agricultural news in marathi cattle health advisory | Page 3 ||| Agrowon

जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची कारणे

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. गजानन चिगुरे
मंगळवार, 15 जून 2021

जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास अनेक पर्याय निवडावेत.तीन ते चार वेळेच्या डिवर्मिंगनंतर जंतनाशकाचा गट बदलून नवीन गटातील जंतनाशक वापरावे. यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक आहे.
 

जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास अनेक पर्याय निवडावेत.तीन ते चार वेळेच्या डिवर्मिंगनंतर जंतनाशकाचा गट बदलून नवीन गटातील जंतनाशक वापरावे. यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक आहे.

एकच एक प्रकारचे जंतनाशक डिवर्मिंगसाठी अनेक वेळेस वापरल्याने प्रतिकारशक्ती तयार होते. विशेषतः त्याच वर्गातील जंतनाशक सातत्याने वापरले जाते. जंतनाशकाची मात्रा परजिवीचा प्रजाती, पशुवैद्यकांचे मार्गदर्शन व परजिवीचा प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता लक्षात न घेता सातत्याने चुकीचे जंतनाशक वापरले जाते. जंतनाशकाची योग्य प्रमाणामध्ये मात्रा न देता कमी प्रमाण, जास्त प्रमाण, कित्येक पटीने गरजेपेक्षा जास्तीचा वापर, न लागू होणारे जंतनाशक वापरल्याने प्रतिकारशक्ती तयार होते.

जंताचा प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असूनदेखील जंतनाशकाचा सातत्याने वापर, जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असताना इतर पर्यायी बाबींचा विचार न करणे आणि विशिष्ट जंतांच्या प्रजातीस लागू न होणारे जंतनाशक वापरल्यानेदेखील प्रतिकारशक्ती वाढीस लागली आहे. शेळी-मेंढीमध्ये "हिमॉन्कस कॉन्टूरटस' हे रक्त शोषण करणारे जंत अनेक जंतनाशकाच्या प्रती आजच्या मितीस प्रतिकारशक्ती वाढवून तयार झाले आहेत. म्हणून त्यांच्यावर बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक जंतनाशकांचा त्यांच्यावर परिणाम दिसून येत नाही.

करावयाचे उपाय 

 • जंतनाशक देण्यापूर्वी विष्ठेचे नमुने साधारणपणे १०० शेळ्या-मेंढ्यांपैकी कमीत कमी ५ शेळ्या-मेंढ्यांची तपासणी करून जंताचा प्रादुर्भाव झाला आहे का? प्रजाती कुठली? कुठले जंतनाशक प्रभावी आहे व जंतनाशकाची मात्रा देणे खरंच आवश्‍यक आहे का? म्हणजे जंत प्रादुर्भाव होण्याची तीव्रता पशुवैद्यक तज्ज्ञांकडून करून घ्यावी.
 • तज्ज्ञांनी सांगितलेला दिलेल्या शिफारशीपेक्षा तसूभरही न बदलता योग्य प्रमाणामध्ये (कमी किंवा जास्त नको) जंतनाशकाची मात्रा द्यावी.
 • तीन ते चार वेळेसच्या डीवर्मिंगनंतर जंतनाशकाचा गट बदलून नवीन गटातील जंतनाशक वापरावे. पशुतज्ज्ञाचा सल्ला आवश्‍यक आहे.
 • जंतनाशक देते वेळेस शेळी-मेंढी गर्भवती आहे का, त्यानुसार जंतनाशक गर्भास हानिकारक नसावे.

जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास खालील पर्याय निवडावेत.

 • पडकावर करावयाचे व्यवस्थापन व पडकावर फिरत्या पद्धतीने पशुधनास चारावे.
 • सकाळी दवबिंदू आहेत तोपर्यंत जनावरे, शेळी-मेंढीस चरावयास सोडू नये.
 • पडक व्यवस्थापनाच्या सर्व पद्धती एकत्रित वापरून पडक व्यवस्थापनाद्वारे जंताचा प्रादुर्भाव कमीत कमी होईल. रासायनिक जंतनाशक देण्याची गरज भासणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • वनस्पतिजन्य जंतनाशके उपलब्ध झाल्यास आलटून पालटून पद्धतीने रासायनिक जंतनाशकासोबत त्यांचाही वापर करावा.
 • पडकावर जंताच्या अर्भक अवस्था खूपच वाढल्यास त्या पडकावर युरिया खताची हलकी मात्रा फवारल्यास चालते; परंतु यासाठी तज्ज्ञाचे मार्गदर्शन आवश्‍यक आहे. युरियाची मात्रा वाढल्यास विषबाधा संभवते.
 • पडकावरील गवतावर जंताचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ते गवत कापून वाळल्यानंतर जनावरांना खाण्यासाठी द्यावे.

