू शकतात. त्याच प्रमाणे अन्न सुरक्षा हीच आपल्या आरोग्याची सुरक्षा असणार आहे.  
 • घरी आणलेली फळे व भाज्या मीठ किंवा सोड्याच्या पाण्यात धुवाव्यात. 
 • भाजी, फळांवर बुरशी किंवा काळे/हिरवे ठिपके आढळल्यास त्या खाण्यासाठी वापरू नयेत. 
 • बागकाम,भाजी घेताना  किंवा हाताला जखम असल्यास हॅन्ड ग्लोजचा वापर करावा.
 • ब्रेडवर बुरशी आढळल्यास आहारात वापरू नयेत. टाकून द्यावेत. 
 • खाद्य पदार्थांवर तंतुमय बुरशी किंवा कापूस सारखी दिसणारी बुरशी आढळल्यास ते  वापरू नयेत.
 • अन्न साठवणूक व प्रक्रिया करण्यासाठी लागणारी जागा ही स्वच्छ, निर्जंतुक असावी.
 • अन्न प्रक्रिया किंवा हाताळणारी व्यक्ती निरोगी असावी तसेच वैयक्तिक स्वच्छता अवलंबिणारी असावी. 
 • शिळे अन्न खाऊ नये. 

- श्रुतिका देव,  ९४०४१३९२६६
(एम. आय. टी. अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद)


इतर महिला
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...
काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनीझुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज,...