योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे नियंत्रण

उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचा समावेश करू नये. यामुळे जनावरांना पचन संस्थेचे विकार होऊ शकतात. तंतुमय घटकांचे पचन नीट होत नाही. यासाठी दुसरा उपाय म्हणून आपण बायपास फॅट वापरू शकतो.
Supplementary feed should be used in animal feed.
Supplementary feed should be used in animal feed.

उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचा समावेश करू नये. यामुळे जनावरांना पचन संस्थेचे विकार होऊ शकतात. तंतुमय घटकांचे पचन नीट होत नाही. यासाठी दुसरा उपाय म्हणून आपण बायपास फॅट वापरू शकतो. जनावरांनी खाद्य खाल्यानंतर चयापचय (मेटाबोलिक हीट) उष्णतेचे उत्पादन वाढते. वेगवेगळ्या खाद्यपदार्थामध्ये उष्मा वाढविणारी भिन्नता असते. मध्यम ते उच्च-उत्पादन देणाऱ्या दुधाळ गायींमध्ये खाद्य घटकांची उष्णता वाढ एकूण उष्णता उत्पादनाच्या दोन तृतीयांश असू शकते. योग्य फॅट तसेच तंतुमय घटकांची मात्रा वापरून तयार केलेले खाद्य उन्हाळ्यामध्ये फायदेशीर ठरते. उष्ण तापमानात जनावरांचे खाद्य सेवन कमी होते, त्यामुळे योग्य त्या प्रमाणात ऊर्जा शरीराला मिळत नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन आहारमधील चाऱ्याचे प्रमाण कमी करून आपण कॉन्सन्ट्रेट्सचे प्रमाण वाढवू शकतो. यामुळे ऊर्जेची घनता वाढण्यास मदत होईल. धान्य आणि तंतुमय आहार देताना  

  • कॉन्सन्ट्रेट्स ५५ ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहारामध्ये समाविष्ट करू नये नॉनस्ट्रक्चरल कर्बोदकांचे प्रमाण ३५ ते ४० टक्के, ड्राय मॅटर (आहार) इतके असावे.एन.डी.एफ.चे प्रमाण २७ ते ३३ टक्के असावे. खाद्य घटकांच्या कणांचा पुरेसा आकार असावा.
  • फॅटमध्ये कर्बोदकांपेक्षा २.२५ पटीने जास्त ऊर्जा असते. उन्हाळ्यात जेव्हा खाद्य पदार्थांचे सेवन घटते. अशा वेळेस फॅट हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो. जास्त ऊर्जा असल्याने आहारातील ऊर्जेची घनता वाढते. याचा थेट परिणाम दुग्धोत्पादनावर दिसून येतो. 
  • आहारामध्ये साधारणतः ५ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचा समावेश करू नये. यामुळे जनावरांना पचन संस्थेचे विकार होऊ शकतात. तंतुमय घटकांचे पचन नीट होत नाही. यासाठी दुसरा उपाय म्हणून आपण बायपास फॅट किंवा संरक्षित वसा वापरू शकतो. सदर फॅट हे रूमेनमध्ये इनर्ट राहते. त्याचे पचन आणि शोषण अबोम्याझममध्ये (खरे पोट) होते. 
  • क्रूड प्रोटीन किंवा कच्ची प्रथिनांचे प्रमाण ः आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी असल्यास त्याचा परिणाम आपल्याला साहजिकच दुग्धोत्पादनावर दिसून येतो. परंतु प्रथिनांची मात्रा जास्त असल्यास त्यांचा शरीरासाठी योग्य तो वापर करून घेण्यासाठी ऊर्जादेखील तेवढीच लागते. 
  • दुधाळ जनावरांना जेव्हा योग्य प्रथिनयुक्त आहार सावली किंवा थंड ठिकाणी दिला जातो, तेव्हा ते खाद्याचे योग्य त्या प्रमाणात सेवन करतात. यामुळे प्रथिनांचे सेवन वाढते. याचा परिणाम दुग्धोत्पादनावर दिसून येतो.
  • बायपास प्रोटीनचा वापर 

  • बायपास फॅट प्रमाणेच बायपास प्रोटीनचे पचन आणि शोषण रूमेनमध्ये न होता अबोम्याझम (खरे पोट) मध्ये होते. परिणामतः जनावराला प्रथिने जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. 
  • दुधातील एसएनएफ वाढीसाठी प्रथिनांची शरीराला जास्त उपलब्धता करून देणे आवश्यक असते.
  • तंतुमय घटकांचे महत्त्व 

  • रूमेनच्या योग्य कार्यक्षमतेसाठी तंतुमय घटक हा एक अविभाज्य घटक आहे. कॉन्सन्ट्रेट्स सोबत तुलना करता तंतुमय घटकांच्या पचनातून निर्माण होणारी ऊर्जा ही जास्त असते. 
  • जास्त तापमानात जनावरे चाऱ्याचे सेवन कमी करतात.  याचा परिणाम पचन संस्थेवर दिसून येतो. ही समस्या सोडविण्यासाठी चारा कापून टीएमआरमध्ये मिसळावा. मुरघासाचा वापर करावा.कोरड्या खाद्यामध्ये पाणी वापरावे, यामुळे खाद्याचे सेवन वाढेल. 
  • उच्च प्रतीचा आणि पचायला सहज चारा उपलब्ध करून द्यावा.
  • आहार व्यवस्थापन 

  • खाद्यामध्ये अचानक बदल करू नये करावयाचा असल्यास टप्प्याने करावा. खाद्य सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. 
  • आहाराची तसेच खाद्याची घनता वाढवावी, जेणेकरून कमी सेवन केले असता जास्त ऊर्जा मिळेल. खनिज मिश्रणाचा योग्य प्रमाणात समावेश करावा. 
  • मुरघास बुरशीविरहित असावा. खाद्य घटकांचा वास येत असल्यास देऊ नये. 
  • खाद्य घटकाचा आकार व्यवस्थित असावा. आकार जास्त असल्यास अधिक ऊर्जा चर्वण करण्यात वाया जाते. 
  • टीएमआर असल्यास सर्व घटकांचे योग्य त्या प्रमाणात मिश्रण करावे.
  • जनावरे एखादा विशिष्ट खाद्य घटक निवडून खात असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. 
  • स्वच्छ पाण्याची सोय करावी.  
  • - डॉ. अक्षय वानखडे,   ८६५७५८०१७९ (लेखक पशू पोषण व आहार तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com