agricultural news in marathi cattle health advisory | Page 2 ||| Agrowon

श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर
मंगळवार, 9 मार्च 2021

मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार होतात. श्‍वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करून आपण उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजेच सर्दी किंवा खोकला.
 

मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार होतात. श्‍वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करून आपण उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजेच सर्दी किंवा खोकला.

वातावरणातील बदलामुळे होणारा हा आजार लवकर उपचार न केल्यास वाढत जातो. कारण सुरुवातीस किरकोळ लक्षणे दाखवणारा  हा आजार रोगजंतूंचा संसर्गामुळे किचकट बनतो. पाऊस, थंडी यामुळे जनावरास सर्दी होते, त्याचे नाक गळते, जनावर ठसकते ही लक्षणे आढळताच तत्काळ उपचार करावेत. अन्यथा, ही लक्षणे वाढत जातात. जनावरांना न्यूमोनिया होतो. याशिवाय जिवाणू, विषाणू अथवा परोपजीवी जंतूंचा संसर्ग संभवतो. नाकात सूज आलेली असल्यामुळे जनावरास श्‍वास घेण्यास त्रास होतो. 

उपचाराचे प्रकार
पोटात घेण्याची औषधे

अडुळसा 

 • सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारी, मोठ्या आकाराची पाने आणि पांढऱ्या रंगाची फुले अशी ही वनस्पती सर्दी, खोकला, कफ या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. 
 • मानवाच्या आजारात सर्दी, खोकला, कफ या आजारावर आपण अडुळशापासून तयार केलेले औषध वापरतो. याच वनस्पतीचा प्रत्यक्ष उपयोग जनावरांमधील आजारात करता येतो. या वनस्पतीची पाने व मूळ औषधीमध्ये वापरावे.

तुळस 

 • श्‍वसनसंस्थेच्या आजारात तुळशीचे पाने अथवा बी म्हणजेच मंजुळा वापरल्या जातात.
 • तुळशीमुळे कफ पातळ होऊन हे आजार कमी होतात.

कंटकारी

 • या वनस्पतीस रिंगणी किंवा भुईरिंगणी असेदेखील म्हणतात.
 • ही वनस्पती श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारी आहे.
 • या वनस्पतीचे सर्वच भाग म्हणजेच मूळ, खोड, पान, फळ औषधीमध्ये वापरतात.

काळी मिरी 

 • या वनस्पतीचे फळ म्हणजेच मिरे. आपण पचनसंस्थेच्या आजारात वापरतो. हेच मिरे श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत उपयुक्त आहेत. 
 • श्‍वसनसंस्थेच्या आजारात ज्या वेळेस प्रतिजैविकांचा वापर आवश्‍यक ठरतो, म्हणजेच ज्या वेळेस संसर्ग झालेला आहे अशावेळी ही वनस्पती वापरल्यास प्रतिजैविकांचा परिणाम वाढतो, पर्यायाने प्रतिजैविकांचा वापर कमी मात्रेत किंवा कमी दिवस करू शकतो.

आले 
आले किंवा सुंठीचा वापर श्‍वसनसंस्थेच्या आजारात अत्यंत गुणकारक ठरतो. शक्य असल्यास ओले आले वापरावे किंवा सुंठीचा वापरदेखील गुणकारी ठरतो.

कासणी किंवा कासविंदा 

 • ही वनस्पती यकृत उत्तेजक म्हणून देखील वापरले जाते. 
 • वनस्पतीचा वापर श्‍वसनसंस्थेच्या आजारात उपयुक्त ठरतो. या वनस्पतीचे बी औषधीमध्ये वापरावे.

 (टीप : वरील सर्व वनस्पतींचा एकत्रित वापर अत्यंत गुणकारी ठरतो.)

बाह्य उपचार 

 • सर्दी, खोकला या आजारावर बाह्य उपचार करत असताना एका भांड्यात पाणी गरम करावे. त्यात पाच ते दहा थेंब निलगिरी तेल आणि पाच ते दहा थेंब रोहिष या वनस्पतीचे तेल टाकावे. यानंतर तीन ते पाच ग्रॅम कापूर आणि तीन ते पाच ग्रॅम पुदिना या गरम पाण्यात टाकावा.
 • या पाण्यातून जी वाफ निघते ती आजारी जनावरास द्यावी. या उपचार पद्धतीमुळे जनावरास झालेली सर्दी, खोकला कमी होतो.
 • हा उपचार करत असताना एखादी वनस्पती मिळाली नाही अथवा वरील पैकी केवळ एखादीच वनस्पती मिळाली तरीही चालते,  परंतु सर्व 
 • वनस्पतींचा एकत्र उपयोग हा जास्त गुणकारी ठरतो.
 • उपचार करताना गरम पाण्यामुळे जनावरास भाजणार नाही किंवा त्या पाण्यात जनावर तोंड घालणार नाही याची काळजी घ्यावी.

 - डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...