जंतनाशकांचे वर्गीकरण 
जंतनाशके ही रासायनिक आहेत. जंतावर कशा प्रकारे क्रिया होते व ते जंतांना पक्षाघात (पॅरालिसिस) करतात. जनावरांच्या शरीरामधून बाहेर काढतात. या क्रियेनुसार जंतनाशकांचे प्रमुख दोन वर्ग आहेत.

पहिला वर्ग 
जंताची ऊर्जा निर्माण करणे किंवा चयापचय क्रियेवर आघात करणारी आणि त्याद्वारे त्यांना विकलांग करून शरीराबाहेर काढणारी जंतनाशके ः

 • जंताच्या मायटोकॉन्डीयामधील फ्युमारेटे रिएक्‍टेज या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण करणे. उदा. बेन्झीमिडॅझोल, लेव्हामिसाल
 • जंताच्या बाह्य आवरणामधून ग्लुकोज शोषण करण्याची प्रक्रिया बाधित करतात उदा. मिबेन्डॅझोल, फ्लूबेनडॅझोल
 • मायटोकॉन्डीयामधील ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य खंडित करतात. उदा. ऑक्‍सिक्‍लोर्झनाइड, रॅफॉक्‍झॅनाइड
 • ग्लायकोलायसिस प्रक्रियेद्वारे ऊर्जानिर्मितीमध्ये बाधा पोहोचवतात. उदा. अँटीमनी पोटॅशिअम टारटरेट
 • परजीवीच्या बाह्य आवरणामध्ये इजा करून परजीवीस नष्ट करतात उदा. प्राझीक्वेन्टाल

दुसरा वर्ग 
जंताचा मज्जातंतू व स्नायूंवर आघात करून त्यांना विकलांग बनवून शरीराबाहेर काढणारी जंतनाशके 

 • कोलीनरजीक संदेशवहनास सतत पुष्टी देऊन एक प्रकारचा विकलांगपणा जंतामध्ये तयार करतात.
 • उदा. लेव्हामिसाल, मोरेन्टाल, पायरेन्टाल, टेड्रामिसाल
 • मज्जातंतूमार्फत होणारे संदेशवहन काही रसायनामार्फत बंद केले जाते, परंतु अशा रसायनाच्या क्रियेमध्ये बाधा आणतात, सतत संदेशवहन होते. उदा. हेलाक्‍झॉन, काउम्फॉस
 • कोलीनरजीक संदेशवहन बंद पाडतात.
 • उदा. पायपरॉझीन, आयव्हरमेक्‍टीन
 • गाबा रसायनाद्वारे संदेशवहनाची नियंत्रित होणाऱ्या प्रक्रियेमध्ये बाधा. उदा. आयव्हरमेक्‍टीन

तिसरा वर्ग 
परजीवींच्या बाह्य आवरणामध्ये इजा करून त्यांना नष्ट करतात. उदा. प्राझिक्वेन्टाल.

जंतनाशकांच्या वर्गीकरणाचा फायदा 
एकच प्रकारचे जंतनाशक सततच्या डीवर्मिंगसाठी वापरल्यास त्याच्याप्रती संवेदना कमी होऊन परजीवी त्याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करतात. म्हणून वेगवेगळ्या वर्गातील जंतनाशके वापरणे आवश्‍यक ठरते.

 • बाजारामध्ये अनेक (नऊ) गटातील जंतनाशके ही जंतावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करणारी असतात.
 • दोन ते तीन वेळेच्या डीवर्मिंगनंतर जंतनाशकाचा वर्ग/ गट/ प्रकार बदलल्यास जंतनाशकाप्रती जंताकडून विकसित होत असलेली प्रतिकारशक्ती कमी होईल. त्यांचा परिणाम प्रभावीपणे उपयोगामध्ये घेता येईल.
 • एक बाब निश्‍चितपणे कटाक्षाने व्यवहारामध्ये आणणे गरजेचे आहे ती म्हणजे पशुवैद्यक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे जंतनाशक आणि त्याची मात्रा स्वतःच्या मनाने जनावरास देऊ नये. पशू तज्ज्ञ आपणास योग्य मार्गदर्शन करू शकतात. कारण जनावरांना प्रादुर्भाव झालेल्या परजिवी/ जंताची प्रजाती, जनावराचा प्रकार, लागणारी मात्रा यांचा सर्वंकष विचार करूनच कोणते जंतनाशक देणे योग्य राहील हे ठरवता येते.

संपर्क :  डॉ. बाबासाहेब नरळदकर - ९४०३८४७७६४
डॉ. गजानन चिगुरे - ९७६१९६४९९९
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....