agricultural news in marathi Construction of mushroom Spawn Laboratory | Page 3 ||| Agrowon

अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची उभारणी

डॉ. अनिल गायकवाड
बुधवार, 7 एप्रिल 2021

चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधायुक्त प्रयोगशाळेची आवश्‍यकता असते. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री बाबत आज माहिती घेऊ.

चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधायुक्त प्रयोगशाळेची आवश्‍यकता असते. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री बाबत आज माहिती घेऊ.

लोकांमध्ये अळिंबी लागवडीबद्दल बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. अळिंबी लागवडीतून स्वयंरोजगार आणि शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होत आहे. अळिंबी बियाणे किंवा स्पॉनची गुणवत्ता थेट अळिंबी उत्पादनावर परिणाम करते. प्रत्येक अळिंबी प्रजातीचे विशिष्ट बीज असते. भारतात केवळ ४ प्रजातींची (बटन अळिंबी, धिंगरी अळिंबी, भात पेंढ्यावरील अळिंबी आणि दुधी अळिंबी) व्यावसायिकरित्या मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यामुळे फक्त त्यांचे स्पॉन तयार होतात.

सध्या महाराष्ट्रामध्ये वार्षिक २५ हजार मे. टनांपेक्षा जास्त अळिंबीचे उत्पादन होत असून त्यासाठी साधारणपणे १४०० मे. टन स्पॉनची आवश्‍यकता लागते. सध्या बरेचशे मोठे बटन अळिंबी उत्पादक परदेशातून स्पॉन आयात करतात. परंतु, देशांतर्गत देखील उत्कृष्ट प्रतीचे स्पॉन उत्पादित होऊ शकते. अळिंबी स्पॉन निर्मिती हा एक स्वतंत्र जोड धंदा किंवा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करता येऊ शकतो. चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधायुक्त प्रयोगशाळेची आवश्‍यकता असते. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री बाबत आज माहिती घेऊ.

स्पॉन निर्मिती युनिटची जागा आणि आराखडा 

 • मध्यम आकाराच्या स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेचे (उत्पादन क्षमता किमान २५ टन प्रती वर्ष) एकूण बांधकाम क्षेत्र ९० ते १०० चौ.मी. असावे.
 • या क्षेत्राची विभागणी साठवणगृह, धान्य उकळणे, रसायने मिसळणे आणि पिशव्या भरण्यासाठी एक खोली, ॲटोक्लेव्हिंग खोली, इनॉकुलेशन खोली, उबवणी कक्ष, शीतगृह, कार्यालय व विक्री खोली अशी असावी.
 • हे युनिट कंपोस्टिंग यार्ड आणि अळिंबी वाढ गृहापासून वेगळे असावे.

स्पॉन निर्मितीसाठी आवश्‍यक बाबी 
दरमहा २ टन स्पॉन तयार करण्यासाठी खालील बाबींची आवश्‍यकता लागते.
साठवण खोली 

 • कच्चा मालाच्या साठवणुकीसाठी ही खोली आवश्‍यक आहे. उदा. गहू व इतर धान्य, रसायने, पॉलीप्रोपिलिन पिशव्या, पीव्हीसी पाइप्स, कापसाचे बंडल.
 • त्यामध्ये जास्तीत जास्त जागेच्या वापर करता यावा, यासाठी किमान ४ ते ५ मांडण्या असाव्यात. खोली ४ बाय ४ मीटर अळिंबी आकाराची असावी.

धान्य उकळणे आणि पिशव्या भरण्यासाठी खोली 

 • सदर खोली मोठ्या आकाराची (७ बाय ४ मीटर) असावी.
 • याठिकाणी पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची उत्तम सोय असावी.
 • ही खोली धान्य धुणे, उकळणे आणि पिशव्या भरण्यासाठी वापरली जाते.
 • या खोलीत १ किंवा २ सीलिंग पंखे आणि एक हवा बाहेर फेकणारा पंखा बसवावा. जेणेकरून धान्य लवकर सुकविले जाईल.
 • केटलच्या विरुद्ध बाजूस ग्रॅनाईट किंवा सिंमेटमध्ये बनवलेला एक ओटा (प्लॅटफॉर्म) असावा. त्याचा वापर धान्यामध्ये रसायने मिसळणे, पिशव्या भरणे आणि बेसिनमध्ये साहित्य धुण्यासाठी करता येतो.
 • ओटा १.१० मी.(उंच), ०.९ मी. (रुंद) आणि ४ मी. लांब असावा.

ॲटोक्लेव्हिंग खोली 

 • पिशव्या भरल्यानंतर त्या निर्जंतुकीकरणासाठी ॲटोक्लेव्हिंग रूममध्ये आणल्या जातात.
 • या खोलीचा आकार ४ बाय ३ मीटर किंवा ॲटोक्लेव्हच्या आकारमानानुसार ठरवावा.
 • ॲटोक्लेव्हिंग खोली आणि इनॉकुलेशन चेंबर दरम्यान १ लहान खिडकी असावी. त्यातून निर्जंतुकीकरण केलेल्या पिशव्या थेट इनॉकुलेशन खोलीत नेता येतील किंवा ॲटोक्लेव्हिंग आणिइनोकुलेशन रूममधील भिंतीमध्ये दोन दरवाज्यामध्ये ॲटोक्लेव्ह अशा पद्धतीने बसवावा की निर्जंतुकीकरण केलेल्या पिशव्या थेट इनॉकुलेशन खोलीत उघडणाऱ्या दरवाजातून काढून घेता येतील.

