agricultural news in marathi cattle health advisory | Agrowon

जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलन

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. गजानन चिगुरे
मंगळवार, 1 जून 2021

जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. हे लक्षात घेऊन साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे.
 

जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. हे लक्षात घेऊन साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे.

जनावरांमध्ये जंत (कृमी) प्रादुर्भाव झाल्यास विशेषतः पावसाळा, हिवाळा ऋतूमध्ये ठरावीक कालांतराने जंतनाशकाची मात्रा दिली जाते. विशेषतः शेळी-मेंढीमध्ये सातत्याने जंतनिर्मूलन करावे लागते. कारण त्यांच्यामध्ये नियमितपणे जंताचा प्रादुर्भाव होतो. साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे. यामुळे शेळी-मेंढीचे परजीवीपासून संरक्षण होऊन उत्पादन, पुनरुत्पादन व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

काही कारणाने जेव्हा जंतनाशकाची ठरावीक मात्रा देऊनदेखील ५० टक्के कमी जंतांवर त्या औषधाचा परिणाम होत नाही, म्हणजेच ते कृमी त्या जंतनाशकाला प्रतिकारक्षम बनतात. ही प्रतिकारक्षमता पुढील पिढीमध्ये प्रसारित होते. म्हणून जनावरांमध्ये जंतनिर्मूलन केले असले, तरी त्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. जंतामधील प्रतिकारशक्ती त्यांच्या जनुकीय पातळीवर होते. जंतांच्या पुढील पिढ्यादेखील औषधास दाद देत नाहीत. ही एक अत्यंत घातक प्रक्रिया आहे. जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो.

जंतनाशकाप्रती प्रतिकारक्षमता तयार होण्याची कारणे 

 • एकच प्रकारचे जंतनाशक अनेक वेळेस वापरणे. विशेषतः त्याच वर्गातील जंतनाशक सातत्याने वापरणे.
 • जंतनाशकाची मात्रा परजीवीचा प्रजाती, पशुवैद्यकांचे मार्गदर्शन व परजीवीची प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता लक्षात न घेता सातत्याने चुकीचे जंतनाशक वापरणे.
 • जंतनाशकाचा योग्य प्रमाणामध्ये मात्रा न देता कमी प्रमाण, जास्त प्रमाण, कित्येक पटीने गरजेपेक्षा जास्तीचा वापर, न लागू होणारे जंतनाशक वापरणे इत्यादी.
 • जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असूनदेखील जंतनाशकाचा वापर करणे.
 • जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असताना इतर पर्यायी बाबींचा विचार न करणे.
 • विशिष्ट जंताच्या प्रजातीस लागू न होणारे जंतनाशक वापरणे. या सर्व बाबींचा परिणाम प्रतिकार क्षमता वाढण्यामध्ये होतो. शेळी-मेंढीमध्ये हिमॉन्कस कॉन्टूरटस हे रक्तशोषण करणारे जंत अनेक जंतनाशकाच्या प्रती आजच्या मितीस प्रतिकार शक्ती वाढवून तयार झाले आहेत. म्हणून त्यांच्यावर बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक जंतनाशकांचा परिणाम दिसून येत नाही.

उपाययोजना आणि काळजी 

 • जंतनाशक देण्यापूर्वी विष्ठेचे नमुने ः साधारणपणे १०० शेळ्या-मेंढ्यांपैकी कमीत कमी ५ शेळ्या-मेंढ्यांची तपासणी करून जंताची लागण झाली आहे का? प्रजाती कुठली? कुठले जंतनाशक प्रभावी आहे. जंतनाशकाची मात्रा देणे, खरंच आवश्‍यक आहे का? जंतप्रादुर्भावाची तीव्रता पशुतज्ज्ञांकडून करून घ्यावी.
 • तज्ज्ञांनी सांगितलेली मात्रा न बदलता योग्य प्रमाणामध्ये (कमी किंवा जास्त नको) जंतनाशकाची मात्रा द्यावी.
 •  तीन ते चार वेळेसच्या जंतनिर्मूलानंतर जंतनाशकाचा वर्ग बदलून नवीन वर्गातील जंतनाशक वापरावे. यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक आहे.
 • जंतनाशक देतेवेळेस शेळी-मेंढी गर्भवती आहे का? हे तपासावे. जंतनाशक गर्भास हानिकारक नसावे.

जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास नियंत्रणाचे पर्याय 

 • कुरणावर करावयाचे व्यवस्थापन आणि कुरणावर फिरत्या पद्धतीने जनावरास चारावे.
 • सकाळी दवबिंदू आहेत तोपर्यंत जनावरे आणि शेळी, मेंढीस
 • चरावयास सोडू नये.
 • कुरण व्यवस्थापनाच्या सर्व पद्धती एकत्रित वापराव्यात. व्यवस्थापनाद्वारे जंताचा प्रादुर्भाव व प्रसार कमीत कमी होईल. रासायनिक जंतनाशक देण्याची गरज भासणार नाही. याची दक्षता घ्यावी.
 • वनस्पतिजन्य जंतनाशके उपलब्ध झाल्यास आलटून-पालटून पद्धतीने रासायनिक जंतनाशकासोबत त्यांचाही वापर करावा.
 • कुरणामध्ये जंताच्या अर्भक अवस्था खूपच वाटल्यास त्यावर युरियाची हलकी मात्रा फवारल्यास चालते; परंतु यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्‍यक आहे. कारण युरियाची मात्रा वाढल्यास जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता असते.
 • कुरणातील गवतावर जंताची संख्या जास्त असल्यास ते गवत कापून वाळल्यानंतर जनावरांना खाण्यासाठी द्यावे.

संपर्क 
डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४
डॉ. गजानन चिगुरे, ९७६१९६४९९९
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण गरजेचे...जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे...
कार्प माशांच्या बीजांचे संगोपनमाशांचे निरंतर उत्पादन वाढविण्यासाठी योग्य...
गाईसाठी योग्य आकारमानाचा गोठागोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी...
गाई,म्हशींच्या संक्रमण काळातील आहार...संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील...
रेबीज बद्दल जागरूक रहा रेबीज हा उष्ण रक्ताच्या प्राण्यांचा, विषाणूद्वारे...
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...