परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
कृषिपूरक
जनावरांतील गर्भाशयाचा दाह
गर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी प्रतिकारक्षमता असणाऱ्या जनावरांमध्ये आढळून येतो. गर्भाशयाचा दाहामुळे दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. या आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजनांची गरज आहे.
गर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी प्रतिकारक्षमता असणाऱ्या जनावरांमध्ये आढळून येतो. गर्भाशयाचा दाहामुळे दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. या आजाराची लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजनांची गरज आहे.
पशुप्रजनन व्यवस्थापनात गर्भाशयाचे अन्यन्य साधारण महत्त्व आहे. गर्भाशयाची स्वतंत्र स्व-रोगनियंत्रण व्यवस्था असते. गर्भाशय हे एक निर्जंतुकीकरण वातावरण असते. परंतु जेव्हा बाह्य वातावरणातील रोगजंतू गर्भाशयात प्रवेश करतात, तेव्हा गर्भाशय सुजते आणि गर्भाशयाचा दाह निर्माण होतो. गर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी प्रतिकारक्षमता असणाऱ्या जनावरांमध्ये आढळून येतो. गर्भाशयाचा दाहामुळे दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
लक्षणे
मुख्यत: गर्भाशयाचा दाह विल्यानंतर पहिल्या आठवड्यात आढळून येतो. यामुळे जनावरांतील प्रजनन प्रक्रियेवर याचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो. जसे की वारंवार उलटणे, माजावर न येणे व इतर प्रजनन अडथळे. यामुळे दोन वेतांतील अंतर वाढते. दूध उत्पादनावर परिणाम दिसून येतो. औषधे आणि पशुवैद्यकीय सेवेचा खर्च वाढतो.
प्रकार
सौम्य दाह
या प्रकारात प्रमाण कमी असते. लक्षणे दिसून येत नाहीत. जनावरे नियमित माजावर येते पण गाभण राहत नाहीत, सतत उलटतात. जनावरांच्या माजात काचेसारखा चिकट स्रावाबरोबर पू बाहेर येतो.
तीव्र दाह
योनी मार्गातून मोठ्या प्रमाणात घाण घट्ट पांढरा पू येत राहतो, गर्भाशय सुजलेले असते, कळा देणे व अस्वस्थ होते, शरीराचे तापमान वाढून दूध उत्पादन घटते. रोगजंतू रक्तातून शरीराच्या इतर भागांत जातात व सर्व शरीर रोगी बनते.
कारणे
- कष्ट प्रसूती, वार अडकणे
- गर्भाशयास इजा होणे, गर्भपात
- संप्रेरकाचे असंतुलन
- असंतुलित खाद्यपुरवठा, अस्वच्छ गोठा
- व्यवस्थापनातील त्रुटी, वातावरणातील ताण
- रोग प्रतिकारशक्ती कमी असणे, आरोग्याच्या इतर समस्या
उपाययोजना
- दुधाळ जनावरांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर शक्तिवर्धक औषधी देणे अवश्यक असते
- गोठा नेहमी स्वच्छ आणि कोरडा असावा. ओला किंवा घाणीचे प्रमाण गोठ्यात असेल तर गर्भाशयाचा दाह होण्याचे प्रमाण जास्तीचे असते
- प्रसूतीनंतर दररोज किमान एक आठवडा कोमट पाण्यात पोटॅशिअम परमॅंगनेटचे सौम्य प्रमाण वापरून द्रावण करावे. याचा वापर जनावरे स्वच्छ करण्याकरिता करावा.
- प्रसूतीनंतर वार लवकर गर्भाशयाच्या बाहेर फेकण्याकरिता पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार वनस्पतिजन्य औषधींचा वापर करावा.
- दररोजच्या खाद्यात क्षार मिश्रण, गुळाचा वापर करावा.संतुलित खाद्याचा पुरवठा करावा.
- गर्भाशयातून पू सारखा पदार्थ बाहेर पडत असेल, तर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैवकाचा व इतर औषधींचा वापर करावा.
- जनावरांतील गर्भाशयाच्या आजाराविषयी वेळोवेळी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
संपर्क : डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६
(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशू वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
- 1 of 35
- ››