agricultural news in marathi Causes of anemia and remedies ... | Agrowon

रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...

डॉ. साधना उमरीकर,  डॉ. सचिनकुमार सोमवंशी
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात व दुग्ध सर्जन काळात लोहाची जास्त गरज असते. अशा काळात लोहाची गरज पूर्ण न झाल्यास या अवस्थेत प्रामुख्याने रक्तक्षय जास्त प्रमाणात आढळतो. शरीरातील लोहाचे शोषण योग्य प्रकारे होण्यासाठी जीवनसत्त्व ‘क’ युक्त फळे व भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करावा. 

मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात व दुग्ध सर्जन काळात लोहाची जास्त गरज असते. अशा काळात लोहाची गरज पूर्ण न झाल्यास या अवस्थेत प्रामुख्याने रक्तक्षय जास्त प्रमाणात आढळतो. शरीरातील लोहाचे शोषण योग्य प्रकारे होण्यासाठी जीवनसत्त्व ‘क’ युक्त फळे व भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करावा. 

दैनंदिन आहारात लोहाचे प्रमाण कमी असणे, या बरोबरच इतर महत्त्वाची जीवनसत्वे जसे की, जीवनसत्त्व ‘ब’, फोलिक ॲसिड इत्यादीची नियमितपणे कमतरता असणे.शरीरातील रक्तसंस्थेचे कार्य बिघडल्यास रक्त निर्मितीचे प्रमाण घटते. आहारात वनस्पतिजन्य पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यास रक्तक्षय होतो. (लोहाचे व्यवस्थित शोषण होण्यासाठी प्राणीजन्य पदार्थांची आवश्यकता असते). मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात व दुग्ध सर्जन काळात लोहाची जास्त गरज असते. अशा काळात लोहाची गरज पूर्ण न झाल्यास या अवस्थेत प्रामुख्याने रक्तक्षय जास्त प्रमाणात आढळतो.  किशोरवयीन मुली व स्त्रिया यांच्यामध्ये मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्रावामुळे लोहाची शरीराला जास्त गरज असते. ही गरज पूर्ण न झाल्यास रक्तक्षय होतो. 

अनेक वेळा आहारातील लोहाचे प्रमाण जरी योग्य असले तरी इतर रासायनिक पदार्थांचा आहारात समावेश जास्त असल्यास लोहाचे योग्य प्रकारे शोषण होत नाही. उदा. आहारातील तंतुमय पदार्थ, कॅफेन टॅनिन, भाज्या व डाळींमधील फायटेट यांचे प्रमाण जास्त असल्यास लोहाच्या शोषणास अडथळा निर्माण होतो. पोटातील कृमीमुळे किंवा तर आजारामुळे देखील रक्ताचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. आहाराविषयी गैरसमजुती व चुकीच्या आहार पद्धतीमुळे देखील रक्तक्षय निर्माण होतो. क्षय, अल्सर, कर्करोग इत्यादी आजारांमध्ये पचन संस्थेमध्ये बिघाड निर्माण होऊन रक्तक्षय होतो. 

रक्तक्षयाची पडताळणी

 • व्यक्तीचे लिंग, वय यानुसार शरीरामधील रक्तातील हिमोग्लोबिनची सामान्य पातळी वेगवेगळी असते. 
 • रक्तातील हिमोग्लोबिनची सामान्य पातळी सर्वसामान्यपणे स्त्रियांमध्ये ११ ते १४ ग्रॅम व पुरुषांमध्ये १४ ते १८ ग्रॅम असणे आवश्यक असते. 

रक्तक्षयाची प्रमुख लक्षणे 
कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात रक्तक्षयाची सुरवात खूप मंदगतीने होते. म्हणून सुरवातीस व्यक्तीस याचे काही लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु सातत्याने आहारात लोहाची कमतरता राहिल्यास शरीरातील लोहाची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. 

