agricultural news in marathi cattle health advisory | Page 2 ||| Agrowon

जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजना

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील
शनिवार, 3 जुलै 2021

संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याचे दिसून येते. या विषबाधेची लक्षणे तपासून उपाययोजना करावी.
 

संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याचे दिसून येते. या विषबाधेची लक्षणे तपासून उपाययोजना करावी.

उत्तम दुग्धोत्पादनासाठी कॅल्शिअम व फॉस्फरस या मुख्य क्षारांची जास्त प्रमाणात गरज असते. तसेच काही सूक्ष्मक्षारांचीही गरज असते. परंतु उपलब्ध चाऱ्यामधून या क्षारांची गरज पूर्ण होत नाही. या क्षारांची गरज क्षार मिश्रण, क्षारयुक्त द्रावण, कॅल्शिअम, फॉस्फरस- मॅग्नेशिअमयुक्त सलाइनद्वारे भागवली जाते. परंतु बऱ्याच वेळा पशुपालक जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेतून सतत देतात. विशेषत: संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. 

सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याची दिसून येते. याची कारणे तपासून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

विषबाधेची मुख्य कारणे 

  • कॅल्शिअम शिरेवाटे जास्त प्रमाणात  दिल्याने विषबाधा होते.
  • कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेवाटे जलद गतीने देणे.
  • गरज नसताना जास्त काळ आणि वारंवार कॅल्शिअम देणे.
  • रक्तात विषारी पदार्थ असताना कॅल्शिअम देणे.
  • शिरेवाटे कॅल्शिअमयुक्त सलाइन देताना जनावरांनी जास्त उड्या मारणे किंवा उत्तेजित होणे.
  • जनावरांना तोंडावाटे कॅल्शिअम घटक जास्त प्रमाणात, अनियमित वेळा देणे.
  • जनावरांना जास्त प्रमाणात द्विदल चारा देणे किंवा जनावराच्या आहारातील जास्त फॉस्फरसचे प्रमाण (धान्याचा जास्त प्रमाणात वापर.)

विषबाधेची लक्षणे 

  • रक्तामध्ये विषारी घटक असणाऱ्या जनावरांमध्ये नाडीच्या ठोक्यांचा दर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येतो, श्‍वसनाचा त्रास होणे, अडखळत चालणे, पडणे. काही मिनिटांमध्ये अशी जनावरे मृत्युमुखी पडतात.
  •  काही तंदुरुस्त जनावरांमध्ये हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो.
  •  घाबरलेल्या किंवा अति उत्तेजित जनावरांमध्ये कॅल्शिअम शिरेवाटे दिल्यास जनावर काहीही लक्षणे न दाखवता तत्काळ मृत्युमुखी पडते.
  •  शरीर तापमानात घट होणे, केस उभे राहतात, अशक्तपणा, मूतखडा, हाड व मांसपेशीमध्ये अशक्तपणा.
  •  पोट गच्च होणे.
  •  इतर क्षारांचे शोषण कमी होणे.
  • लक्षणे तपासून उपाययोजना करणे महत्वाचे आहे.

विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना 

  • कॅल्शिअमयुक्त सलाइनच्या बॉटलमध्ये कचरा, बुरशी आहे का ते पाहावे. जर कॅल्शिअमयुक्त सलाइन स्वच्छ असेल तरच ते जनावरांना द्यावे.
  •  जनावरांना शिरेवाटे कॅल्शिअम सलाइन देण्याआधी जनावरांच्या शरीर तापमानाबरोबर कॅल्शिअमयुक्त द्रावणाचे तापमान आणावे. त्यानंतरच कॅल्शिअम सलाइन द्यावे.
  • जनावरांमध्ये कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेवाटे हळूहळू मंदगतीने द्यावे.
  • कॅल्शिअमची अति मात्रा देऊ नये.
  • कॅल्शिअमयुक्त सलाइन देतेवेळी स्टेथॉस्कोपच्या साह्याने हृदयक्रियेची तपासणी करावी.
  • ज्या जनावरांना टॉक्सेमिया आहे, अशा जनावरांत कॅल्शिअम शिरेवाटे न देता त्वचेखाली द्यावे. कॅल्शिअमची मात्रा २५० मिलिपेक्षा वाढवू नये.
  • ज्या वेळी कॅल्शिअमचे सलाइन जनावरांना देणे सुरू आहे, त्या वेळी जनावर शांत उभे राहील याची काळजी घ्यावी.
  • विनाकारण वांरवार कॅल्शिअमचा अतिवापर टाळावा.
  •   कॅल्शिअम द्रावणात/ सलाइनमध्ये इतर औषधे मिसळू नये.
  • पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ८३२९७३५३१४, 
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)


इतर कृषिपूरक
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...
संकरित वासरांचे संगोपनजन्मानंतर वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के चीक...
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...