इनॉकुलेशन खोली 

 • इनॉकुलेशन खोलीचा आकार ४ बाय ३ मीटर असावा.
 •  खोलीत दरवाज्याच्या विरुद्ध बाजूस अतिनील प्रकाशाची ट्यूब (U.V. tube) बसवून घ्यावी. त्याचा लाल रंगाचा सूचक दिवा (बल्ब) दरवाज्याच्या बाहेर लावावा. - या खोलीत एका बाजूला लॅमिनार एअर फ्लो मशिन ठेवण्यासाठी ॲल्युमिनिअम फ्रेम आणि काचेची छताला भिडेल अशी एक विभाजक भिंत करावी. हवा जाऊ नये यासाठी घट्ट दरवाजा बसवावा.

उबवणी कक्ष 

 • ही साधारण ४ बाय ४ मीटरची खोली असते. यामध्ये उबवणीसाठी आवश्‍यक वातावरण नियंत्रित केले जाते.
 • या खोलीमध्ये जास्त पिशव्या ठेवता येण्यासाठी १.५ मीटर लांबीच्या ३५ ते ४० सेंमी रुंदीच्या पाच स्थरीय १२ ते १५ लोखंडी मांडण्या ठेवाव्यात. मांडणीच्या दोन थरांमध्ये ३० सेंमी अंतर असावे.
 • दीड मीटर लांबीच्या एका मांडणीवर अर्धा किलोच्या ३५० ते ३६० तर एक किलोच्या २९० ते ३०० पिशव्या बसतात.
 • उबवणी कक्ष पूर्णपणे पृथक्इ (इन्सुलेटेड) असला पाहिजे. तापमान (२५ अंश सेल्सिअस) नियंत्रित करण्यासाठी १ किंवा २ वातानुकूलित सयंत्रे (प्रत्येकी १.५ क्षमता) आवश्‍यक आहेत.

शीतगृह 

 • शीतगृहाचा आकार ४ बाय ३ मीटर असावा. यामध्ये तयार झालेल्या स्पॉन पिशव्या साठविल्या जातात.
 • शीतगृह पूर्णपणे पृथक् (इन्सुलेटेड) केले पाहिजे. त्यातील तापमान ४-५ अंश सेल्सिअस दरम्यान नियंत्रित करावे.
 • सर्व भिंती, छत तसेच दरवाजा यास जाड इन्सुलेशन (७.५-१० सेंमी जाड) करावे. खोलीच्या आतील तापमान नियंत्रित करण्यासाठी २ एअर कंडिशनर बसवावेत.
 • शीतगृहाला १ हवाबंद दरवाजा असावा. दरवाजाच्या वर हवा पडदा (Air curtain) बसविणे आवश्‍यक आहे.

कार्यालय आणि विक्री खोली
कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी व विक्री करण्यासाठी पुरेशी जागा असावी. तेथे टेबल, सेलिंग काउंटर, तिजोरी मांडणी अशी व्यवस्था असावी.

 व्हरांडा (कॉरिडॉर) 
स्पॉन युनिटच्या मुख्य प्रवेशामध्ये ४ बाय २ मीटरचा पूर्णपणे टाईल्स बसविलेला व्हरांडा असावा. मुख्य प्रवेशावरील दरवाजास देखील हवेचा पडदा बसविणे आवश्यक आहे.

व्यावसायिक स्पॉन उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे 
स्पॉन उत्पादनासाठी धान्य साठवण्याच्या कोठ्या ६ (५ क्विंटल क्षमता), धान्य भिजविणे आणि उकळण्यासाठी मोठी पातेली ४ (५० लिटर क्षमता) किंवा बॉईलिंग केटल १ (१०० किलो क्षमता), एक ॲटोक्लेव्ह (७५० मिमी खोली आणि ५५० मिमी व्यास), लॅमिनार एअर फ्लो (६ फूट लांब), बीओडी इनक्युबेटर (९० x ९० x ९० सेंमी), रेफ्रिजरेटर (२१० लिटर क्षमता), इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पिशव्या ठेवण्यासाठी पाच स्थरीय १५ मांडण्या, वाहतुकीसाठी ट्रॉली, हवा बाहेर फेकणारे दोन पंखे, हवेचे पडदे ३, उच्च दाब गॅस शेगडी, पी.एच. मीटर.

आवश्यक वस्तू 
गहू धान्य, स्पिरीट, पॉलीप्रॉपिलिन पिशव्या (१४" x ७" किंवा १६" x १०"), पीपी नेक, ॲप्रॉन, स्लीपर, ग्लूकोजच्या बाटल्या, अ‍ॅल्युमिनियम फॉईल.

इतर किरकोळ साहित्य 
लोखंडी फ्रेमवर बसविलेल्या मोठ्या आकाराच्या (४’ x ४’) ४ ते ५ चाळण्या, २ स्पिरीट दिवे किंवा गॅस बर्नर, ४ इनॉकुलेशन निडल, आवश्यकतेनुसार शोषकरहित कापूस, रबरी हात मौजे (ग्लोव्हज), मलमल कापड.

काचेचे साहित्य (ग्लासवेअर) 
टेस्ट ट्यूब, पेट्री डिश, कोनिकल फ्लॉस्क, बिकर्स, मेजरिंग सिलिंडर, फनेल्स, पिपेट्स, माध्यम (मीडिया).

- डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११


इतर कृषिपूरक
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...