agricultural news in marathi cattle health advisory | Page 4 ||| Agrowon

वेळेवर उपचार करा, कासदाह टाळा

डॉ. गिरीश पंचभाई, दिलीप बदुकले
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

कासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने वेळोवेळी योग्य ते उपचार करून घ्यावेत. हे उपचार किमान तीन ते पाच दिवसांसाठी करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे बाधित जनावरांना उपचार होईपर्यंत वेगळे ठेवावे. अशा जनावरांचे दूध नष्ट करावे.
 

कासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने वेळोवेळी योग्य ते उपचार करून घ्यावेत. हे उपचार किमान तीन ते पाच दिवसांसाठी करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे बाधित जनावरांना उपचार होईपर्यंत वेगळे ठेवावे. अशा जनावरांचे दूध नष्ट करावे.

गाई, म्हशींचे दूध काढण्याअगोदर करण्यात येणारी स्वच्छता ही दुधाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी महत्त्वाची आहे. सर्वांत जास्त संसर्ग हा दूध काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्टाफायालोकोकस ऑरियस आणि स्त्रेप्टोकोकास अगॅलॅक्शिया या जिवाणूंमुळे होतो. दूध काढणाऱ्याचे अस्वच्छ हात, कास कोरडी करण्यासाठी वापरले जाणारे कापड आणि दूध काढण्यासाठी वापरात येणाऱ्या मिल्किंग यंत्राचे सडाकरिता वापरले जाणारे कप यामुळे संसर्ग होतो. काही वेळा संसर्ग हा दिवसातून दूध काढण्याच्या वेळेतील अंतरामध्ये आढळतो.

दूषित गोठा, कास आणि सडाला चाटणे, कासेचा मागच्या पायांसोबत संपर्क येणे, शेपटीचा गोंडा आणि माश्या तसेच कास जास्त वेळ ओली राहिल्यामुळे देखील कासेत जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून दूध काढण्याअगोदरची कासेची स्वच्छता महत्त्वाची आहे. कासेला स्वच्छ पाणी आणि जंतुनाशकाच्या साह्याने धुऊन घ्यावे. त्यानंतर योग्यप्रकारे टॉवेलच्या साह्याने कोरडे करावे. कासेला स्वच्छ करण्यासाठी कागदी किंवा कापडी टॉवेलचा वापर करून स्वच्छ आणि कोरडे करून घ्यावे. स्ट्रीप कप वापरून दूध काढण्यागोदर सुरुवातीचे कासेमध्ये उर्वरित दूध काढून घ्यावे. नंतर कास टीट डीपमध्ये ३० सेकंदासाठी बुडविणे आवश्यक आहे.

‘टीट डीप’चा वापर 

 • दूध काढण्यापूर्वी जनावरांची कास स्वच्छ पाणी आणि जंतुनाशकाच्या साह्याने धुऊन घ्यावी.
 •  कास धुतल्यानंतर स्वच्छ निर्जंतुक कागदी किंवा कापडी टॉवेलने पुसून कोरडी करावी.
 • दूध काढण्यागोदर वापरण्यात येणारे टीट डीप वातावरणातील रोगजंतूमुळे होणाऱ्या कासदाहाविरुद्ध परिणामकारक आहे. याकरिता टीट कपचा वापर करावा.
 • टीट कपमध्ये टीट डीप द्रावण टाकून त्यात सड ३० सेकंदांसाठी बुडवावेत किंवा द्रावणाचा स्प्रे कासेवर आणि सडावर मारून घ्यावा.
 • टीट डीपकरिता आयोडीनचे द्रावण (आयोडीन ०.५ टक्का + ग्लीसरॉल १५ टक्के) किंवा क्लोरहेक्झीडीन ०.५ टक्का + ग्लीसरॉल ६ टक्के या द्रावणाचे मिश्रण किंवा आयोडोफोर (०.५ टक्का आयोडीन)+ १० टक्के ग्लीसरोल तसेच क्लोरहेक्झीडीन ०.५ टक्का + ६ टक्के ग्लीसरॉल हे द्रावण टीट डीप द्रावण म्हणून वापरता येते.
 • प्रत्येक वेळी टीट डीपचा वापर करताना द्रावणामध्ये कास ३० सेकंदांसाठी बुडवावी.
 • दूध काढल्यानंतर २०० मिलि ग्रॅम तुळस आणि कडुलिंबाचे तेल याचा लेप कासेला लावावा. यामुळे कासेला संसर्ग होत नाही.

गाई,म्हशीचे दूध काढतानाचे नियोजन 
व्यक्तीच्या साह्याने दूध दोहन 

 • गोठ्यातील दुधाळ गाईं-म्हशींची संख्या कमी असेल किंवा त्यांचे दुग्धोत्पादन कमी असेल, तर आपण दुग्ध दोहकाच्या मदतीने दूध दोहन करणे योग्य आहे. दूध काढण्याआधी व्यक्तीचे हात साबण किंवा जंतुनाशक द्रावणाने धुऊन स्वच्छ करावेत. तसेच दूध दोहनावेळी त्याच्या तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधलेला पाहिजे.
 • प्रत्येक गाय, म्हशीचे दूध काढल्यानंतर हात परत जंतुनाशकाच्या साह्याने धुऊन कोरडे करावेत.
 • दूध काढताना पूर्ण हात पद्धतीचा वापर करावा. अंगठा दुमडून दूध काढू नये. यामुळे सडांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढे जंतुसंसर्गाचा धोका उद्‍भवतो.
 • दूध काढताना निरोगी जनावरांचे प्रथम दूध काढावे. शेवटी कासदाहाची बाधा असलेल्या जनावराचे दूध वेगळे काढावे.

