agricultural news in marathi cattle health advisory | Page 2 ||| Agrowon

कासदाहावर हळद, करंज, निर्गुडी उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर
गुरुवार, 4 मार्च 2021

गाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत घातक आजार म्हणजे कासदाह. या आजारामुळे दूध उत्पादन कमी होऊन जनावराचे एक किंवा अधिक सड निकामी होतात. ते कायमचे बंद होण्याची शक्यता असते. हा आजार रोगजंतूंमुळे होणारा असल्यामुळे याचा प्रादुर्भाव इतर जनावरांना देखील होऊ शकते.
 

गाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांमधील सर्वांत घातक आजार म्हणजे कासदाह. या आजारामुळे दूध उत्पादन कमी होऊन जनावराचे एक किंवा अधिक सड निकामी होतात. ते कायमचे बंद होण्याची शक्यता असते. हा आजार रोगजंतूंमुळे होणारा असल्यामुळे याचा प्रादुर्भाव इतर जनावरांना देखील होऊ शकते.

हा आजार लक्षणे दाखविण्यात पूर्वी जनावरांना झालेला असतो. म्हणजेच या आजारास कारणीभूत असणारे रोग जंतू जनावराच्या कासेमध्ये असतात. परंतु त्यांची संख्या कमी असते. परंतु ती आजाराचे लक्षण दिसण्यासाठी पुरेशी नसते. यालाच सुप्तावस्थेतील कासदाह म्हणतात.

या रोगजंतूंच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळताच हे रोगजंतू झपाट्याने वाढत जातात आणि मग सुरुवातीस सुप्तावस्थेत असलेला आजार लक्षणे दाखवू लागतो. हे लक्षात घेता पशुपालकाने गाफील न राहता जनावराच्या दुधाची तपासणी नियमित करणे आवश्यक आहे. जर हा आजार सुप्तावस्थेत देखील जनावरांमध्ये दिसून आला, तर तत्काळ पशुवैद्यकाद्वारे उपचार करावेत. या आजाराकडे केलेले दुर्लक्ष पशुपालकास नुकसानीचे ठरते कारण उपचारासाठी प्रतिजैविकांवर होणारा खर्च आणि बाधित झालेले एक किंवा एकापेक्षा जास्त सड कायमचे बंद होण्याची शक्यता असते.

आज सर्वत्र प्रतिजैविकांचा वापर कमी करण्यासाठी भर दिला जात आहे, परंतु हा आजार झाला तर प्रतिजैविकांचा वापर आवश्यक ठरतो त्यामुळे सुप्त अवस्थेत असतानाच केलेला उपचार किंवा हा आजार होऊ नये यासाठी केलेला उपचार महत्त्वाचा ठरतो. याशिवाय प्रतिजैविकांची मात्रा कमी करणे किंवा प्रतिजैविकांची क्षमता वाढविणे यासाठी यांच्या वापरासोबतच औषधी वनस्पतींचा वापर करणे फायद्याचे ठरते. सुप्तावस्थेतील कासदाह औषधी वनस्पतींच्या वापराने कमी होऊ शकतो.

आजाराची लक्षणे 

  • कासेला हात लावला तर गरम आणि कडक लागणे
  • कासेवर सूज येते, वेदना होत असल्यामुळे जनावर दूध काढू देत नाही
  • दुधात गाठी येतात, दुधातून रक्त येते.
  • एक किंवा एकापेक्षा जास्त सडावर किंवा कासेवर सूज येते.

उपयुक्त औषधी वनस्पती 
हळद 

  • कासदाह आजाराचे कारण जिवाणू अथवा बुरशी हे आहे. पर्यायाने हळदीचा वापर या आजारात उपयुक्त ठरतो.
  • हळदीमध्ये सूज विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म आहेत. या आजारात कासेवर सूज येऊन ती घट्ट म्हणजेच दगडासारखी कडक होते. हळदीमधील सूज विरोधी गुणधर्मामुळे कासेवर आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

कडुलिंब 
यामध्ये जिवाणू विरोधी आणि बुरशी विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे कडुलिंबाचे तेल किंवा लिंबोळीचा वापर या आजारात करावा.

करंज 
ही वनस्पती जिवाणू व बुरशी विरोधी गुणधर्म असलेली आहे.

निर्गुडी 

  • निर्गुडीचे पान सूज विरोधी आहे. मानवाच्या आजारात गुडघेदुखी किंवा सांधेदुखी यामध्ये निर्गुडीचा पाला वापरून त्याचा लेप बाधित भागावर लावतात. यामुळे सूज व वेदना कमी होतात.
  • कासदाह आजारात कासेवर लावण्यासाठी निर्गुडीच्या पानांचा वापर करावा.

कापूर 
कापराचा उपयोग सूज किंवा संसर्गाच्या विरोधात होतो.

टीप 
वरील सर्व वनस्पती एकत्र करून बारीक कराव्यात. या वनस्पतींचा लेप बाधित कासेवर लावावा.

संपर्क : डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...