agricultural news in marathi cattle health advisory | Page 3 ||| Agrowon

शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील
मंगळवार, 4 मे 2021

जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. हे लक्षात घेऊन शिफारशीनुसार लसीकरण आवश्यक आहे.
 

जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. हे लक्षात घेऊन शिफारशीनुसार लसीकरण आवश्यक आहे.

पशूपालनातील आर्थिक उत्पन्नासाठी गोठा व्यवस्थापन, आहार नियोजन , लसीकरण जतंनिर्मुलन इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.  लसीकरण न करून घेतल्यामुळे लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप इ. आजारामुळे जनावरे आजारी पडतात. 

  •   दरवर्षी बऱ्याच ठिकाणी लाळ्या खुरकूत आजाराचा गायी, म्हशींना प्रादुर्भाव  दिसून येतो. या प्रादुर्भावामुळे केवळ प्रत्यक्ष जनावर दगावून नुकसान होत नाही तर अनेक अप्रत्यक्ष घटकांमुळे आर्थिक नुकसान होत असते. मरतुकीमुळे प्रत्यक्षपणे आर्थिक नुकसान होते. 
  •   जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. 
  •   लाळ्या खुरकूत झाल्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन होणारे आर्थिक नुकसान हे ६० ते ६८ टक्के होते.  याच्या प्रादुर्भावामुळे आपल्याकडील उत्पादित मांस व दूध यांना प्रगत देशात अत्यल्प मागणी आहे. यामुळे आपल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळत नाही आणि अप्रत्यक्षपणे आपले नुकसान होते. 
  •   जनावरांना  लसीकरण न केल्यामुळे होणाऱ्या आजारांचा मानवी आरोग्यावरही काही प्रमाणात अपाय होत असतो. 
  •   सध्याच्या काळात जनावरांना लसीकरण करून घेण्याची वेळ आहे. तरी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. परिणामकारक लसीकरण मोहिमेसाठी ‘ मास लसीकरण ’ (Mass Vaccination) ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. ‘मास लसीकरण’  म्हणजे एका गावातील, वस्तीवरील सर्व जनावरांचे  एकावेळी/ एकादिवशी लसीकरण करणे. यामुळे  प्रसारास आळा बसून आजाराचे उच्चाटन होण्यास निश्चीत मदत होईल.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ७५८८०६२५५६ 
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)


इतर कृषिपूरक
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...
उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची...वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
गाई, म्हशींमधील छातीचे आजारजनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर...
वराहपालन सुरू करताना...वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून...
गीर संवर्धन करणारा भरवाड समुदायभरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे....
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान...
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या...जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र,...
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...