रक्तक्षयाची लक्षणे 

 • रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १० ग्रॅम/डेसीलीटर पेक्षा कमी होते.
 • थोड्या कामानंतरही थकवा व अशक्तपणा जाणवतो. 
 • भूक लागत नाही, पचनक्रियेत बिघाड होतो.
 • त्वचेचा रंग फिकट होतो. 
 • प्रचंड डोके दुखते. निरुत्साह वाटतो. कार्यशक्ती कमी होते. काम करण्यात रस वाटत नाही.
 • व्यक्तीची ग्रहण क्षमता कमी होते. 
 • थोडेसे श्रम केल्यास दम लागतो. नाडीची गती वाढते.
 • नखे निस्तेज होतात, खोलगट दिसू लागतात.
 • चीडचीडेपणा वाढतो. पायाला गोळे आल्यासारखे वाटतात. 
 • डोळ्याचा आतील भाग लालसर दिसतो, फिकटपणा जाणवतो.
 • रोग प्रतिकारशक्ती कमी होते व व्यक्ती कोणत्याही आजाराला चटकन बळी पडते. 

रक्तक्षयाचे आरोग्यावर होणारे परिणाम

 • शरीरातील बहुतांशी लोह हे हिमोग्लोबीन स्वरूपातील लाल रक्तपेशीमध्ये तसेच मांसपेशीमध्ये असते. 
 • रक्तातील हिमोग्लोबीन फुफ्फुसापासून शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन पुरविण्याचे काम करते. तर मांसपेशीतील हिमोग्लोबीन म्हणजेच मायोग्लोबीन मांसपेशीत ऑक्सिजन साठविण्याचे काम करते. जेंव्हा शरीराला गरज निर्माण होते तेव्हा ते पुरविले जाते.
 • रक्तक्षय झालेल्या व्यक्तींमध्ये लाल रक्तपेशी फिकट गुलाबी दिसू लागतात. शरीरातील प्रत्येक पेशींना ऑक्सिजन पुरविण्याचे काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरातील पेशींमध्ये पुरेशी ऊर्जा तयार होत नाही. परिणामी व्यक्तीला थकवा जाणवू लागतो. ऊर्जेच्या अभावामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, निरुत्साह जाणवतो व चिडचिडेपणा वाढतो. 

रक्तक्षय प्रतिबंधात्मक उपाय
भारतामध्ये सर्वच स्तरातील व सर्व वयोगटातील व्यक्तीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. यामध्ये किशोरवयीन मुली, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांच्यातील रक्तक्षयाचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे ६०-७० टक्के एवढे आढळून आले आहे. म्हणूनच रक्तक्षयासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 

 • दैनंदिन आहारात जाणीव पूर्वक सुधारणा करणे.
 • लोह समृध्द पदार्थांचे नियमित सेवन करणे.
 • आहारात जीवनसत्त्व ‘क’ युक्त पदार्थांचा समावेश करणे.
 • जरुरी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक लोहयुक्त औषधे घेणे.
 • अन्न व पोषण विषयक प्रशिक्षण घेणे.
 • अन्न पदार्थांचे लोहसमृद्धीकरण करणे.

 रक्तक्षय टाळण्याचे सोपे उपाय  

 • दैनंदिन आहारात लोहसमृध्द पदार्थांचा जाणीवपूर्वक समावेश करावा. उदा. हळीव, कारळ, हिरव्या पालेभाज्या इत्यादी.
 • प्राणीजन्य पदार्थामध्ये लोहाची उपलब्धता जास्त असल्यामुळे अंडी, मांस यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. 
 • आहारात लोहयुक्त पदार्थांबरोबरच प्रथिनयुक्त पदार्थ जसे की विविध प्रकारच्या डाळी, दूध व तत्सम पदार्थांचे  प्रमाण वाढवावे. 
 • शरीरातील लोहाचे शोषण योग्य प्रकारे होण्यासाठी जीवनसत्त्व ‘क’ युक्त फळे व भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करावा. जीवनसत्त्व ‘क’ ची उपलब्धता मिळविण्यासाठी मोड आलेल्या उसळीचा वापर करावा. उदा. सर्व लिंबूवर्गीय फळे व ताज्या भाज्या आणि मोड आलेली कडधान्ये. 
 • घरच्या घरी सोप्या पद्धतीने लोहसमृध्द पदार्थ नेहमी आहारात ठेवावेत. उदा. हळीवाची पावडर करून गोड पदार्थ बनवावेत जसे की शेंगदाणा लाडू, पोहे, बेसन लाडू इत्यादी. 
 • कारळ्याचा वापरकरून तिखट पदार्थ जसे की, विविध भाज्यांमध्ये व चटण्यामध्ये करावा. 
 • जीवनसत्त्व ‘क’ च्या प्राप्तीसाठी आहारात आंबविलेल्या पदार्थांचा अधून मधून समावेश करावा. 
 • शक्य असेल तेव्हा पदार्थ बनविताना लोखंडाच्या भांड्यांचा वापर करावा. यामुळे अन्न पदार्थातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
 • चहामधील  टॅनीनमुळे लोहाचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो म्हणून असे पदार्थ सेवन करण्याचे टाळावेत. शक्यतो जेवणानंतर लगेच चहा घेऊ नये. 
 • हंगामातील फळे व भाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. कृमीमुळे संसर्ग वाढतो व रक्तक्षय बळावतो. म्हणून कृमींचा संसर्ग टाळण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. वैयक्तिक स्वच्छताही पाळावी. 
 • आहारात लोहयुक्त पदार्थांबरोबरच जीवनसत्त्व ‘क’ युक्त पदार्थ जरूर वापरावेत. उदा. पोह्याबरोबर किंवा भाजी व वरणाबरोबर लिंबू खाण्याची सवय लावावी. 

