agricultural news in marathi cattle health advisory | Page 2 ||| Agrowon

वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची मात्रा

डॉ. बाबासाहेब नरळदकर,  डॉ. गजानन चिगुरे 
मंगळवार, 6 जुलै 2021

जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे जनावरांच्या शरीराची वाढ घटते. अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे शोषण करतात. या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्‍यकता असते. 

जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  जनावरांच्या शरीराची वाढ घटते. अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे शोषण करतात. या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्‍यकता असते. हे लक्षात घेऊन वेळेवर जंत निर्मूलनाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

ढोबळमानाने शेळी-मेंढीच्या सर्व वयोगटांमध्ये जंतनाशकाची मात्रा नियमितपणे दिली जाते; परंतु गाय-म्हैस यांच्यासाठी सर्व वयोगटांमध्ये त्याची आवश्‍यकता भासत नाही. अपवाद वासराचा वयोगट ते कालवड माजावर येईपर्यंत आणि त्यानंतर प्रसूतिपूर्व व पश्‍चात जंतनाशकाची मात्रा दिल्यास गाय-म्हशीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी फायदा होतो. 

जंतप्रादुर्भावामुळे होणारे नुकसान  

  • जंताचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पचनसंस्थेतील आम्ल स्रवण करणाऱ्या ग्रंथीस इजा होते. आम्लाचे संभाव्य प्रमाण घटल्यामुळे प्रथिनांचे पचन होत नाही. शरीराची वाढ व वजन घटते.
  • अनेक प्रजातीचे जंत हे कोलेसीस्टोकायनीन यांच्या प्रमाणात वाढ घडवून आणतात. यामुळे मेंढीमध्ये व इतर जनावरांच्यामध्ये ३० टक्के भूक मंदावते. परिणामी वजनात घट होते.
  • जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे शरीराची वाढ घटतेच; परंतु अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे देखील शोषण करतात. या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्‍यकता असते. जंताच्या प्रादुर्भावामुळे पुनरुत्पादनावर परिणाम होतो. 

कालवडीस नियमितपणे जंतनाशक देण्याचे फायदे   

  • अनेक संशोधनांद्वारे हे सिद्ध झाले आहे, की केवळ वय वाढले म्हणजेच कालवड माजावर येत नाही, तर त्यांचे ठरावीक वजन त्या प्रजातीनुसार वाढावे लागते. तरच कालवडी माजावर येतात. याचाच अर्थ परजीवीमुळे वजनातील घट होते. जंतनाशकाची मात्रा दिल्यानंतर योग्य वयामध्ये योग्य वजन वाढून कालवडी माजावर येतात. 
  • एका संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे, की कालवड माजावर येण्याच्या वेळेपर्यंत ठराविकपणे जंतनाशकाची मात्रा दिल्यास त्यांच्या माजावर (प्रथम माजावर) येण्याचा कालावधी ४४ दिवसांनी घटतो. म्हणजेच त्या पहिले वेत ४४ दिवस लवकर देतात. म्हणजेच त्यांच्यापासून ४४ दिवस वाढीव दुग्धोत्पादन लवकर मिळते. 

उदाहरणार्थ 

  • एक देशी गाय २.४१ लिटर दूध देत असल्यास एकूण दूध उत्पादन वाढ : ४४ × २.४१ = १०६ लिटर   
  • एक म्हैस ६.१९ लिटर दूध देते असल्यास एकूण दूध उत्पादन वाढ: ४४ × ६.१९ = २७२ लिटर इतका फायदा होऊ शकतो. 
  • जन्मल्यानंतर कालवडीस वयोगटापासून ते थेट माजावर येण्याचे वय (३४ - ३७ महिने) या वेळेपर्यंत पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व स्थानिक ठिकाणानुसार वेळापत्रक तयार करावे. त्यांना जंतनाशकाची मात्रा त्या वेळापत्रकानुसार नियमितपणे द्यावी. कालवडीचे माजावर येण्याचे वय व पुनरुत्पादन क्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठीही प्रयत्न करावा.

- डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ 
डॉ. गजानन चिगूरे, ९७६१९६४९९९
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...