agricultural news in marathi cattle health advisory | Agrowon

जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी उपयुक्त

डॉ. सुधीर राजूरकर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु पशुपालक याकडे सुरुवातीस दुर्लक्ष करतात. पर्यायाने याची तीव्रता वाढते. या आजारावर वनस्पतिजन्य औषधाने उपचार शक्य आहे. 
 

मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु पशुपालक याकडे सुरुवातीस दुर्लक्ष करतात. पर्यायाने याची तीव्रता वाढते. या आजारावर वनस्पतिजन्य औषधाने उपचार शक्य आहे. 

शरीरातील अपायकारक, अनावश्यक घटक रक्तातून बाहेर काढणे आणि ते मूत्राद्वारे विसर्जित करणे हे मूत्रसंस्थेचे कार्य. विसर्जन करण्याच्या क्रियेत अडथळा झाल्यास त्याचा गंभीर परिणाम होतो. हा अडथळा म्हणजेच मूतखडा. हा आजार जनावरांमध्ये देखील आढळतो. पशुखाद्यामध्ये जास्त प्रमाणात असलेल्या ऑक्झलेट, इस्ट्रोजन, सिलिकामुळे हा आजार संभवतो. याशिवाय पिण्याच्या  पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार हेदेखील आजारास कारणीभूत ठरतात. 

मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु पशुपालक याकडे सुरुवातीस दुर्लक्ष करतात किंवा हा आजार त्यांच्या लक्षात येत नाही. पर्यायाने आजाराची तीव्रता वाढते. जनावरे योग्य प्रमाणात मूत्रविसर्जन करत नाहीत. शेवटी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत 
नाही.

उपयुक्त औषधी वनस्पती 
गोखरू 

सराटे अशा नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे फळ म्हणजे सराटे औषधीमध्ये वापरतात. याचा वापर करत असताना सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत. कारण हे काटे अन्ननलिका किंवा पोटामध्ये इजा करू शकतात.

हाडवणी 
मूतखडा या आजारावर उपयुक्त असलेली ही वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये जिवाणूविरोधी देखील गुण आहेत. वनस्पतीची साल औषधात वापरतात. सालीचे चूर्ण किंवा रस उपचारासाठी वापरतात.

पाषाणभेद 
सर्वत्र आढळणारी ही वनस्पती नावाप्रमाणेच पाषाण म्हणजेच मूतखडा भेदण्यासाठी उपयुक्त आहे.

कुलशी 
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश  व दक्षिण भारतात सर्वत्र आढळणारी ही वनस्पती. या वनस्पतीचे बी औषधीमध्ये वापरतात.

सेगमकटी 
विशेषतः दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती मूत्रसंस्थेच्या बहुतांशी आजारांमध्ये उपयुक्त आहे. या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.

गोरख गांजा 
सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण किंवा रस औषधीमध्ये वापरतात.

(टीप : वरील सर्व वनस्पती एकत्र करून बारीक करून घ्याव्यात. जनावरांच्या खाद्यातून किंवा पाण्यातून पाजाव्यात.)

- डॉ. सुधीर राजूरकर,    ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, 
परभणी)

 


इतर कृषिपूरक
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...