रक्तक्षय निदानाचे निकष

वयोगट     हिमोग्लोबिनची पातळी ग्रॅम/डेसीलिटर
मुले (६ महिने ते ६ वर्षे)    <११
मुली (६ महिने ते १४ वर्षे)    <१२
पुरुष    <१३
स्त्रिया <१२
गर्भवती माता   <११
(संदर्भ: जागतिक आरोग्य संघटना १९६८)

 
रक्तक्षयाचे वर्गीकरण

रक्तक्षयाचा प्रकार  हिमोग्लोबिन (ग्रॅम/डेसी लिटर)
सामान्य १२ व त्यापेक्षा जास्त
सौम्य   १०-१२
मध्यम   ७-१०
तीव्र    < ७
(संदर्भ: जागतिक आरोग्य संघटना १९६८)

   
- डॉ. साधना उमरीकर,  ९४२०५३००६७
(कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर,जि.जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कृषी सल्ला
द्विदल पिकांसाठी रायझोबिअम जीवाणू...पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया करण्यासाठी...
शेतकरी नियोजन : पीक संत्राशेतकरी : ऋषिकेश सोनटक्के गाव : टाकरखेडा...
राज्यात आठवडाभर पावसात उघडीपीची शक्‍यताया आठवड्यात औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, गोंदिया,...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
कंपन्यांच्या माध्यमातून शाश्‍वत...अजूनही शाश्‍वत मूल्यसाखळी विकसित झालेली नाही....
देशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाटभगवान विष्णूच्या या देशात मी माझ्या बाईकवरून...
शेतकरी नियोजन : पीक कापूसशेतकरी : गणेश श्‍यामराव नानोटे गाव : ...
कृषी सल्ला (कपाशी, सोयाबीन, तूर, वांगी...कपाशी फुले उमलणे ते बोंड धरणे बागायती...
तंत्र रब्बी ज्वारी लागवडीचे...कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५...
कृषी सल्ला (खरीप भात, चिकू, नारळ, हळद)खरीप भात  दाणे भरण्याची अवस्था (हळव्या...
रब्बी ज्वारीची पूर्वतयारीरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
लिंबूवर्गीय फळपिकांतील तपकिरी फळकूज...सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश,...
द्राक्ष बागेत हंगामापूर्वी करावयाची...सध्या फळछाटणीचा कालावधी सुरू असून, येत्या हंगामात...
टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक... अ) प्रतिबंधात्मक किंवा पूर्वनियंत्रण ः...
टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांची ओळखसातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे...
शेतकरी नियोजन पीक : आंबाशेतकरी : रजनीकांत मनोहर वाडेकर. गाव : ...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
जाणून घ्या भाजीपाला पिकांच्या काढणीच्या...योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास...
निसर्गाचा सन्मान केला तर साथ मिळतेच...कर्नाटक हे ३१ जिल्ह्यांचे आणि भौगोलिकदृष्ट्या...
द्राक्ष बागेत पाऊस, ढगाळ वातावरणामुळे...गेल्या आठवड्यात द्राक्ष लागवडीखाली असलेल्या बागेत...