श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस उपयुक्त

मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार होतात. श्‍वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करून आपण उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजेच सर्दी किंवा खोकला.
Adulsa
Adulsa

मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार होतात. श्‍वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करून आपण उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजेच सर्दी किंवा खोकला. वातावरणातील बदलामुळे होणारा हा आजार लवकर उपचार न केल्यास वाढत जातो. कारण सुरुवातीस किरकोळ लक्षणे दाखवणारा  हा आजार रोगजंतूंचा संसर्गामुळे किचकट बनतो. पाऊस, थंडी यामुळे जनावरास सर्दी होते, त्याचे नाक गळते, जनावर ठसकते ही लक्षणे आढळताच तत्काळ उपचार करावेत. अन्यथा, ही लक्षणे वाढत जातात. जनावरांना न्यूमोनिया होतो. याशिवाय जिवाणू, विषाणू अथवा परोपजीवी जंतूंचा संसर्ग संभवतो. नाकात सूज आलेली असल्यामुळे जनावरास श्‍वास घेण्यास त्रास होतो.  उपचाराचे प्रकार पोटात घेण्याची औषधे अडुळसा 

  • सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारी, मोठ्या आकाराची पाने आणि पांढऱ्या रंगाची फुले अशी ही वनस्पती सर्दी, खोकला, कफ या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. 
  • मानवाच्या आजारात सर्दी, खोकला, कफ या आजारावर आपण अडुळशापासून तयार केलेले औषध वापरतो. याच वनस्पतीचा प्रत्यक्ष उपयोग जनावरांमधील आजारात करता येतो. या वनस्पतीची पाने व मूळ औषधीमध्ये वापरावे.
  • तुळस 

  • श्‍वसनसंस्थेच्या आजारात तुळशीचे पाने अथवा बी म्हणजेच मंजुळा वापरल्या जातात.
  • तुळशीमुळे कफ पातळ होऊन हे आजार कमी होतात.
  • कंटकारी

  • या वनस्पतीस रिंगणी किंवा भुईरिंगणी असेदेखील म्हणतात.
  • ही वनस्पती श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारी आहे.
  • या वनस्पतीचे सर्वच भाग म्हणजेच मूळ, खोड, पान, फळ औषधीमध्ये वापरतात.
  • काळी मिरी 

  • या वनस्पतीचे फळ म्हणजेच मिरे. आपण पचनसंस्थेच्या आजारात वापरतो. हेच मिरे श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत उपयुक्त आहेत. 
  • श्‍वसनसंस्थेच्या आजारात ज्या वेळेस प्रतिजैविकांचा वापर आवश्‍यक ठरतो, म्हणजेच ज्या वेळेस संसर्ग झालेला आहे अशावेळी ही वनस्पती वापरल्यास प्रतिजैविकांचा परिणाम वाढतो, पर्यायाने प्रतिजैविकांचा वापर कमी मात्रेत किंवा कमी दिवस करू शकतो.
  • आले  आले किंवा सुंठीचा वापर श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारक ठरतो. शक्य असल्यास ओले आले वापरावे किंवा सुंठीचा वापरदेखील गुणकारी ठरतो. कासणी किंवा कासविंदा 

  • ही वनस्पती यकृत उत्तेजक म्हणून देखील वापरले जाते. 
  • वनस्पतीचा वापर श्‍वसनसंस्थेच्या आजारात उपयुक्त ठरतो. या वनस्पतीचे बी औषधीमध्ये वापरावे.
  •  ( टीप :  वरील सर्व वनस्पतींचा एकत्रित वापर अत्यंत गुणकारी ठरतो.) बाह्य उपचार 

  • सर्दी, खोकला या आजारावर बाह्य उपचार करत असताना एका भांड्यात पाणी गरम करावे. त्यात पाच ते दहा थेंब निलगिरी तेल आणि पाच ते दहा थेंब रोहिष या वनस्पतीचे तेल टाकावे. यानंतर तीन ते पाच ग्रॅम कापूर आणि तीन ते पाच ग्रॅम पुदिना या गरम पाण्यात टाकावा.
  • या पाण्यातून जी वाफ निघते ती आजारी जनावरास द्यावी. या उपचार पद्धतीमुळे जनावरास झालेली सर्दी, खोकला कमी होतो.
  • हा उपचार करत असताना एखादी वनस्पती मिळाली नाही अथवा वरील पैकी केवळ एखादीच वनस्पती मिळाली तरीही चालते,  परंतु सर्व 
  • वनस्पतींचा एकत्र उपयोग हा जास्त गुणकारी ठरतो.
  • उपचार करताना गरम पाण्यामुळे जनावरास भाजणार नाही किंवा त्या पाण्यात जनावर तोंड घालणार नाही याची काळजी घ्यावी.
  •   - डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३ (प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com