agricultural news in marathi Brahmi, Vekhand useful for paralysis | Page 4 ||| Agrowon

लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर
मंगळवार, 16 मार्च 2021

लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे कार्य बंद होते. त्या भागाचे स्पर्शज्ञान कमी होते अथवा नष्ट होते. लकवा झालेला भाग लुळा पडतो. पायास लकवा झाल्यामुळे जनावर लंगडते. या आजारामुळे बाधित भागातील मांसपेशी कमकुवत होतात, त्यांची वाढ खुंटते, बाधित अवयवाची कार्यशक्ती कमी होते. 

लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे कार्य बंद होते. त्या भागाचे स्पर्शज्ञान कमी होते अथवा नष्ट होते. लकवा झालेला भाग लुळा पडतो. पायास लकवा झाल्यामुळे जनावर लंगडते. या आजारामुळे बाधित भागातील मांसपेशी कमकुवत होतात, त्यांची वाढ खुंटते, बाधित अवयवाची कार्यशक्ती कमी होते. या आजाराची अनेक कारणे आहेत.

लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे कार्य बंद होते. त्या भागाचे स्पर्शज्ञान कमी होते अथवा नष्ट होते. लकवा झालेला भाग लुळा पडतो. पायास लकवा झाल्यामुळे जनावर लंगडते. या आजारामुळे बाधित भागातील मांसपेशी कमकुवत होतात, त्यांची वाढ खुंटते, बाधित अवयवाची कार्यशक्ती कमी होते. या आजाराची अनेक कारणे आहेत. किंबहुना मेंदूच्या आजारांमध्ये दिसणारे हे एक लक्षण आहे. अति थंडी, गारपीट किंवा  काठी किंवा एखाद्या कठीण साधनाने पशूस मारले तर हा आजार संभवतो. कोंबड्यांमध्ये पायाचा लकवा किंवा पंखांचा लकवा प्रामुख्याने आढळतो. जीवनसत्त्व ब कमतरतेमुळे ही लक्षणे आढळतात.

उपचार पद्धती 

 • आजारावर उपचार करण्यापूर्वी पशुवैद्यकाद्वारे नेमके निदान करून घ्यावे. आजारावर उपचार करत असताना पोटातून घ्यायचे औषध सोबतच बाह्य उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
 • बाधित भागास औषधी वनस्पतींचा वापर करून शेक देणे, बाधित भागास मालिश करावे. यामुळे बाधित भागाच्या मासपेशीमध्ये शक्ती येऊन त्या कार्यरत होण्यास मदत होते.

उपयुक्त औषधी वनस्पती
वेखंड  किंवा वचा 

या वनस्पतीचे मूळ अत्यंत गुणकारी असले तरी संपूर्ण वनस्पती  औषधीमध्ये वापरतात.

ज्योतिष्मती  
हीच वनस्पती माळ कान्गुनी या नावाने देखील ओळखली जाते. संपूर्ण वनस्पती औषधीमध्ये वापरतात.

शंखपुष्पी 
लकवा तसेच चेतासंस्थेच्या आजारांमध्ये या वनस्पतीचा अत्यंत चांगला उपयोग होतो. संपूर्ण वनस्पती औषधीमध्ये वापरतात.

 ब्राह्मी
ब्राह्मी ही वनस्पती मण्डुकपर्णी या नावानेदेखील ओळखले जाते. संपूर्ण वनस्पती औषधीमध्ये वापरतात.

टीप
वरील वनस्पतींचा एकत्रित वापर करावा.  सोबतच बाह्य उपचारासाठी या सर्व वनस्पती समभागात घेऊन शक्यतो तिळाच्या तेलात टाकून उकळवून घ्याव्यात. त्यानंतर हे तेल गाळून त्यांच्याद्वारे बाधित भागात नियमित मॉलिश करावे.

वळूसाठी वनौषधी उपचार
वळूचा उपयोग नैसर्गिक रेतन तसेच रेतमात्रा निर्मितीसाठी केला जातो. बहुतांश गावांमध्ये रेतनासाठी जातिवंत वळू मर्यादित संख्येत असतात. पर्यायाने रेतनासाठी त्यांचा उपयोग वारंवार होतो. एका आठवड्यात जास्तीत जास्त चार वेळेस वेतासाठी वळूचा वापर करावा. यापेक्षा जास्त वेळेस व नियमित वळूचा वापर केल्यास त्याच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते. पर्यायाने अशा वळूपासून गर्भधारणा होण्याची शक्यताही कमी असते.

 • जर वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी झाली तर अशावेळी या वळूला वीर्य संकलनातून किंवा नैसर्गिक रेतनातून आराम देणे अत्यंत आवश्यक असते. वळूस इतर आजार नसतील तर केवळ आरामाने या आजारातून त्याची मुक्तता होते.
 • या व्यतिरिक्त मृत शुक्राणू (डेड काउंट), दूषित शुक्राणू संख्या (अबनोरमल स्पर्म काउंट), पुरुष संप्रेरकांची म्हणजेच  टेस्टेस्टेरानची कमतरता इत्यादी कारणे वळूमधील नपुंसकता निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. या आजारामध्ये औषधी वनस्पतींचा उपयोग गुणकारी ठरतो. 

उपयुक्त औषधी वनस्पती
अश्‍वगंधा 

 • असगंध, कामोनी, ढोर कामोनी  या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते.  
 • पुरुष संप्रेरकांची कमतरता, शुक्राणूंची संख्या कमी होणे यासाठी संपूर्ण वनस्पती औषधात वापरावी. 

शतावरी 

 • स्त्री प्रजनन संस्थेवर या वनस्पतीचा चांगलाच उपयोग होतो. याच प्रमाणे नर प्रजनन संस्थेच्या आजारांमध्ये 
 • टॉनिक म्हणून तसेच शुक्राणूंच्या विकारावर या वनस्पतीचा विशेष उपयोग होतो.
 • शतावरीच्या मुळ्या औषधीमध्ये वापरल्या जातात.

केवच

 • केवच,  क्रोंच अशा नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती दलदलीच्या भागात, ओढ्याच्या ठिकाणी, पडित जमिनीत सर्वत्र आढळते.  
 • या वनस्पतीचे बी आजारांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.

ज्येष्ठमध
चवीला गोड असणारी ही वनस्पती सर्वांनाच परिचित आहे, या वनस्पतीचे खोड या आजारात वापरतात.

सफेद मुसळी

 • डोंगराळ भागात आढळणारी ही वनस्पती. या वनस्पतीचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते. या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.  
 • साधारणतः शतावरीच्या मुळासारखीच दिसणारी ही मुळे, थोडेशी बारीक असतात.

शिलाजित

 • शिलाजीत ही औषधी वनस्पती जरी नसली, तरी आयुर्वेदामध्ये याचा उपयोग सांगितलेला आहे. 
 • शिलाजीत हा नैसर्गिक स्वरूपात आढळणारा एक खडक आहे. शुद्ध स्वरूपातील शिलाजीतचा वापर औषधामध्ये करावा.

 - डॉ. सुधीर राजूरकर,  ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...