agricultural news in marathi Control of Cucumber Mosaic Disease on Bananas | Agrowon

केळीवरील कुकुंबर मोझॅक रोगाचे नियंत्रण

डॉ.सी.डी.बडगुजर, डॉ.गणेश देशमुख, डॉ. प्रियंका ब्राम्हणे
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते.
 

विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते.

केळी पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बदलते वातावरण व ढगाळ हवामान यामुळे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. अलीकडच्या काळात केळीवर कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सी.एम.व्ही.) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. स्थानिक भाषेत यास ‘हरण्या रोग’ असे म्हटले जाते.

विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण करणे शक्य नसले तरी रोगाचा प्रादुर्भाव टाळणे आणि प्रसार रोखणे शक्य आहे. त्यासाठी खालील लेखामध्ये माहिती घेऊ.

अनुकूल घटक 

 • सततचे ढगाळ वातावरण, सतत पाऊस, कमी तापमान, जास्त आर्द्रता हे घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात. यासोबतच रोगयुक्त लागवड साहित्य, तण नियंत्रणाचा अभाव, अन्नद्रव्यांची कमतरता हे घटक रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहेत.
 • रोगाचा प्राथमिक प्रसार कंदापासून आणि दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो.
 • या विषाणूची साधारणपणे ८०० ते १००० यजमान पिके आहेत. यात काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची तसेच एकदल व द्विदल पिकांचा समावेश होतो.
 • पीक फेरपालट पद्धतीचा अभाव हेदेखील एक कारण आहे.

लक्षणे 

 • सुरवातीला कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळतात.
 • एका पानावर १ ते २ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात. कालांतराने पानांचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पाने आकाराने लहान होतात.
 • पानाच्या देठाची लांबी कमी होऊन पाने जवळ येतात.
 • शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. हाताने दाबल्यास कडकड आवाज येतो.
 • पानाच्या शिरा काळपट पडून तेथील उती मरतात. पाने फाटतात.
 • नवीन येणारी पाने आकाराने लहान होतात.
 • प्रादुर्भाव जास्त झाल्यास, पान पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते.
 • प्रादुर्भावग्रस्त झाडांची निसवण उशिरा तसेच अनियमित होऊन फण्या अत्यंत लहान होतात.
 • फळे विकृत आकाराची होऊन त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. अशी फळे विक्रीसाठी योग्य नसतात.

उपाययोजना 
विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते. प्रसार रोखण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.

 • पिकांची फेरपालट आवश्यक
 • रोगमुक्त ऊतीसंवर्धीत रोपे वापर किंवा रोगमुक्त बागेतून चांगली मातृवृक्ष निवडून त्यांचे कंद लागवडीसाठी वापरावेत.
 • लागवडीपूर्वी रोपांवर शिफारशीत कीडनाशकांची फवारणी आणि कंदांवर प्रक्रिया करावी.
 • प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळांसहित उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे सातत्याने निरीक्षण करावे.
 • बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी.
 • बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकांची लागवड करू नये.
 • बागेभोवती रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यासारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत.

मावा नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

 • डायमेथोएट (३० ई.सी) २ मिलि किंवा
 • थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा
 • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि
 • किंवा
 • फ्लोनिकॅमीड ७ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

(केळी संशोधन केंद्राकडून शिफारस करण्यात येते.)

- डॉ.सी.डी.बडगुजर, ८८८८८५०८५८
- ०२५७/२२५०९८६
(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)


इतर कृषी सल्ला
शेतकरी नियोजन : पीक सीताफळशेतकरीः विलास तात्याबा काळे गावः सोनोरी, ता...
पीक पैदासकार, शेतकऱ्यांचे हित जपणारा...शेतकऱ्यांनी त्यांच्या वैविध्यपूर्ण वाणांची...
शेतकरी नियोजन : पीक हरभराआमची एकत्रित कुटुंबाची ८५ एकर शेती असून, त्यातील...
राजस्थानातील तीव्र वातावरणात बदलाची भर!राजस्थानमधील हवामान मुळातच तीव्रतेच्या टोकावर आहे...
जमिनीची क्षारता थांबवून वाढवा सुपीकताजमिनीची सुपीकता जपण्यासाठी पीक लागवड रुंद वरंबा...
थंडीत वाढ शक्यमहाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२...
‘फूल’ बनवणारं मलेशियन फूलमलेशिया हा बेटांचा देश. मलेशियात उष्ण कटिबंधीय...
शेतकरी कंपन्यांना केळी पिकात...शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना एका विशिष्ट...
कांदा बीजोत्पादनाचे शास्त्रीय तंत्रकांदा बीजोत्पादनासाठी मातृकांद्याची निवड...
शेतकरी नियोजन : पीक काजूशेतकरी : सुशांत मोहन नाईक गाव :  ...
कोरडवाहूमध्ये कवठ लागवड फायदेशीरमजबूत मूळ प्रणालीमुळे कवठाचे झाड दुष्काळ सहन...
बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे...पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे....
भारतातील प्राचीन गहू जातींचा शोध...भारतीय उपखंडात शेतीचा विकास आणि प्रसार यांचा एक...
शेतकरी नियोजन : रेशीमशेतीशेतकरीः राधेश्याम खुडे गावः बोरगव्हाण, ता.पाथरी...
कृषी सल्ला (कोकण विभाग)पालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-...
शेतकरी नियोजन- पीक डाळिंबमी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो....
तीन शेतकरी... तीन दिशागुजरातमधील शेतकरीही धडाडीचे... आलेल्या संकटाशी...
राज्यात थंडी वाढण्यास अनुकूल हवामानमहाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२ हेप्टापास्कल, तर...
उशिरा गहू लागवडीचे तंत्र...बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (...
तेलाचं ‘पामर’ जंगलनैसर्गिक जंगलातील जैवविविधतेचा बळी देत हजारो...