agricultural news in marathi Career opportunities in biotechnology ... | Agrowon

जैवतंत्रज्ञान विषयात करिअर संधी...

अमोल सावंत
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

जीवशास्त्र आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान विषयात नोकरी, उद्योगक्षेत्रात चांगली संधी आहे.
 

जीवशास्त्र आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान विषयात नोकरी, उद्योगक्षेत्रात चांगली संधी आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) ही जीवशास्त्र विषयामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली अलीकडच्या काळात निर्माण झालेली शाखा आहे. या विषयामध्ये सागरी जैव तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, लाल जैव तंत्रज्ञान, वैद्यकीय जैव तंत्रज्ञान, श्‍वेत जैव तंत्रज्ञान आणि औद्योगिक जैव तंत्रज्ञानाचा समावेळ होतो. हा अभ्यासक्रम भारत तसेच परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये बी.टेक., बी.एस्सी., एम.टेक., एम.एस्सी. आणि पी.एचडी.च्या स्वरूपात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. जीवशास्त्र विषयात रस असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञानासारख्या शाखेत चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

कर्नाटकातील बंगळूर हे शहर ‘बायोटेक्नोलॉजी हब’ म्हणून ओळखले जाते. येथे बायोटेक्नोलॉजीवर आधारित विविध कंपन्या कार्यरत आहेत. भारतामध्ये बायोटेक्नोलॉजीच्या विविध क्षेत्रांमधील काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या आठशेच्या वर पोहोचली आहे. या कंपन्या उपचारात्मक लस व निदान, प्रतिजैविके निर्माण, संशोधन वैद्यकीय चाचण्या, उतिसंवर्धन, संकरित बियाणे, जैविक खते, जैविक कीटकनाशके, जनुकीय सुधारित पिके, अन्न प्रक्रिया उद्योग, औद्योगिक एन्झाइम्स, स्टेम सेलनिर्मिती, डेटाबेस सेवा, सॉफ्टवेअर, बायोटेक सॉफ्टवेअर सेवेमध्ये कार्यरत आहेत. या नवीन उद्योग क्षेत्रात विद्यार्थांना शिकण्याची आणि नोकरीची चांगली संधी आहे.

जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून बीएस्सी किंवा एमएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. प्रक्षेत्र भेटीद्वारे बीएस्सी/ एमएस्सी झालेले विद्यार्थी खासगी संस्थांमध्ये काम करू शकतात. बायोटेक/अप्लाइड लाइफ सायन्समध्ये मास्टर डिग्री करणारे विद्यार्थी अध्यापन, संशोधन, विस्तार क्षेत्रात नोकरी करू शकतात.

जैवतंत्रज्ञानामध्ये पदवीनंतर पदव्युत्तर पदवी घेऊन विक्री क्षेत्रात काम करू शकतात. संशोधक म्हणून काम करण्यासाठी पदव्युत्तर पदवी गरजेची असते. पी.एचडी. झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या नूतन आर्धीनियामानुसार माध्यमिक शाळांमध्ये जैवतंत्रज्ञान पदवीधारक उमेदवार माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. कृषी विद्यापीठांद्वारे केलेल्या बी. टेक./ एम.टेक. पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेमध्ये रुजू होता येते.

उच्च शिक्षणाची संधी 
उच्च शिक्षणासाठी भारत आणि इतर पुढारलेल्या देशात जैवविज्ञान (लाइफ सायन्सेस) शाखेमध्ये विशेष प्राधान्य दिसून येते. यासाठी विद्यार्थांनी इंग्लिशविषयक काही परीक्षा (टोफेल, जी.आर.ई, आय.एल.टी.एस,जी.एट.) दिल्यास प्रवेश व शिष्यवृत्तीची संधी मिळू शकते.

विविध विषयांची जोड 
जैवतंत्रज्ञान हे क्षेत्र केवळ जीवशास्त्र किंवा तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित नाही तर यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जेनेटिक्स, माइक्रोबायलॉजी, गणित, बायो इन्फॉर्मेटिक, पर्यावरण शास्र, ॲनिमल बायोटेक अशा अनेक विषयांचा अभ्यास केला जातो. हे सर्व विषय जैवतंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविणे आणि संशोधन क्षेत्रात काम करणे अधिक सोईस्कर झाले आहे.

०२४२२-२७२७९४
(सहायक प्राध्यापक, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी, जि. नगर)


इतर कृषी शिक्षण
जैवतंत्रज्ञान विषयात करिअर संधी...जीवशास्त्र आणि त्याबरोबरच तंत्रज्ञान विषयाची आवड...
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...
कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....