agricultural news in marathi Brown fruit rot control in citrus fruits | Agrowon

लिंबूवर्गीय फळपिकांतील तपकिरी फळकूज नियंत्रण

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, वाढलेली आर्द्रता, कमी तापमान यामुळे आंबिया बहराच्या संत्रा व मोसंबी फळांवर फायटोप्प्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातून वाढणाऱ्या तपकिरी फळकुजीची लक्षणे जाणून वेळीच उपाययोजना कराव्यात.
 

सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, वाढलेली आर्द्रता, कमी तापमान यामुळे आंबिया बहराच्या संत्रा व मोसंबी फळांवर फायटोप्प्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातून वाढणाऱ्या तपकिरी फळकुजीची लक्षणे जाणून वेळीच उपाययोजना कराव्यात.

लक्षणे

  • पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचे संक्रमण सर्वप्रथम होते. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा करण्याच्या प्रयत्न केल्यास घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. 
  • टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर पसरून पाने तपकिरी काळी होतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात. झाड जणू खराट्यासारखे दिसते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलमे आणि नुकत्याच लागवड केलेल्या कलमांवरसुद्धा दिसून पडतात. 
  • पानांवरील प्रादुर्भावानंतर जमिनीलगतची हिरव्या फळांवर तपकिरी किंवा करडे डाग दिसू लागतात. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगाचे होते. फळे सडून गळतात.  
  • अधिक आर्द्रता असल्यास फळांवर पांढरकी तंतुमय बुरशीची वाढ दिसून येते. 
  • फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढ‍ऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. तोडणीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळात मिसळल्यास निरोगी फळेही सडतात.

व्यवस्थापन

  • सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नयेत. अन्यथा, या रोगाची तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा.
  • बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. पाणी साठून राहणाऱ्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
  • फायटोफ्थोरा बुरशी किंवा फळावरील तपकिरी कूज (ब्राऊन रॉट)मुळे होणारी फळगळ व्यवस्थापनासाठी संपूर्ण झाडावर फवारणी करावी. 

प्रति लिटर पाणी
फोसेटिल एएल* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* ३ ग्रॅम. 
(* लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस.)

चांगले परिणाम मिळण्यासाठी या बुरशीनाशकांमध्ये अन्य कोणतीही रसायने (बुरशीनाशक/कीटकनाशक/विद्राव्य खते) मिसळू नयेत.  फवारणी करतेवेळी वाफ्यावरही द्रावणाची फवारणी करत पुढे जावे.

- डॉ. योगेश इंगळे,  ९४२२७६६४३७
डॉ. दिनेश पैठणकर,  ९८८१०२१२२२

(अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)


इतर कृषी सल्ला
ड्रॅगनच्या विळख्यातला ‘टोनले साप’एखादं भक्ष्य खाऊन फुगलेल्या सापाप्रमाणं दिसणारं ‘...
वनशेतीमध्ये चिंच लागवडकोरडवाहू शेतीमध्ये चिंच लागवड करताना जमिनीची निवड...
असे करा कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे...सध्या कपाशीचे पीक बोंडे धरण्याच्या किंवा धरलेल्या...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्येएक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०....
द्राक्ष बागेत पावसाळी स्थितीमुळे...गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही...
मृग बहार डाळिंब बागेसाठी नियोजनमृग-बहार (i) मे-जून बहार नियमन (ii) उशिरा मृग...
रोपवाटिका व्यवस्थापनात स्वच्छता, निचरा...रोपवाटिकेमध्ये उत्तम दर्जाच्या कलम काडीइतकेच...
भाजीपाला पिकांचे सुधारित व्यवस्थापनकोकण विभागात पावसानंतरच्या ओलाव्यावर कमी कालावधीत...
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवाभारतात अल्पभूधारकांचे प्रमाणे ११७ दशलक्ष असून, ते...
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यताकोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व...
द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास...
शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी...गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या...
जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म...माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म...
सुधारित तंत्राने करा करडई लागवडकरडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे...
भेटीचे सोने करता आले पाहिजे...भात शेतीमध्ये पाणथळ जागा. या जागाच जल आणि...
मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र,...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....