कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रण

कोबीवरील भुरी रोग
कोबीवरील भुरी रोग

राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ढगाळ वातावरण, थंडीमुळे पडणारे दव व वाढणारी आर्द्रता, यामुळे कोबीवर्गीय पिकांवर भुरी व घाण्या या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे त्वरित नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

भुरी : लक्षणे : पानाच्या वरील बाजूला पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर करड्या पांढरट रंगाची बुरशी वाढलेली दिसते. पाने फिक्कट हिरवट, पिवळसर होऊन गळ होते, वाढ खुंटते. नियंत्रण : फवारणी (प्रति लिटर पाणी). विद्राव्य गंधक (८० टक्के) २.५ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ मि.लि. घाण्या रोग : लक्षणे : प्रथम पानाच्या कडेला पिवळेपणा येतो. नंतर तो कडेपासून पानाच्या आतील भागाकडे वाढ जाऊन शेवटी इंग्रजी ‘व्ही’ किंवा त्रिकोणासारखा पट्टा पडतो. हा डाग किंवा चट्टा पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन प्रादुर्भावित भाग तपकिरी पडतो. रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. रोगग्रस्त भाग मोडल्यास त्यातून दुर्गंधीयुक्त काळसर द्रव निघतो. म्हणून त्याला घाण्या रोग म्हणतात. रोग गड्डा आणि मुळापर्यंत पसरल्यास कोबी, फ्लॉवरचे गड्डे पूर्णपणे सडून जातात. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर त्वरित झाल्यास रोगग्रस्त झाड मरते. नियंत्रण : फवारणी (प्रति लिटर पाणी) कॉपर ऑक्सिक्‍लोराईड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम

सूचना : रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. दहा दिवसांच्या अंतराने बुरशीनाशकांची २ ते ३ वेळा फवारणी करावी.

संपर्क : चिमाजी बाचकर, ९४०४६१२४६१ (अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर) टीप : गंधकाचा वापर प्रखर उन्हात टाळावा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com