agricultural news in marathi cattle health advisory | Page 3 ||| Agrowon

जनावरांमधील पायाचा वात

डॉ. शुभांगी वाघमारे, डॉ. इरावती सरोदे
शुक्रवार, 12 मार्च 2021

या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्‍भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते.

या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्‍भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते.

जनावरांमध्ये मुख्यतः गोवंशामध्ये मागील एका किंवा दोन्ही पायांमध्ये वात असण्याची समस्या दिसून येते. थंड वातावरणामध्ये वाताची लक्षणे अधिक तीव्र होतात. या आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच बाधित पायामध्ये लंगडेपणा येतो. यामुळे कार्यक्षमतेवर आणि हालचालीवर परिणाम होतो. शिवाय प्रभावित जनावराचे बाजारमूल्य देखील कमी होते. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्‍भवल्यास कामांचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. या आजारामध्ये गरजेच्या शस्त्रक्रियेसाठी कुशल विषेशज्ञ नसल्याने वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत.

आजाराची कारणे
हा आजार मागील पायाच्या गुडघ्याची वाटी उर्ध्वगामी स्थिर झाल्याने होतो. वाटी उर्ध्वगामी स्थिर होण्याची मुख्य कारणे ः  

 • आनुवंशिकता
 • पोषण कमतरता 
 • कामाचा अतिरेक 
 • बाह्य मुकामार 
 • वाटीच्या सांध्याचे (स्टाइफल सांधा) अकारीय बदल 
 • वाटीच्या बाजूच्या स्नायूंचे (क्रुरल ट्राइसेफ स्नायू) तीव्र आकुंचन.

मुख्य लक्षणे

 • विश्रांतीनंतर वात असलेल्या पायाने वैशिष्ट्यपूर्ण लंगडणे. पाय आकडताना किंवा आकुंचन करताना झटके देणे.
 • वाताच्या पायाचा विस्तार व खुराच्या वरील सांध्याचे आकुंचन होते.
 • एका पायात वात असल्यास, तो पाय पुढे टाकताना बाहेरच्या बाजूला अर्धगोलाकार फिरवून पुढे टाकणे. 
 • जेव्हा दोन्ही पायांत वात असतो, त्या वेळी दोन्ही पायांचा विस्तार झाल्यामुळे जनावराला खाली बसता येत नाही. तसेच पाऊल पुढे टाकता येत नाही.
 • आजार गंभीर झाल्यास वाताच्या पायाचे स्थिरीकरण होते.
 • काही जनावरांमध्ये वाताच्या पायाचा संबंध सतत जमिनीशी आल्याने खुराच्या वरील भागाला जखम होऊ शकते.
 • लक्षणे काही काळ चालल्यानंतर दिसत नाहीत. मात्र विश्रांतीनंतर पुन्हा दिसतात.

उपचार 

 • शस्त्रक्रिया हाच योग्य उपचार आहे. 
 • वात असलेल्या पायाच्या वाटीला (पटेला हाडाला) जोडणाऱ्या आतील अस्थिबंधनाची शस्त्रक्रिया केली जाते.
 • शस्त्रक्रिया झाल्यानंतर पशुला काही काळासाठी विश्रांती द्यावी लागते. याव्यतिरिक्त जास्त काळजी घ्यावी लागत नाही.
 • ही शस्त्रक्रिया खूप कमी वेळ व अल्प खर्चामध्ये होणारी आहे.
 • शस्त्रक्रिया केल्यानंतर जनावरावर कामासाठी कोणतेही बंधन राहत नाही.

- डॉ. शुभांगी वाघमारे,  ९६८९८४३५३६
(पशुवैद्यकीय शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...