agricultural news in marathi Changes in diet are necessary to reduce acrylamide | Agrowon

अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी खाद्यप्रक्रियेत बदल आवश्यक

नितीन तळपाडे, वैभवी उत्तरवार
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीमध्ये उच्च तापमान वापरले गेल्यास रासायनिक प्रतिक्रियेमुळे ॲक्रिलामाइड तयार होते. हा एक कर्करोगकारक घटक असून, त्यामध्ये मज्जासंस्थेला अपायकारक गुणधर्म आहेत. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचवू शकतो.

विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीमध्ये उच्च तापमान वापरले गेल्यास रासायनिक प्रतिक्रियेमुळे ॲक्रिलामाइड तयार होते. हा एक कर्करोगकारक घटक असून, त्यामध्ये न्युरोटॉक्सिक (म्हणजे मज्जासंस्थेला अपायकारक) गुणधर्म आहेत. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचवू शकतो. यामुळे उच्च तापमानामध्ये तयार होणाऱ्या पदार्थ दूषित होऊ शकतात. अशा घटकांना उष्णता-प्रेरित अन्न दूषित घटक म्हणून ओळखतात. अ‍ॅक्रिलामाइड (आययूएपीएसी नाव ः प्रोप-२-एनामाइड) हे एप्रिल २००२ मध्ये खाद्यपदार्थांच्या विश्‍लेषणात अवचितपणे आढळून आले. हे एक पांढरे, गंधहीन आणि स्फटिकयुक्त संयुग आहे.  रासायनिक सूत्र C३H५NO आहे.

...अशी होते निर्मिती
मुख्यतः कार्बोहायड्रेटयुक्त, तसेच अधिक स्टार्च असणाऱ्या (पिष्टमय पदार्थ) खाद्यपदार्थांमध्ये शिजवताना किंवा प्रक्रियेमध्ये दिलेल्या उच्च उष्णतेमुळे ॲक्रिलामाइड या विषारी पदार्थाची निर्मिती होते. १२० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात तळलेल्या, भाजलेल्या किंवा शिजवलेल्या कर्बोदकयुक्त पदार्थांमध्ये अ‍ॅक्रिलामाइड असू शकतात. उच्च तापमानात विशिष्ट ॲमिनो आम्ले, ॲस्परजिन हे घटक शर्करेसह प्रतिक्रिया दिल्याने अ‍ॅक्रिलामाइड तयार होते. तयार झालेल्या अ‍ॅक्रिलामाइडचे प्रमाण तापमान किती उच्च आहे आणि किती काळासाठी उष्णता दिली जाणार (म्हणजेच पाककृतीसाठी लागणारा कालावधी) यावर अवलंबून असते. 

अ‍ॅक्रिलामाइडचे धोके
इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (आयएआरसी) आणि काही अमेरिकी संस्थांनी संभाव्य व्यावसायिक कर्करोगकारक घटकांत (कार्सिनोजेन ग्रुप २ ए) म्हणून त्याचे वर्गीकरण केले आहे. अ‍ॅक्रिलामाइडमुळे विशेषतः प्राण्यांमध्ये कर्करोग उद्‌भविण्याचे पुरावे आढळून येतात. माणसामधील कर्करोग उद्‌भवल्याचे मर्यादित पुरावे उपलब्ध आहेत. अ‍ॅक्रिलामाइड बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सापडत असले तरी ज्या प्रमाणात ते आढळते त्या गोष्टींचा विचार करणे देखील आवश्यक आहे. याबाबत झालेल्या प्रयोगामध्ये ॲक्रिलामाइडचे प्रमाण कसे बदलत जाते, याचा अभ्यास केला गेला. उदा. टोस्टेड ब्रेडमध्ये ॲक्रिलामाइडचे प्रमाण प्रति किलोग्रॅम २०० मायक्रोग्रॅम म्हणजेच प्रति ग्रॅम सुमारे ०.२ मायक्रोग्रॅममध्ये इतके असल्याचे आढळले. टोस्टच्या एका स्लाइसचे वजन सरासरी २४ ग्रॅम असते. तो उच्च उष्णतेवर भाजल्यास त्यात अंदाजे ८.८ मायक्रोग्रॅम ॲक्रिलामाइड तयार होते. (एक मायक्रोग्रॅम ०.०००००१ ग्रॅम होय.) 

कुरकुरीत व अति भाजलेल्या टोस्टच्या सरासरी आकाराच्या पिशवीमधून सुमारे १२.४ मायक्रोग्रॅम अ‍ॅक्रिलामाइड असू शकते. सरासरी दैनिक सेवनातून सुमारे ३० मायक्रोग्रॅम शरीरात गेल्यास त्यापासून हानी पोहोचू शकते. शास्त्रज्ञांनी शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम २.६ मायक्रोग्रॅमची सुरक्षित मर्यादा निश्‍चित केली आहे. म्हणजेच ७५ किलो वजनाच्या माणसासाठी प्रति दिन १९५ मायक्रोग्रॅमपेक्षा ॲक्रिलामाइड कोणत्याही स्थितीमध्ये जाता कामा नये. 

