करडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा स्थितीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. मावा (शास्त्रीय नाव : Uroleucon compositae Th.) या किडीच्या प्रादुर्भावास पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी सुरुवात होते. पुढे ५५ ते ६० दिवसांनी प्रादुर्भावाचे प्रमाण सर्वाधिक असते. मावा कीड सुरुवातीस झाडाच्या कोवळ्या भागावर रस शोषते. पुढे संपूर्ण झाडावर आढळते. पिकाच्या फुलोरा अवस्थेमध्ये माव्याचा अधिक प्रादुर्भाव आढळतो. परिणामी, फुले व बोंडे कमी लागतात. उत्पादनात घट येते. तीव्र प्रादुर्भाव स्थितीमध्ये झाडे वाळतात. ओळख
एकात्मिक कीड नियंत्रण
प्रतिबंधात्मक उपाय किडीचा प्रादुर्भाव शेताच्या बाजूने होऊन आत पसरत जातो. तो रोखण्यासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी शेतातील बाजूच्या ४ ओळींवर (१८० सें.मी.) डायमिथोएट (३० ई. सी.) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी करावी. आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीपेक्षा अधिक (सरासरी ३० टक्के झाडावर) प्रादुर्भाव आढळल्यास, नियंत्रणासाठी फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी) - निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) ३ मि.लि. किंवा - डायमिथोएट (३० ई. सी.) १.२ मि.लि. - योगेश मात्रे, ७३८७५२१९५७ डॉ. पी. आर. झंवर, ७५८८१५१२४४ (लेखक डॉ. झंवर कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, येथे सहयोगी प्राध्यापक असून, योगेश मात्रे हे पीएच.डी. चे विद्यार्थी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.