agricultural news in marathi Care when buying and storing fish seeds | Page 2 ||| Agrowon

मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजी

रामेश्‍वर भोसले, किशन वाघमारे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे. मत्स्यबीजाची योग्य पद्धतीने निवड करावी. 
 

मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे. मत्स्यबीजाची योग्य पद्धतीने निवड करावी. 

शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनाला संधी आहे.ज्याच्याकडे लहान आकाराचे शेततळे आहे, त्यामध्ये २ ते ४  महिन्यांच्या कालावधीमध्ये  मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली संवर्धन हा व्यवसाय करता येतो. यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

सुरुवातीला मत्स्य जिरे खरेदी करणे गरजेचे आहे. मत्स्य बीज केंद्रात मत्स्य जिरे मिळते. मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली पर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाणी हे कूपनलिका किंवा तलावातून गाळून घेतले पाहिजे. त्यामुळे मासे आणि बेडूक शेततळ्यात येत नाहीत. खाद्य व्यवस्थापनात नैसर्गिक खाद्यनिर्मिती महत्त्वाची आहे, यासाठी शेततळ्यात शेणखत व रासायनिक खतांचा वापर गरजेचा आहे. हे सर्व झाल्यानंतर १५ दिवसांनी मत्स्य जिऱ्याचे संचयन करावे. 

मत्स्य बीज खरेदी
ज्या भागामध्ये मत्स्य शेतकऱ्याची मागणी आहे त्या माशांचे बीज संचयन करावे. बहुतांश शेतकरी कटला, रोहू आणि मृगळ या भारतीय प्रमुख कार्प जातीचे मासे संवर्धन करतात. याचबरोबरीने विदेशी पंगस, तिलापिया आणि मरळ माशांचे संगोपन केले जाते.  मत्स्यबीज खरेदी करताना चांगल्या व्यक्ती किंवा शासकीय मत्स्य विभागातून माहिती घ्यावी. 

 • कोणत्या प्रजातीचे आहे याची माहिती घ्यावी. 
 • मत्स्य बीजाचा आकार व वजन लक्षात घ्यावे. 
 • दर्जेदार बीज निवडावे. 
 • मत्स्य बीज घेताना शक्यतो शासकीय मत्स्य बीज केंद्रातून स्वतः खरेदी करावे. 
 • मत्स्य बीज मोजताना लक्ष ठेवावे कारण ते कमी प्रमाणात पण देऊ शकतात. 
 • मोजणी करताना मापाची पाहणी व ते पूर्ण भरलेला माप आहे का? याची पाहणी करून घ्यावी.
 • सकाळी किंवा संध्याकाळी मत्स्य बीज वाहतूक करावी, कारण तापमान कमी असते.
 • वाहतूक करताना प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये मत्स्य बीज संचयन कमी ठेवावे. 
 • वाहतुकीसाठी जर प्लॅस्टिक टाकीचा वापर करत असाल तर त्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन असावा.

मत्स्य बीज अनुकूलन प्रक्रिया 
जेव्हा आपण मत्स्यबीज खरेदी करून आपल्या शेततळ्यावर देऊन येतो तेव्हा तिथल्या आणि आपल्या शेततळ्यातील वातावरणाशी अनुकूलता प्रक्रिया करणे खूप महत्त्वाची आहे. कारण तिथल्या आणि आपल्या वातावरणामध्ये खूप फरक असतो. यासाठी स्थिरपणे आपल्या तलावावर अनुकूलता प्रक्रिया करावी. 

 • वाहतूक करून आणलेल्या सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या तलावामधील पाण्यावर स्थिर पणे सोडाव्यात. पिशवीची गाठ सोडून काही काळ ठेवावी.
 • त्यानंतर सर्व बीजाच्या प्लॅस्टिक पिशव्या उघड्या करून १५-२० मिनिटे त्यामध्ये तरंगत ठेवाव्यात. 
 • मत्स्य बीजाच्या पिशवीतील पाण्याचा आणि संचयन तळ्यातील पाण्याचा सामू व तापमान तपासून घ्यावे.
 • १५ ते २० मिनिटांनंतर उघड्या पिशव्यांमध्ये हळुवारपणे पाणी शिंपडावे आणि ५ ते १० मिनिटांनंतर त्या पिशव्यातील मत्स्य बीज पाण्यामध्ये हळूवार सोडावे. हे सर्व केल्यामुळे मत्स्य बीजावर ताण  येत नाही. त्यांच्या जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढते.

माशांचे बीज ओळखण्याची युक्ती
कटला

 • सहसा पाण्याच्या पृष्ठभागावर पोहतो. 
 • काळजीपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे तोंड पृष्ठभागावरून खाण्यासाठी वरच्या बाजूस वळते.
 • काही कटलाचे बीज एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे. कानाजवळ घेतल्यानंतर पातेल्याचा टीक टीक असा आवाज येत असेल, तर कटला या प्रजातीचे बीज असे समजावे.

 रोहू 

 • काही बीज एका काचेच्या ग्लासमध्ये घेतल्यानंतर ते मध्ये भागी पोहताना दिसते.  
 • बीजाला अरुंद डोके असते. बीज गडद रंगात दिसते.

मृगळ बीज
बीज पाण्याच्या भांड्यात ठेवले तर ते पाण्याच्या तळाशी पोहताना दिसते.

- रामेश्‍वर भोसले,  ९८३४७११९२०
(भोसले हे मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी (तमिळनाडू) येथे संशोधक विद्यार्थी आहेत. वाघमारे हे अमरावती येथे सहायक मत्स्य विकास अधिकारी आहेत.)


इतर कृषिपूरक
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...