मिल्किंग मशिनचा वापर 

 • अधिक दुग्धोत्पादन असणाऱ्या जनावरांकरिता मिल्किंग
 • मशिनचा वापर योग्य आहे. ज्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढले जाते.
 • दुधातील जनावरे दिवसातून एक वेळ शक्य असेल तर धुऊन घ्यावीत. दूध काढण्याची भांडी, यंत्र हे दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर जंतुनाशक द्रावणाच्या साह्याने किंवा धुण्याच्या सोड्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.
 • धार काढल्यानंतर अंदाजे अर्धा तास सडाची छिद्रे उघडी असतात. त्यामुळे त्यांना अर्धा ते पाऊण तास खाली बसू देऊ नये. त्यासाठी त्यांना चारा किंवा अंबोण खाण्यासाठी द्यावे.
 • ज्या जनावरांमध्ये कासदाह झाला आहे, त्याचे दूध सर्वांत शेवटी काढावे. असे दूध नष्ट करावे बाधित जनावरांना उपचार होईपर्यंत वेगळे ठेवावे.

गाभण जनावरांना आटवणे 

 • जनावर हे गाभण असण्याच्या आठव्या महिन्यामध्ये आटविले जाते. त्यामुळे वासरांची चांगल्या प्रकारे वाढ होते. तसेच जनावरांना विश्रांती मिळते. जास्त दूध देणाऱ्या जनावरांना आटविताना धार काढणे लगेच थांबवू नये. त्यामुळे कासदाह होण्याची शक्यता असते.
 • जनावरांना आटविताना टप्प्याटप्प्याने म्हणजेच दररोज दोन वेळा धार काढण्याऐवजी एक वेळा, काही दिवसांनंतर दोन दिवसांतून एकदा धार काढावी आणि त्यानंतर धार काढणे बंद करावे.
 •  भाकड काळ हा सुप्त कासदाह होण्याकरिता अत्यंत पोषक असतो. यामुळे व्यायल्यानंतरच्या दुग्धोत्पादन काळात लक्षणीय कासदाह होण्याची दाट शक्यता असते. म्हणून दुधाळ जनावरे आटल्यानंतर त्याच्या सडाच्या छिद्रामध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने टीट सीलंटचा वापर करावा. यामुळे जिवाणू आतमध्ये प्रवेश करत नाहीत. जनावराला आटविण्याच्या वेळेस प्रतिजैविकाचा वापर करणे आवश्यक आहे.
 • जनावर आटविल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांसाठी प्रतिजैविकांचा वापर करावा. ज्यामुळे सडाच्या आत असलेल्या संसर्गाचा प्रतिबंध होतो.
 • जनावर दुधातून आटवण्याच्या वेळेला प्रतिजैविकाचा वापर करणे अतिशय फायदेशीर आहे. कारण जनावरांमध्ये आटवण्याच्या वेळेस सर्वांत जास्त रोगजंतू कासेतून आत प्रवेश करतात.

टीट सीलंटचा वापर 

 • सडाच्या आतून वापरण्यात येणारे आणि बाहेरून वापरण्यात येणारे टीट सिलर असे टीट सीलंटचे प्रकार आहेत.
 • टीट सिलंट म्हणून आयुर्वेदिक टीट सिलंट वापरणे हे फायदेशीर आहे

कासदाह बाधित जनावरांचे उपचार 

 • कासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या साह्याने वेळोवेळी योग्य ते उपचार करून घ्यावेत. हे उपचार किमान तीन ते पाच दिवसासाठी करणे आवश्यक आहे.
 • हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे बाधित जनावरांना उपचार होईपर्यंत वेगळे ठेवावे. अशा जनावरांचे दूध नष्ट करावे.
 • प्रतिजैविकांच्या उपचाराला जनावर प्रतिसाद देत नसल्यास बाधित जनावरांच्या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून उपचारासाठी योग्य ते प्रतिजैविक निवडून योग्य ते उपचार करावेत.
 • वारंवार बाधित होणाऱ्या जनावरांना गोठ्यातून कमी करावे किंवा तसे शक्य नसल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न करावेत.
 • सुप्त कासदाहाच्या निदानासाठी दुधाळ जनावराची आठवड्यातून एकदा चाचणी करून घ्यावी. हे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्वरित उपाययोजना करावी.
 • गोठ्यात खाली गवत किंवा रबर मॅट टाकावी.
 • शक्य असल्यास वासरांना स्वच्छ बाटलीने दूध पाजावे.

संपर्क ः डॉ. गिरीश पंचभाई, ९७३०६३०१२२
(पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्याकासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब...
कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्तगाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत...
कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्रकोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती...
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...