agricultural news in marathi cattle health advisory | Page 3 ||| Agrowon

उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची काळजी

डॉ. कुलदीप शिंदे
मंगळवार, 25 मे 2021

वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे दुधाळ जनावरे, संकरित गाई आणि म्हशींमध्ये प्रामुख्याने ताण दिसून येतो. यामुळे जनावरे अस्वस्थ होतात. त्याचा आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.
 

वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे दुधाळ जनावरे, संकरित गाई आणि म्हशींमध्ये प्रामुख्याने ताण दिसून येतो. यामुळे जनावरे अस्वस्थ होतात. त्याचा आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.

जनावरांमध्ये उष्णतेच्या ताणाची लक्षणे म्हणजे भूक आणि तहान मंदावते. दूध उत्पादन क्षमता १५ ते २० टक्के आणि प्रजननक्षमता ४० ते ५० टक्क्यांनी कमी होते. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता होते.वातावरणातील तापमान वाढल्यामुळे किंवा तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीराचे तापमान स्थिर करण्यासाठी जनावरांच्या शरीरामध्ये थर्मोरेगुलेशन प्रक्रिया चालू होते. ही प्रक्रिया दोन पद्धतीने पूर्ण होते.

पहिल्या प्रक्रियेमध्ये शरीरातील वाढलेले तापमान कमी करण्यासाठी जनावरांच्या कातडीखाली रक्ताचा प्रवाह वाढतो. जनावरे जोर जोरात धापा टाकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात लाळ बाहेर पडते. ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता जनावरांना २० टक्के अतिरिक्त ऊर्जा लागते. त्यामुळे दूध उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा याकरिता वळविली जाते. यामध्ये जनावरांचे दूध उत्पादन  कमी होते. 

दुसऱ्या प्रक्रियेमध्ये शरीरामध्ये कमीत कमी उष्णता तयार होण्यासाठी जनावरांमध्ये आपोआप बदल घडून येतात. जनावरांमध्ये शुष्क पदार्थ ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. जनावरांमध्ये रवंथ करण्याची गती मंदावते. जनावरांना संपूर्ण मिश्रित आहार दिला तर जनावरे दिलेला आहार निवडून खाण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये जास्तीत जास्त धान्य किंवा पशू खाद्य खाण्याचा प्रयत्न करतात. कोरडा चारा गव्हाणीमध्ये तसाच ठेवतात. यामुळे जनावरांची पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे देखील दूध उत्पादन कमी होते. जनावरे रवंथ कमी करत असल्यामुळे लाळेचे प्रमाण कमी होते. तयार झालेल्या लाळेमधील जास्तीत जास्त भाग जनावरे धापा टाकत असल्यामुळे बाहेर पडतो. कमीत कमी लाळ ही ओटीपोटामध्ये प्रवेश करते. त्यामुळे ओटीपोटातील सामू कमी होतो आणि तिथे जास्त आम्ल तयार होते. जास्त तयार झालेल्या आम्लामुळे तंतुमय पदार्थांचे पचन करणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तंतुमय पदार्थांचे पचन कमी होते. तंतुमय पदार्थांचे पचन कमी झाल्यामुळे ओटीपोटामध्ये जास्त आम्ल तयार होते. यामुळे कासदाह, लंगडेपणा दिसतो. ओटीपोटामध्ये जास्त आम्ल तयार झाल्यामुळे ओटीपोटातील एसीटेट: प्रोपीनेट गुणोत्तरामध्ये बदल होतो म्हणजेच तो कमी होतो. एसीटेट चे प्रमाण कमी होते, प्रोपीनेटचे प्रमाण वाढते आणि ब्युटीरेटचे प्रमाण देखील कमी होते परिणामी दुधामधील फॅटचे प्रमाण कमी होते.

गोठ्याचे योग्य व्यवस्थापन  

  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवा खेळती ठेवावी. शक्य असल्यास फॅन, एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा.
  • विदेशी गाईसाठी योग्य उंची असलेली शेड बांधावी. कडक उन्हाळ्यामध्ये फॉगर आणि स्प्रिंकलरचा योग्य उपयोग करून जनावरांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतो.

आहार व्यवस्थापन  

  • स्वच्छ ताजे पाणी द्यावे. आहार आणि चारा देण्याच्या वेळेमध्ये बदल करावा.
  • जनावरे दिवसा तापमान जास्त असल्यामुळे चारा कमी खातात. त्यामुळे चारा रात्रीच्या वेळी द्यावा.  
  • जनावरे रवंथ करणे कमी करतात. अशा वेळेस कोरडा चारा कमी करून हिरवा चारा जास्तीत जास्त द्यावा. हिरवा चारा कमी असेल तर मुरघास देऊ शकतो.  
  • जनावरांच्या ओटीपोटामध्ये आम्ल जास्त तयार झाल्यामुळे तंतुमय पदार्थांचे पचन योग्य पद्धतीने होत नाही. तंतुमय पदार्थांचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी लाइव्ह यीस्टचा वापर करावा. यामुळे जनावरांमध्ये कोरडा पदार्थ ग्रहण करण्याची क्षमता वाढते. उष्णता कमी तयार होते. उष्णतेच्या ताणामध्ये जनावरांना गुणवत्तायुक्त खनिज मिश्रण (५० ते १०० ग्रॅम प्रति दिवस) प्रामुख्याने सेलेनियम आणि जीवनसत्त्व अ, ड-३ आणि ई देण्यात यावीत. 
  • कोरडा चारा कमी आणि धान्य मिश्रण किंवा पशू खाद्य जास्तीत जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे रवंथ कमी करतात. यामुळे ओटीपोटामध्ये आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे ओटीपोटातील सामू कमी होतो. सामू स्थिर करण्याकरिता आपल्याला बफरचा उपयोग केला पाहिजे. यासाठी खाण्याच्या सोड्याचा उपयोग करावा. याचे परिणाम आपल्याला चार ते आठ तासांमध्ये पाहायला मिळतात. खाण्याच्या सोड्याचा वापर आपण शुष्क पदार्थ ग्रहण मात्रेच्या ०.८ टक्का (५० ते १०० ग्रॅम प्रति दिवस) देऊ शकतो, तसेच आपण घरगुती मिठाचा (१५ ते ३० ग्रॅम प्रति दिवस एक जनावर) वापर करू शकतो. यामुळे जनावरांची तहान वाढण्यास मदत होते. जनावर जास्त पाणी पितात. परिणामी, शरीराचे तापमान कमी होते.

- डॉ. कुलदीप शिंदे,  ९८८१४१४९६७
(सहायक प्राध्यापक, पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन, राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर)


इतर कृषिपूरक
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...