कर्करोगासाठी कारणीभूत असलेल्या मद्यपान आणि धूम्रपान या दोन्ही घटकांच्या तुलनेत ॲक्रिलामाइडचा धोका अत्यल्प आहे. मात्र अधिक कुरकुरीत, अधिक वेळ उच्च तापमानावर शिजवलेल्या पदार्थांचा आहारात वापर वाढू लागला आहे. प्रत्येक कर्बोदकयुक्त स्नॅक्स, अन्नपदार्थ यातून ॲक्रिलामाइड जाऊन कर्करोगाच्या धोक्यात वाढ होऊ शकते. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने आपण अति भाजलेले, अति तळलेले, अन्न खाणे टाळावे हाच ‘यूएफएसए’ सल्ला आहे. 

अ‍ॅक्रिलामाइड कमी करणारे तंत्रज्ञान

  • अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची निर्मिती केली जाते. अशा वेळी अ‍ॅक्रिलामाइडचे प्रमाण कमीत कमी राहण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. पदार्थांच्या निर्मितीची प्रक्रिया कमी उष्णतेवर कमी काळात तयार करण्याची पद्धत बसवावी.  
  • एका खासगी कंपनीने (नोवोझाइम्स, कोपनहेगन) एक विशिष्ट विकर (ॲक्रिलावे एंजाईम) तयार केले आहे. त्याचा वापर पदार्थाच्या निर्मितीदरम्यान केल्यास अ‍ॅक्रिलामाइड पातळी कमी राहण्यास मदत होते. हे विकर द्रव आणि दाणेदार अशा स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचा उपयोग कच्च्या घटकांवर केल्यानंतर पदार्थ भाजला किंवा तळला जातो. हे विकर ॲक्रिलामाइड तयार करणाऱ्या अमिनो आम्लाचे  नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करते. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या घटकाचा कुकीज किंवा बिस्किटांच्या कणकेमध्ये केल्यामुळे अंतिम उत्पादनांमध्ये अ‍ॅक्रिलामाइडची पातळी ५० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी राहिल्याचे आढळले.

आहारात कसे टाळाल अ‍ॅक्रिलामाइड?
अधिक कुरकुरीत बनवण्याच्या नादामध्ये अधिक उष्णता देऊन गडद तपकिरी रंगाचे पदार्थ बनविण्याऐवजी कमीत कमी उष्णता देऊन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा. तसेच बटाटे आणि स्टार्चयुक्त पदार्थ फ्रीजमध्ये साठवून ठेवणे टाळा. थंड तापमानामध्ये स्टार्चयुक्त पदार्थ ठेवल्यास त्यात मुक्त शर्केरेचे प्रमाण वाढू शकते. पुढे या पदार्थांना उष्णता दिल्यास त्यात अ‍ॅक्रिलामाइडचे प्रमाण वाढू शकते. 

  •  बटाट्यापासून फ्रेंच फ्राइज बनविण्यासाठी उभट जाड काप थंड करून पुन्हा तळले जातात. यात ॲक्रिलामाइड बनण्याचा धोका वाढतो.
  • जाता येता खाल्ले जाणारे बटाटा चिप्स, न्याहारीतील कुरकुरीत टोस्ट, अति भाजलेले किंवा तळलेले अन्नपदार्थ टाळावेत.
  • अन्न तळण्याच्या व भाजण्याच्या पद्धतीमध्ये विशेषतः उष्णतेचे तापमान व वेळ किमान ठेवण्याचा प्रयत्न करावा. कोणतेही खाद्यपदार्थ तळताना किंवा भाजताना त्यांना हलकासा पिवळसर तपकिरी रंग येईपर्यंत तळावेत किंवा भाजावेत. उदा. बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाटे काप तळण्यापूर्वी १०-१५ मिनिटे थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत. नंतर एका कोरड्या कपड्याने ते व्यवस्थित पुसून तळावेत. यामुळे अ‍ॅक्रिलामाइडचे प्रमाण कमी राहील किंवा ते तयार होणार नाही.

- नितीन तळपाडे,  ९८३४७५२०९९, (सहायक प्राध्यापक, अन्न व रसायनशास्त्र विभाग)
वैभवी उत्तरवार,  ९५११८८४६२६, सहायक प्राध्यापक, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ अन्नतंत्र महाविद्यालय नाशिक.


इतर कृषी प्रक्रिया
दर्जेदार पनीरनिर्मितीचे तंत्रउत्तम दर्जाचे पनीर बनविण्याकरिता म्हशीचे दूध...
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे...नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक...
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...