agricultural news in marathi Conservation of carp species in the farm pond | Page 2 ||| Agrowon

शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन

उमेश सूर्यवंशी, प्रशांत तेलवेकर 
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी असेल आणि चांगला विक्री दरही मिळेल अशा माशांची निवड करावी. भारतीय प्रमुख जातीच्या माशांचा वापर आपण संवर्धनासाठी करू शकतो.    
 

शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी असेल आणि चांगला विक्री दरही मिळेल अशा माशांची निवड करावी. भारतीय प्रमुख जातीच्या माशांचा वापर आपण संवर्धनासाठी करू शकतो.    

शेततळी विविध आकाराची बनवलेली असून त्यांना प्लॅस्टिकचे अस्तरीकरण केलेले असते. या शेततळ्याची खोली सर्वसाधारणपणे ३ ते ६ मी. पर्यंत ठेवली जाते. शेततळ्यांचा वापर फक्त सिंचनासाठीचे पाणी साठविण्यासाठी केला जातो. अशा शेततळ्यांचा वापर मत्स्य संवर्धनासाठी केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.  माशांच्या विष्ठेव्दारे तलावातील पाण्यामध्ये नत्र, फॉस्फेट, पोटॅश, इत्यादीसारख्या पोषकद्रव्यांच्या प्रमाणात वाढ होते. हे पाणी सिंचनासाठी वापरल्यास पिकाची जोमदार वाढ होते.

माशांच्या उपयुक्त जाती  

 • शेततळ्यामध्ये विविध जातीचे मासे संवर्धन करता येतात. त्यात भारतीय प्रमुख कार्प जातीच्या माशांचे संवर्धन फायदेशीर ठरू शकते. पाण्याच्या तळातील, मध्यभागी आणि पृष्ठभाग यात भारतीय प्रमुख कार्प आढळतात.
 • तळ्यामध्ये विविध जातींच्या माशांचे संवर्धन करता येते पण प्रामुख्याने तळ्याचा वापर योग्य रीतीने करणारे मासे जसे की, तळ्याचा पृष्ठभाग, मध्यभागी व तळभागात वावरणारे मासे व नैसर्गिक उपलब्ध खाद्याचा पूर्णपणे वापर करणारे माशांच्या जाती संवर्धनासाठी निवडाव्यात. 
 • बीज सहज व मोठया संख्येने उपलब्ध असणारे मासे संवर्धनासाठी निवडावेत. पुनरूत्पादनास योग्य अशा जातीची निवड करणे फायद्याचे ठरते. 
 • परस्परांना खाणारे मत्स्य जातींची निवड करू नये. 
 • बाजारात मागणी असेल आणि चांगला विक्री दरही मिळेल अशा माशांची निवड करावी. त्यात भारतीय प्रमुख जातीच्या माशांचा वापर आपण संवर्धनासाठी करू शकतो. 

कटला, रोहू आणि मृगळ जातींची वैशिष्टे 
कटला  

 • हा पाण्याच्या पृष्ठभागाजवळ वावरणारा तसेच इतर माशांच्या तुलनेत झपाट्याने वाढणारा मासा असून एका वर्षात १ ते १.५ किग्रॅ. (३८ ते ४६ सेंमी) वाढतो.
 • या माशाच्या अंगावरील खवले मोठे असतात. डोके मोठे आणि रूंद असते. खांद्याकडचा भाग रुंद व फुगीर असतो.
 • तोंड वरच्याबाजूला वळलेले असते म्हणून पृष्ठभागाकडील अन्न, प्लवंग खाणे सोपे जाते. 

रोहू  

 • हा मधल्या थरात राहणारा व चांगली वाढ असलेला मासा असून सर्वसाधारणपणे हा मासा एका वर्षात ७०० ते ९०० ग्रॅम पर्यंत (३४ ते ४६ सेंमी) वाढतो. 
 • डोके कटल्याच्या तुलनेने थोडे लहान, तोंड अरूंद असून किंचित खालच्या बाजूला वळलेले असते. 
 • हा मासा पाण्याच्या मधल्या थरात राहतो. मुख्यत: हा मासा मधल्या थरातले अन्न खातो. त्याच्या खालच्या ओठाची किनार दातेरी असते. तिचा उपयोग वनस्पती ओढून तोडण्यासाठी करतो.
 • शेततळ्यांमध्ये या प्रजातीचे संवर्धन केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. 

मृगळ 

 •  शरीर सडपातळ, डोके लहान असून खालच्या बाजूला वळलेले असते.
 • हा मासा तळयाच्या तळाशी वावरतो. 
 • तळाच्या चिखलातील सेंद्रिय अन्नपदार्थ पानवनस्पतीचे तुकडे, शेवाळ, प्लवंग हे त्याचे खाद्य आहे.
 • पहिल्या वर्षात हा मासा वजनाने ७०० ग्रॅम होतो. 

- उमेश सूर्यवंशी,  ९१४६४०७०००
(मत्स्य विज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर)


इतर कृषिपूरक
शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापरकृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून...
योग्य पशुधनाची निवड महत्त्वाचीदुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी...
रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रणपावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी...अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनसततच्या पावसाचा मोठ्या जनावरांना त्रास होत नसला,...
तेलबिया पिके अन् मधमाशीपालनामध्ये संधीसर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍या व त्याद्वारे...
कोंबडीखाद्यामधील मायकोटॉक्सिन्सवर...मायकोटोक्सिकोसिस हा एक रोग आहे. हा रोग...
मत्स्य संवर्धनामध्ये चांगली संधीमत्स्य संवर्धनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
वासरांसाठी योग्य प्रमाणात जंतनाशकाची...जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे  ...
शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रेशेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय...
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...