मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजी

मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे. मत्स्यबीजाची योग्य पद्धतीने निवड करावी.
Care when buying and storing fish seeds
Care when buying and storing fish seeds

मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे. मत्स्यबीजाची योग्य पद्धतीने निवड करावी.  शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनाला संधी आहे.ज्याच्याकडे लहान आकाराचे शेततळे आहे, त्यामध्ये २ ते ४  महिन्यांच्या कालावधीमध्ये  मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली संवर्धन हा व्यवसाय करता येतो. यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला मत्स्य जिरे खरेदी करणे गरजेचे आहे. मत्स्य बीज केंद्रात मत्स्य जिरे मिळते. मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली पर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाणी हे कूपनलिका किंवा तलावातून गाळून घेतले पाहिजे. त्यामुळे मासे आणि बेडूक शेततळ्यात येत नाहीत. खाद्य व्यवस्थापनात नैसर्गिक खाद्यनिर्मिती महत्त्वाची आहे, यासाठी शेततळ्यात शेणखत व रासायनिक खतांचा वापर गरजेचा आहे. हे सर्व झाल्यानंतर १५ दिवसांनी मत्स्य जिऱ्याचे संचयन करावे.  मत्स्य बीज खरेदी ज्या भागामध्ये मत्स्य शेतकऱ्याची मागणी आहे त्या माशांचे बीज संचयन करावे. बहुतांश शेतकरी कटला, रोहू आणि मृगळ या भारतीय प्रमुख कार्प जातीचे मासे संवर्धन करतात. याचबरोबरीने विदेशी पंगस, तिलापिया आणि मरळ माशांचे संगोपन केले जाते.  मत्स्यबीज खरेदी करताना चांगल्या व्यक्ती किंवा शासकीय मत्स्य विभागातून माहिती घ्यावी. 

  • कोणत्या प्रजातीचे आहे याची माहिती घ्यावी. 
  • मत्स्य बीजाचा आकार व वजन लक्षात घ्यावे. 
  • दर्जेदार बीज निवडावे. 
  • मत्स्य बीज घेताना शक्यतो शासकीय मत्स्य बीज केंद्रातून स्वतः खरेदी करावे. 
  • मत्स्य बीज मोजताना लक्ष ठेवावे कारण ते कमी प्रमाणात पण देऊ शकतात. 
  • मोजणी करताना मापाची पाहणी व ते पूर्ण भरलेला माप आहे का? याची पाहणी करून घ्यावी.
  • सकाळी किंवा संध्याकाळी मत्स्य बीज वाहतूक करावी, कारण तापमान कमी असते.
  • वाहतूक करताना प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये मत्स्य बीज संचयन कमी ठेवावे. 
  • वाहतुकीसाठी जर प्लॅस्टिक टाकीचा वापर करत असाल तर त्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन असावा.
  • मत्स्य बीज अनुकूलन प्रक्रिया  जेव्हा आपण मत्स्यबीज खरेदी करून आपल्या शेततळ्यावर देऊन येतो तेव्हा तिथल्या आणि आपल्या शेततळ्यातील वातावरणाशी अनुकूलता प्रक्रिया करणे खूप महत्त्वाची आहे. कारण तिथल्या आणि आपल्या वातावरणामध्ये खूप फरक असतो. यासाठी स्थिरपणे आपल्या तलावावर अनुकूलता प्रक्रिया करावी. 

  • वाहतूक करून आणलेल्या सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या तलावामधील पाण्यावर स्थिर पणे सोडाव्यात. पिशवीची गाठ सोडून काही काळ ठेवावी.
  • त्यानंतर सर्व बीजाच्या प्लॅस्टिक पिशव्या उघड्या करून १५-२० मिनिटे त्यामध्ये तरंगत ठेवाव्यात. 
  • मत्स्य बीजाच्या पिशवीतील पाण्याचा आणि संचयन तळ्यातील पाण्याचा सामू व तापमान तपासून घ्यावे.
  • १५ ते २० मिनिटांनंतर उघड्या पिशव्यांमध्ये हळुवारपणे पाणी शिंपडावे आणि ५ ते १० मिनिटांनंतर त्या पिशव्यातील मत्स्य बीज पाण्यामध्ये हळूवार सोडावे. हे सर्व केल्यामुळे मत्स्य बीजावर ताण  येत नाही. त्यांच्या जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढते.
  • माशांचे बीज ओळखण्याची युक्ती कटला

  • सहसा पाण्याच्या पृष्ठभागावर पोहतो. 
  • काळजीपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे तोंड पृष्ठभागावरून खाण्यासाठी वरच्या बाजूस वळते.
  • काही कटलाचे बीज एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे. कानाजवळ घेतल्यानंतर पातेल्याचा टीक टीक असा आवाज येत असेल, तर कटला या प्रजातीचे बीज असे समजावे.
  •  रोहू 

  • काही बीज एका काचेच्या ग्लासमध्ये घेतल्यानंतर ते मध्ये भागी पोहताना दिसते.  
  • बीजाला अरुंद डोके असते. बीज गडद रंगात दिसते.
  • मृगळ बीज बीज पाण्याच्या भांड्यात ठेवले तर ते पाण्याच्या तळाशी पोहताना दिसते. - रामेश्‍वर भोसले,  ९८३४७११९२० (भोसले हे मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी (तमिळनाडू) येथे संशोधक विद्यार्थी आहेत. वाघमारे हे अमरावती येथे सहायक मत्स्य विकास अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com